धाराशिव / प्रतिनिधी आज दिनांक 1/07/2026 रोजी आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे, सीए दिन व शेतकरी दिन या निमित्ताने रोटरी क्लब धाराशिव व वूमन डॉक्टर्स विंग आय.एम.ए धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन शासकीय रुग्णालय रक्तपेढी येथे करण्यात आले होते. यावेळी रोटरी अध्यक्ष रो.इंद्रजीत आखाडे व सचिव रो. निशांत होनमुटे यांनी रोटरी क्लबच्या वतीने केलेल्या रक्तदान…
धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने दिनांक २७ व २८ जून रोजी इरा इंटरनॅशनल स्कूल, सांजा रोड, धाराशिव येथे दोन दिवसीय जिल्हा अभ्यासवर्ग उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अभ्यासवर्गात जिल्हाभरातून एकूण ४५ कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये ३२ विद्यार्थी,९ विद्यार्थिनी, ४ प्राध्यापकाचा समावेश होता.या अभ्यासवर्गातील स्व. प्रा. यशवंतराव केळकर प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन समता…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या ( एमएसआयडीसी ) कारभाराची आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात पोलखोल करीत गंभीर आरोप केले. धाराशिव येथील मेडिकल कॉलेज इमारतीच्या टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला, कागदपत्रे मागवूनही ती खोटी दिली जाते. निवृत्त्त अधिकारी नको तुकाराम मुंडे सारखा अधिकारी द्या अशीच मागणी आमदार पाटील यांनी सरकारकडे…
वाशी / प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे शिल्पकार कै. वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये पंचायत समिती वाशी सभागृहामध्ये साजरी करण्यात आली. जयंतीदिनी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांना वृक्ष देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास सभापती श्रीमती प्रणिता प्रवीण गायकवाड , उपसभापती नितीन रणदिवे , गटविकास अधिकारी रवींद्र जाधव , सहाय्यक गटविकास अधिकारी युवराज मिराजकर ,…
जनहित याचिका दाखल करणार धाराशिव / प्रतिनिधी बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ या कायद्यामुळे ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला आहे. मात्र, राज्य सरकार दिवसागणिक एक जीआर काढून शिक्षण क्षेत्र उध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारा शिक्षक शैक्षणिक कामाऐवजी इतर कामात गुरफटलेला आहे. त्यामुळे सक्तीच्या…
SIR मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार धाराशिव / प्रतिनिधी काँग्रेस पार्टी जिल्हा धाराशिव यांच्यावतीने विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील बीएलए2 /BLA-2 प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी काँग्रेस भवन, धाराशिव येथे झालेल्या या शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस डॉ. रेखाताई…
१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास आणि त्यासाठी आवश्यक…
धाराशिव / प्रतिनिधी हिमोफिलियासारख्या दुर्मिळ अनुवांशिक रक्तस्त्राव विकारावर आयुर्वेदाच्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणाऱ्या जगातील पहिल्या संरचित क्लिनिकल संशोधन प्रकल्पाचा यशस्वी समारोप धाराशिव येथे झाला.शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव आणि ‘रक्तामृत इन हिमोफिलिया संशोधन व विकास विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभिनव संशोधन प्रकल्पाच्या समारोप सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी…
परंडा / प्रतिनिधी – परंडा येथे शेतकऱ्यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी १०० टक्के अनुदानावर मका बियाणे परंडा तालुक्यात पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद धाराशिव जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे यांच्या हस्ते बियाणे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांच्या पशूंना मुबलक चारा उपलब्ध होण्यासाठी पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांना मका बियाणे मोफत देत असून तालुक्यातील सर्व सर्कल गट गण…
धाराशिव / प्रतिनिधी जी रामजी योजनेच्या माध्यमातून वैयक्तीक सिंचन विहिरी पुर्ण झाल्या आहेत. आता त्यांना पुन्हा अपलोड करण्यास सांगितले तर ते शक्य नाही त्यामुळं ही अट वगळून पैसै द्यावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली. आमदार कैलास पाटील म्हणाले की, वैयक्तीक सिंचन विहिरीचे कामे होतात. पण ज्यावेळी लाभार्थ्यानी चार नंबर चा अर्ज भरलाय…