Live News…..Breaking News!

.

  • शारदीय नवरात्र काळात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागाने ७३८ हरवलेल्या भाविकांची नातेवाइकांशी घडवून आणली भेट; ५२ भाविकांना वैद्यकीय मदत

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या कालावधीत तुळजापूरात श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सुरक्षा विभागामार्फत सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. या काळात हरवलेल्या भाविकांचा शोध घेऊन त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन करणे, गरजू…

  • दुष्काळग्रस्त बळीराजाची दिवाळी गोड करण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे व पालकमंत्री सरनाईक सरसावले; ठाण्यातून मदतीचे ट्रक धाराशिवकडे रवाना!

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आणि अत्यल्प पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुष्काळाच्या या संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, उत्पन्नात झालेली घट आणि वाढत्या आर्थिक विवंचनेमुळे अनेक शेतकरी कुटुंबांसमोर दिवाळीचा सण साजरा करण्याचेही आव्हान निर्माण झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत बळीराजाच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर…

  • कार्तिकी सोहळ्यासाठी श्री संत गोरोबा काकांच्या पालखीचे ११ नोव्हेंबरला तेरहुन पंढरपूरकडे प्रस्थान

    तेर / प्रतिनिधी राज्यभरातील लाखो भाविक भक्तांसह वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या त्याचबरोबर प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व धार्मिक क्षेत्रातही सर्व दूर प्रसिद्ध असलेल्या तेर ता.धाराशिव येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काकांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपूरातील कार्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास…

  • अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात!

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला जिल्हाभरातून प्रतिसाद;किराणा साहित्य, फराळ किटचे वाटप तर कुठे पशुधनासाठी पाणवठे धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यंदाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. अनावश्यक खर्च टाळून गरजू कुटुंबांना मदत करावी, संकटात असलेल्या बांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलवावे, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या…

  • श्रृंगेरी मठाचे शंकराचार्य यांच्या तुळजापूर दौऱ्यासंदर्भात बैठक संपन्न

    तुळजापूर / प्रतिनिधी श्रृंगेरी मठाचे शंकराचार्य यांच्या श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची योग्य नियोजन करण्याबाबतची बैठक संपन्न झाली आज शुक्रवारी दुपारी 3.00 वाजता मा. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली श्री तुळजाभवानी मंदिरच्या प्रशासकीय कार्यालय येथे ही बैठक पार पडली. याबैठकीत त्यांचे स्वागत,सत्कार व दर्शन व्यवस्था कशी असावी याबाबतची ही बैठक होती. याबैठकीत तहसिलदार अरविंद बोळंगे,मंदिर…

  • राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

    धाराशिव / प्रतिनिधी संविधानाचे रक्षण, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि काँग्रेस पक्षाचे हात अधिक मजबूत व बळकट करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी धाराशिव जिल्हा काँग्रेस भवन येथे असंख्य युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तसेच धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष धनंजय राऊत यांच्या…

  • आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाज मंदिर सभागृह व रस्ता कामांचे उद्घाटन

    धाराशिव / प्रतिनिधी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १५ मधील फकीरा नगरमधील मातंग समाज मंदिर सभागृह बांधकाम तसेच अंतर्गत नागरी रस्त्याचे आणि रसुलपुरा भागातील जफर किराणा घर ते जुबेर पठाण घर रस्ता कामांचे उद्घाटन नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या हस्ते आणि बांधकाम सभापती अभिजीत काकडे, पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे, नगरसेवक राजकन्या अडसुळे गोरे,…

  • उजनी धरणावरील एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी उजनी धरण परिसरात होत असलेल्या एआय डेटा सेंटर (SEED) प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे दि.३० ऑक्टोबर रोजी केली आहे ‌ या दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी जलाशय परिसरात जो SEED प्रकल्प प्रस्तावित आहे.…

  • शिवसेनेची सोनारी येथे आढावा बैठक ; दुष्काळात मतदारसंघातील जनतेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभे राहणार — आमदार तानाजीराव सावंत .

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात दुष्काळाचे भयानक चित्र दिसत असून आगामी काळात परिस्थिती बिकट होणार असल्याने मतदार संघाचे शिवसेना पक्षाचे आमदार तथा माजी आरोग्यमंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत यांनी दि . २९ ऑक्टोंबर गुरुवार रोजी भैरवनाथ शुगर सोनारी येथे दुष्काळात करावयाच्या उपायोजना या विषयाच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली .दुष्काळात आपण…

  • विजयानंतर नूतन आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट!

    धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवारचे नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्धवजींनी नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे विजयाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा…