तुळजापूर / प्रतिनिधी आई तुळजाभवानीच्या नवरात्रोत्सवात भाविकांच्या सेवेसाठी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेवकांनी उल्लेखनीय योगदान दिले. अश्विनी व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त २५ व २६ ऑक्टोबर रोजी ८० विद्यार्थ्यांनी, त्यात ३५ विद्यार्थिनींचा समावेश होता, सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सेवा बजावली. पायी चालत आलेल्या भाविकांना पाणीवाटप करणे, दर्शनाच्या रांगा व्यवस्थित लावणे आणि भाविकांना आवश्यक माहिती…
तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा धार्मिक विधीचा सांगता सोमवारी रात्री छबिना संपन्न झाल्यानंतर वाकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा यांनी उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर सांगता झाली तर मंगळवारी अन्नदान महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभापासून विविध धार्मिक विधी आणि धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सोमवारी रात्री सोलापूरच्या मानाच्या…
माजी आमदार चौगुले आणि जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांच्या पाठपुराव्याला यश; जिल्हाधिकाऱ्यांना निधी वर्ग करण्याचे निर्देश, ग्रामस्थांना दिलासा मिळण्याची आशा मुरूम / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील १६ खेड्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेच्या पूर्ततेतील महत्त्वाचा अडथळा दूर करण्यासाठी परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक…
धाराशिव / प्रतिनिधी गुरु पद्मभूषण पंडीत . सी. आर. व्यास संगीत महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘शास्त्रीय बंदिश’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मैफली मध्ये रागदारीतील शास्त्रोक्त बंदिशीच्या मांडणीला धाराशिव च्या रसिकांनी उस्फुर्त दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात कु. शिवन्या मुसळे हिच्या गायनाने झाली तिने राग दुर्गा गायला बंदिश ‘मन मोहन मुरलीवाला” ही ताल त्रीताल मध्ये…
पालखी सोहळा, छबिना अन् पोत खेळण्याच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाची सांगता; ३०५ लिटर मसाला दुधाचे वाटप येरमाळा / प्रतिनिधी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (ता. २७) भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसर दिवसभर भाविकांनी गजबजून गेला होता. रात्री देवीची पंचोपचार महापूजा, महाआरती…
आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचा ‘माणुसकीची दिवाळी’ उपक्रम; दुष्काळग्रस्त कुटुंबांच्या दिवाळीत गोडवा आणण्याचा संकल्प परंडा / प्रतिनिधी दुष्काळाच्या तीव्र झळांनी सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले असताना, आर्थिक संकटामुळे कोणत्याही कुटुंबाच्या दिवाळीचा आनंद हिरावला जाऊ नये, या संवेदनशील भावनेतून राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक रेशनकार्डधारक…
तुळजापूर / प्रतिनिधी महाविकास आघाडीचे नेते सतेज बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठा दुधसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघामध्ये सत्ता आणल्यामुळे त्यांचा सत्कार श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा , प्रसाद, कवड्याची माळ घालून कोल्हापूरमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, तुळजापूर नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते नगरसेवक अमोल कुतवळ,सचिन घोगरे,…
तेर / प्रतिनिधी उमेद अभियानांतर्गत तेर गावात महिलांचे नवीन स्वयंसहाय्यता गट (बचत गट) स्थापन करण्यात येत आहेत. महिलांनी एकत्र येऊन बचतीची सवय जोपासावी, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन तेर येथील उमेद अभियानाच्या गटप्रेरिका पूजाताई चौहाण यांनी केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना नियमित बचतीची सवय लागते. तसेच कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध…
‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने तुळजापूर दुमदुमले; लाखो भाविकांची मांदियाळी तुळजापूर / प्रतिनिधी तुळजाभवानी मातेच्या अश्विनी पौर्णिमा सोहळ्यासाठी तुळजाईनगरीत भाविकांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांतून आलेल्या सुमारे लाखो भाविकांनी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला तुळजापूरमध्ये हजेरी लावली. ‘आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो’च्या जयघोषाने संपूर्ण तुळजापूर नगरी दुमदुमून गेली असून, सर्वत्र भक्तिमय…
बापूराव पाटील मित्र मंडळा मुरूम व्यापारी महासंघाचा उपक्रम मुरुम / प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावर येणेगूरजवळ बापूराव पाटील मित्र मंडळ व मुरूम शहर व्यापारी यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा ते कोजागरी पौर्णिमेदरम्यान तुळजापूरला दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी बुधवारपासून (दि.21) अन्नदान सुरू करण्यात आले आहे.दरवर्षी नवरात्रोत्सवात शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातून तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या…