Live News…..Breaking News!

.

  • खोटे कर्ज ॲप म्हणजे कर्जाचा सापळा! तेर येथे पोलिस विभागाच्या वतीने जनजागृती

    तेर / प्रतिनिधी खोटे कर्ज अॅप म्हणजे कर्जाचा सापळा याविषयी तेर येथे पोलिस विभागाच्या वतीने तेर दूरक्षेत्रचे बीट अंमलदार विलास माळी यांनी जनजागृती केली.महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना खोट्या कर्ज ॲप्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ही ॲप्स कमी कागदपत्रांत आणि काही मिनिटांत कर्ज देण्याचे आमिष दाखवतात. मात्र, ॲप डाउनलोड केल्यानंतर मोबाईलमधील संपर्क, फोटो, गॅलरी, संदेश…

  • दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश

    ऊसतोडणीपैकी ६० ते ७० टक्के ऊसतोडणी मजुरांमार्फत करण्याचे आदेश; ३० टक्के ऊस, बगॅस आणि मळीचा साठा राखीव ठेवणे बंधनकारक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होणार धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करणे आणि स्थानिक ऊसतोड मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली…

  • भटक्या-विमुक्तांसह ऊसतोड कामगारांना थंड पाण्याचे जार

    भाजप युवा नेते राम जवान यांचा संवेदनशील उपक्रम; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ धाराशिव / प्रतिनिधी वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक सेवेची जोड देत भाजप युवा नेते राम जवान यांनी महत्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भटक्या-विमुक्त समाजातील नागरिक आणि ऊसतोड कामगारांना थंड पिण्याच्या पाण्याचे जार वितरित केले जात आहेत. आमदार…

  • पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत शिवसेना उपनेते मा. आ.ज्ञानराज चौगुले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

    मुरूम / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक 2026 साठी आज शुक्रवारी मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडत आहे. या निवडणुकीत उमरगा येथे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदान करून लोकशाहीचा आदर्श घालून दिला. उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशाला या मतदान केंद्रावर सकाळी ज्ञानराज चौगुले यांनी सहकुटुंब हजेरी लावली. त्यांनी…

  • आमदार सुनिल कर्जतकर यांची परंडा भाजपा संपर्क कार्यालयास भेट!

    आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे पूर्व प्रदेश सहसंघटन मंत्री, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व विधानपरिषदेचे सदस्य आमदार सुनिल कर्जतकर यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता त्यांचा भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा परंडा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत…

  • धाराशिव जिल्ह्यातील १४,३९३ एपीएल शेतकरी कुटुंबांना मिळणार रेशनचे धान्य; गावातच करता येणार अर्ज

    रेशन धान्यात कपात करणाऱ्या वर लक्ष ठेवण्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना रेशनच्या लाभासाठी सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी गावपातळीवरच अर्ज स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पात्र असूनही एकही कुटुंब अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही विशेष व्यवस्था करण्यात…

  • धाराशिव जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी अंदाजे 62.53% मतदान

    महायुतीचे सतीश चव्हाण, महाविकास आघाडीचे डॉ प्रतापसिंह पाटील यांच्यासह इतर उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यातील 76 मतदान केंद्रावर आज शुक्रवारी शांततेच्या वातावरणात अतंत्य चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 4-00 वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी जिल्ह्यात अंदाजे 62.53% मतदान झाले. आज सकाळी 8-00 वाजल्यापासून जिल्ह्यातील 76 मतदान केंद्रावर शांततेच्या…

  • बळीराजा नवचेतना अभियानांतर्गत तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांची मेडसिंगा येथे गावभेट

    शेतकरी व ग्रामस्थांशी साधला संवाद धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने ‘बळीराजा नवचेतना अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री…

  • दुष्काळात चारा उत्पादन वाढविण्यासाठी गाळपेर जमिनीचा उपयोग करा – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची पाहणी ; शेतकऱ्यांशी संवाद साधून चारा लागवडीसाठी मार्गदर्शन धाराशिव / प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर स्वतःच्या उदरनिर्वाहाबरोबरच मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पावसाअभावी शेतातील पिके बाधित झाल्याने आगामी काळात पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर करून चारा…

  • पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज

    जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वितरण धाराशिव / प्रतिनिधी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,२३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून,ही निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण ७६ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, २९ हजार १४५ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार…