Live News…..Breaking News!

.

  • युवा नेते मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मेघ पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण 

    धाराशिव   /  प्रतिनिधी युवा नेतृत्व मल्हार राणाजगजीतसिंह  पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मेघ पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम केक कापून मल्हार दादा पाटील यांना अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, आज वाढदिवसाचे निमित्त…

  • जिल्हा पतंजली समितीतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

    धाराशिव   /  प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा पतंजली समितीतर्फे जिल्हाभर विविध ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यक्रम तुळजाभवानी स्टेडियम येथे उत्साहात पार पडला. मुख्य कार्यक्रमात योगशिक्षक तथा पतंजली स्वाभिमान ट्रस्टचे श्री. राम ढेरे आणि श्री. रविजीत देडे यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व सांगत विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच जिल्हा सत्र न्यायालय…

  • सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

    तुळजापूर   /  प्रतिनिधी  मोहरम नंतरची सुट्टी तसेच शनिवार – रविवारच्या सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सोमवारी वटपोर्णिमा असल्याने व नंतर देवीचा वार मंगळवार असल्याने भाविकांचा हा ओघ असाच बुधवारपर्यंत कायम राहणार आहे. मंदिर परिसरात चालू असलेल्या विकास कामांमुळे मंदिरातील कमी जागा उपलब्ध होत असल्याने  सशुल्क…

  • जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ यांच्याकडून विद्यार्थ्यांना परीक्षा पँडचे वाटप

    धाराशिव    /  प्रतिनिधी  विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची बक्षिसे दिले जातात. अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे साहित्य म्हणजे परीक्षा पॅड. ते वाटप करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद सदस्य अजित लाकाळ यांनी आपल्या मतदारसंघात हाती घेतला आहे. मतदार संघातील १० गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप करून विद्यार्थी प्रिय उपक्रम राबविला आहे. वाढदिवसानिमित्त अनेक…

  • तुम्ही कितीही गद्दार फोडा, तुमच्या उरावरती भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ओमराजे सारख्या गद्दाराला तिकीट दिले ही माझी चूक ; खोक्याच आमिष लाथाडणारा कैलास हाच खरा शिवसैनिक धाराशिव   /  प्रतिनिधी काहीजण म्हणतात उद्धव ठाकरे फिरत नाहीत, मी कालपासून फिरतोय, मी फिरल्यानंतर काय होते हे तुम्ही पाहताय. गद्दारांचे नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही. माझी सभा नसून कौटुंबिक बैठक आहे सगळे माझे कुटुंबीय आहेत मी…

  • शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संवाद दौ-यास मोठया संख्येने उपस्थित रहा –

    सहसंपर्क प्रमुख शंकरराव बोरकर यांचे आवहान  धाराशिव   /  प्रतिनिधी धाराशिव येथे  रविवार दि.२८ जून रोजी सिध्दाई मंगल कार्यालय येथे दुपारी ३-०० वा. आयोजित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संवाद  मेळाव्यास धाराशिव जिल्हयातील सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने  उपस्थित रहावे असे आवहान धाराशिव जिल्हयाचे शिवसेना (उबाठा ) सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर यांनी केले आहे. या सवांद मेळाव्यास युवासेना…

  • अभाविपच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि नूतन शहर कार्यकारिणीची घोषणा

    धाराशिव   /  प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव शाखेच्या वतीने सोमवार, दिनांक २२ जून २०२६ रोजी व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारच्या सत्रात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या १०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच आगामी वर्ष २०२६-२७ साठी अभाविपच्या…

  • मन की बात कार्यक्रम प्रत्येक बूथवर राबवावा – जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

    धाराशिव   /  प्रतिनिधी धाराशिव येथे आज आयोजित करण्यात आलेली SIR एसआयआर  कार्यशाळा तसेच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे नियोजन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रदेश सरचिटणीस सुनिल राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.  धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघासाठी आर्यन फंक्शन हॉल, सांजा रोड, धाराशिव येथे तर भूम–परंडा–वाशी…

  • जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ डॅा. राशीनकर यांचा मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

    परंडा   /  प्रतिनिधी  परंड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ प्रा. डॅा. श्री. गजानन राशीनकर यांचा जगातील टॅाप शास्त्रज्ञांत समावेश झाल्याबद्दल डॅा. राशीनकर यांचा भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परंडा येथील भूमीपुत्र असलेले प्रा. डॉ. गजानन राशीनकर हे शिवाजी विद्यापीठात आघाडीचे संशोधक व रसायनशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांनी…

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिवच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी

    धाराशिव  /  प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समिती धाराशिवच्या वतीने दिनांक २६ जून २०२६ रोजी राजर्षी  छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती राजर्षी छत्रपती शाहू चौक धाराशिव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली   नगर परिषद धाराशिव च्या नगराध्यक्षा नेहाताई  काकडे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले .…