उमरगा / प्रतिनिधी उमरगा शहरातील नागरिकांसाठी आधुनिक, पर्यावरणपूरक आणि आकर्षक विरंगुळ्याचे केंद्र ठरणाऱ्या ‘नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवार दि. 3 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी चेअरमन जितेंद्र दादा शिंदे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा परिषद धाराशिवच्या उपाध्यक्षा उषाताई गायकवाड तसेच उमरगा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष किरण…
धाराशिव / प्रतिनिधी बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा संदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज प्रत्यक्ष शेतात उतरून दिला.धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील प्रगतिशील शेतकरी किरण तीर्थकर यांच्या शेतात श्री.पुजार यांनी स्वतः बीबीएफ पेरणी यंत्र…
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई निश्चित करताना सध्या वापरण्यात येणारी ‘तांत्रिक उत्पादन’ निश्चितीची पद्धत अनेकदा शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची अचूक माहिती दाखवत नाही. त्यामुळे हजारो शेतकरी विमा भरपाईपासून वंचित राहत आहेत. या पद्धतीऐवजी पीक कापणी प्रयोगालाच प्राधान्य देण्यात यावे, अशी ठाम भूमिका आमदार तथा महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर…
जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेविषयक मदत केंद्राचे उद्घाटन धाराशिव / प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिकांना मोफत व योग्य कायदेविषयक मार्गदर्शन मिळावे, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढावा,या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद आणि जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कायदेविषयक मदत केंद्राचे उद्घाटन गुरुवारी प्रमुख जिल्हा व…
परंडा / शहर प्रतिनिधी परंडा शहरात मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, बस स्थानक परिसरात जनावरांनी मोठ्या प्रमाणात ठाण मांडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी तसेच नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परंडा बसस्थानक परिसरात मोकाट गायी, बैल व इतर जनावरे रस्त्यावर तसेच प्रवेशद्वाराजवळ उभी…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील स्टेट बॅक आँफ इंडियाचे शाखाधिकारी एम.के.झा यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षात आपल्या बॅकेमाफऺत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तेर येथील स्टेट…
तुळजापूर / प्रतिनिधी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाला तुळजापूर तालुक्यात अधिक गती देण्यासाठी तालुकास्तरीय कृती दल समितीची बैठक मंगळवारी (दि. ३० जून) तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडली. गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आरोग्यदायी, स्वच्छ आणि निरोगी गाव घडविण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार…
निर्यातीत वर्षभरात ३५.७० कोटींची वाढ; ‘फायटोसॅनिटरी लॅबोरेटरी’, गुणवत्ता तपासणी केंद्र व कोल्ड स्टोरेज उभारणीवर भर धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील स्थानिक उद्योग आणि कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळावे,तसेच जिल्ह्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी,यासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर विशेष भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले. जिल्हा निर्यात प्रचालन समिती (DEPC)…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुका मिशन वात्सल्य समितीची तालुकास्तरीय बैठक मा. तहसिलदार निलेश काकडे, महिला व बालसंगोपन अधिकारी गणेश कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात पार पडली.बालसंगोपन योजनेचा लाभ जास्तीत जास्त बालकांना मिळवून देणे, एकल महिलांना घरकुल योजनेत प्राधान्य देणे, पात्र लाभार्थ्यांना पेन्शन योजना, रेशन मिळवून देणे संदर्भात सविस्तर चर्चा झाली. तसेच पुढील महिन्यात बालसंगोपन योजनेसंदर्भात…
धाराशिव / प्रतिनिधी आज दिनांक एक जुलै 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती धाराशिव पंचायत समिती कार्यालयामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. धाराशिव पंचायत समितीच्या सभापती सौ. गोकर्णा गोपाळ कदम यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या…