निकष शिथील करून मदतीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रयत्न. धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील कांही मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उर्वरित काही मंडळांत सरासरीपेक्षा ५०% अधिक पाऊस झाला आहे. मदतीसाठीच्या निकषात हे बसत नसले तरी वस्तुनिष्ठ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठवावेत, शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. धाराशिव…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्यापही अतिवृष्टीचे निकष धरून पंचनामे करण्यात आलेले नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी…
वडगाव (सिद्धेश्वर)येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी धाराशिव / प्रतिनिधी अतिवृष्टीने जिल्ह्यात शेतकरी, पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत.त्याप्रमाणे कार्यवाही सुरूच आहे. या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना, पशुपालकांना शासन मदत मिळेल. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक…
भाविकांना चांगल्या,उत्तम सोयी सुविधा द्या ➡️उत्सव कालावधीत जादा प्रवासी वाहतुकीसाठी नवीन ५० बस ➡️शारदीय नवरात्र महोत्सव तयारीचा आढावा तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी देविजींचा १४ सप्टेंबर ते ०८ ऑक्टोबर कालावधीत होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवासाठी अंदाजे ५० लाखांहून अधिक भाविक देविजींच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. सुरक्षित,सुरळीतपणे हा उत्सव पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात,अशा…
महाराष्ट्र स्त्री-मुक्तीची राज्यस्तरीय परिषद डिसेंबरमध्ये मुंबईत स्त्रियांच्या सुरक्षेच्या मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदानात आंदोलन विविध सामाजिक संस्थांचे सर्वेक्षण धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील बस स्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अंधार्या जागा, सीसीटीव्ही कॅमेर्यांचा अभाव, सुरक्षा रक्षकांची अपुरी संख्या, तक्रार निवारण केंद्रांचा अभाव तसेच बस उशिरा मिळाल्याने महिलांना असुरक्षिततेचा सामना करावा…
धाराशिव / प्रतिनिधी आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यात अप्रत्यक्ष भाजप पक्षाला धक्का बसला आहे.,भाजपमध्ये गेलेल्या सुनील चव्हाण यांच्या बरोबर न जाता असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे युवक नेते ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी एकत्र येत चव्हाण…
कळंब / प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्हाभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कळंब तहसिल कार्यालयाच्या आवारात आज स्वयंरोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या स्वयंरोजगार मेळाव्यात सर्व महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने अर्जदार उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा…
परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर , आमदार राणाजगजीतसिंह पाटील व भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा पिंपळवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य धनाजी गायकवाड यांची भारतीय जनता पार्टीच्या परंडा तालुका सरचिटणीस पदी निवड झाल्याने त्यांचा भाजपा कार्यालय परांडा येथे माजी आमदार व महाराष्ट्राचे…
तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ अंतर्गत “नऊ दिवस, नऊ रूप, नऊ अनुभव” या संकल्पनेवर आधारित विविध सांस्कृतिक, भक्तीमय व कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहेसोमवार २२ सप्टेंबर – रोहित राऊत (इंडियन आयडॉल फेम) – भक्तिसंगीत व ऑर्केस्ट्रा मंगळवार २३ सप्टेंबर – पं. जयतीर्थ मेवुंडी – विशेष दर्शन व…
मुसळधार पावसाचा कहर; गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना दिलासा, अधिकाऱ्यांना दिले पंचनामे करण्याचे आदेश धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यासह परिसरातील गावांना शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे पिकांचे, अनेकांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले. काही गावांचा संपर्क तुटला. घरांत पाणी शिरल्यामुळे अनेक गावांत नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. नागरीक, शेतकरी हवालदिल झाले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनचे उपाध्यक्ष, आमदार…