१६,७९८ नागरिकांनी केले रक्तदान मुंबई / प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ६…
परंडा / प्रतिनिधी येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. रामचंद्र गेनुजी शिंदे गुरुजी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाने गुरुजींची जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये दि.6…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला डिजिटल इंडिया व सुशासन या तत्वांवर आधारित विविध शासकीय सेवा,योजना व माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा प्रशासनाने अधिकृत TuljAI हा AI सहाय्यक डिजिटल मार्गदर्शक सुरू केला असून,तो धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://dharashiv.maharashtra.gov.in तसेच WhatsApp क्रमांक ९३७१९८९३२१ वर उपलब्ध…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी धाराशिव महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सौ. प्रितीताई कदम यांचा सत्कार भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केला व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व महिला सक्षमीकरण व भाजपाचा विचार घरोघरी पोहचवावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली . या प्रसंगी जि. प. चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील,…
मुरूम ( म नेता ) उमरगा तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत चौदा वर्ष वयोगटात प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या क्रिकेट संघाने तालुक्यातून प्रथम विजेतेपद पटकाविल्याबद्दल माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी आदींनी त्यांचे कौतुक केले. या संघाने अंतिम लढतीत फलंदाजी व…
परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक मुंबई / प्रतिनिधी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन लाभत होते. या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी मुंबईकडे जात असताना दुर्दैवी अपघातात पाच मराठा बांधवांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सतीश देशमुख (रा.वरंगाव, ता. काज,जि.बीड), विजय चंद्रकांत धोगरे (रा.टाकळगाव,ता.अहमदपूर, जि.लातूर),अतुल खवचट (रा. केसापुरी,ता.बीड,जि. बीड), गोपीनाथ…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव,लातूर, बीड, सोलापूर,अहिल्यानगर व कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेली मराठवाड्यातील अग्रणी सहकारी बँक म्हणून जनता सहकारी बँक लि. धाराशिव बँकेचा दि 5 -9- 2025 रोजी श्री संत ज्ञानेश्वर मंदिर सभागृह धाराशिव येथे कर्मचारी गुणगौरव सोहळा व मोबाईल बँकिंग अँप चा शुभारंभ सोहळा हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला…
माविमच्या लोकसंचालित केंद्राची सभा व महिला मेळावा धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत महिला बचत गटांचे जाळे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचलेले आहे. या महिलांनी छोट्या-मोठ्या उद्योगापासून महिन्याला एक महिला आज साठ हजार रुपये कमाई करत आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे शासकीय योजना सक्षमपणे राबविण्यामध्ये महिलांचा ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. वेगवेगळ्या…
धाराशिव / प्रतिनिधी मागील पाच वर्षांत प्रियदर्शिनी इंदिरा गांधी महिला सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत केलेली प्रगती ही केवळ आर्थिक शिस्तीची फलश्रुती नसून, सभासदांच्या निष्ठा व संचालक मंडळाचा प्रामाणिक प्रयत्नांचा परिणाम आहे. संस्थेच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख योजना, तसेच भविष्यात नैसर्गिक आपत्ती मदत निधी व शैक्षणिक मदत निधी उभारला जाणार आहे.हे केवळ आर्थिक व्यवहारा पुरते मर्यादित न राहता समाजहित…
कळंब / प्रतिनिधी ईद ए मिलादनिमित्त आझाद ग्रुप आणि आगाज फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास आ. कैलास पाटील, मा. नगराध्यक्ष संजय मुंदडा, कृ.उ. बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, मुख्तारबेग मिर्झा, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, उपनिरीक्षक पठाण, राजेंद्र मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या…