Live News…..Breaking News!

.

  • उमरगा तालुक्यातील सिमावर्ती भागात कारहुणी कर्नाटकी बेंदुर व वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा

    उमरगा / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील कदेर येथे कर्नाटकी बेंदुर तथा कारहुणी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात सोमवार दि. २९ रोजी साजरा केला. वटपोर्णिमा हा सण विवाहीत महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. पतीला दिर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुखसमृद्धी लाभावे यासाठी जेष्ठ शुध्द पोर्णिमेला महिला वटवृक्षाची ( वडाची ) पुजा करून हे व्रत करतात. हे व्रत अखंड सौभाग्य…

  • बुकनवाडी जि. प. प्रशालेत शालेय साहित्याचे वाटप

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथील शिवप्रताप सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने बुकनवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील ८० विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना वह्या, पुस्तक,पेन, पाण्याची बाटली वाटप करण्यात आली. यावेळी शिवप्रताप सामाजिक बहुउद्देशीय संस्थचे अध्यक्ष शिवाजी भोसले, सचिव सुधाकर बुकन, उपाध्यक्ष सुदर्शन बुकन, इंद्रजित बुकन, मुख्याध्यापक प्रकाश खडके,शांता सलगर आदी उपस्थित होते.

  • नळदुर्ग -हगलूर एस.टी. सेवेचा शुभारंभ; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

    नळदुर्ग / प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाने नव्याने नळदुर्ग ते हगलूर एस.टी. बस सेवेची फेरी सुरु केल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या बससेवेमुळे हगलूर, मानेवाडी,साखर कारखाना, वसंतनगर येथील मुला- मुलींसाठी अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे,शेकडो विद्यार्थिनी दररोज नळदुर्ग येथे शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी ये- जा करतात तसेच परिसरातील ग्रामस्थ खरेदीसाठी बाजार पेठेत…

  • परंडा बस स्थानकातील शौचालय इमारतीसमोरचा स्लॅप कोसळला ; प्रवाशांचा जीव धोक्यात

    परंडा / प्रतिनिधी परंडा शहरात काल दिनांक 28 जुन रोजी शहरांत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे परंडा शहरातील बसस्थानक परिसरातील शौचालय इमारतीचा पुढचा भाग कोसळला असून प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. दरम्यान सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे बस स्थानकावर येणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. दुपारी १…

  • पुजारी तांडा ,पाटील तांडा, धनगरवाडी तांडा येथे बससेवा सुरू ; प्रवाशांमधून स्वागत

    अणदूर / प्रतिनिधी तुळजापुर तालुक्यातील अणदूर परिसरातील पुजारी तांडा, पाटील तांडा, धनगरवाडी तांडा येथे आज(29 जून)रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, तुळजापूर आगाराची बस सेवा सुरु झाली. या बससेवेचा शुभारंभ अणदूर विद्यानगरीचे सरपंच रामचंद्र आलुरे,जि.प.सदस्य जितेंद्र कानडे, ग्रा.प.सदस्य बाळकृष्ण घोडके,बालाजी घुगे, सिद्रामप्पा धमुरे या मान्यवरांच्या शुभहस्ते बसचे पूजन संपन्न झाले.गेल्या दोन वर्षांपासून तांड्यावरील नागरिक,जवाहर विद्यालय,…

  • तुळजापुर विकास आराखडयासंदर्भात खासदार ओमराजे यांची शिवसैनिकांनी घेतली भेट

    तुळजापुर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसराचा आणि शहराचा सर्वांगीण विकास करणाऱ्या ‘तुळजाभवानी विकास आराखड्या’ची अंमलबजावणी वेगाने व्हावी, यावर तुळजापुराती शिवसैनिकांनी चर्चा केली.दरवर्षी कोट्यवधींच्या संख्येने तुळजापुरात येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधा, दर्शन व्यवस्था, निवास व्यवस्था आणि वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे खासदारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.आराखड्याची अंमलबजावणी करताना स्थानिक…

  • मोदी सरकारची तपपूर्ती; तुळजापूर जवळ विमानतळ उभारणार – आ. पाटील

    जुलै २०२७ पर्यंत तुळजापूरला रेल्वे मार्गाने जोडणार धाराशिव   /  प्रतिनिधी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या बारा वर्षाच्या कार्यकाळात देशाची सर्वांगीण प्रगती झाली असून देशाचा सर्व क्षेत्रात चौफेर  विकास सुरू आहे यामुळे देशातील व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढले असून व जिल्ह्याशी व मराठवाड्याशी संबंधित योजनांना देखील मोठे बळ मिळाले असल्याचे…

  • धाराशिव येथे पल्स पोलिओ अभियानाचा पं.स.सभापती गोकर्णा कदम यांंच्या हस्ते शुभारंभ

    धाराशिव   /  प्रतिनिधी  राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड धाराशिव येथे धाराशिव पंचायत समितीच्या सभापती सौ गोकर्णा  गोपाळ कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डाँक्टर  सतीश हरिदास , जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारु डाँक्टर कुलदीप मिटकरी ,  तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरी तसेच आरोग्य अधिकारी, …

  • गुणवत्ता असेल तर यश नक्की मिळते – खासदार ज्योतीताई वाघमारे

    ज्ञानज्योती पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न मुरुम    /  प्रतिनिधी गुणवत्ता असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश नक्की मिळते असे विचार शिवसेनेच्या राज्यसभा खासदार ज्योतीताई  वाघमारे यांनी व्यक्त केले.  ज्ञानज्योती फाऊंडेशन, उमरगा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळयात त्या बोलत होत्या. आज रविवार दि.28 फेब्रुवारी 2029 रोजी शांताई मंगल कार्यालय,…

  • उमरगा तालुक्यात पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद, वीटभट्टीवरील बालकांना पोलिओ डोस

    उमरगा   /  प्रतिनिधी उमरगा तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र एकुरगा येथे ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाच्या पथकाने गावातील लाभार्थी बालकांबरोबरच लक्ष्मी पाटी परिसरातील वीटभट्ट्यांवरील जोखीमग्रस्त भागात जाऊन स्थलांतरित व कामगारांच्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांनाही पोलिओ डोस…