गाळप क्षमता १२०० वरून २५०० TCD; विजयादशमीला आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता नॅचरल शुगर्स युनिट क्र. ०१, पाडोळी येथे विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गूळ पावडरच्या आठव्या गळीत हंगामाचा मोळी पूजन समारंभ उत्साहात पार पडला. कारखान्याची गाळप क्षमता १००० TCD वरून २५०० TCD पर्यंत वाढविण्यात आली असून, रुपामाता परिवाराच्या औद्योगिक प्रगतीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला…
तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज, मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी नवमीच्या दिवशी होमवरील धार्मिक विधीने नवरात्रौत्सवाचे घटोत्थापन करण्यात आले. दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मंदिरात विधिवत शारदीय नवरात्र उत्सवाची घटस्थापना करण्यात आली होती. नवरात्र महोत्सवाच्या नऊ दिवसांच्या कालावधीत श्री तुळजाभवानी मंदिरात विविध धार्मिक विधी, होम-हवन व पूजाअर्चा पार…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथे कै.डाॅ.चंद्रकलादेवी पाटील स्मृती सन्मान पुरस्काराचे वितरण थोडसरवाडी येथील दिपाली थोडसरे यांना आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.गेल्या चार वर्षांपासून तेर येथील नरहरी बडवे हे तेर येथील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महीलेला कै.डाॅ.चंद्रकलादेवी पाटील स्मृती सन्मान पुरस्कार देतात.स्मृती चिन्ह,मानपत्र व अकराशे रुपये देऊन गौरविण्यात येते.यावेळी संयोजक नरहरी बडवे, शिवाजीराव नाईकवाडी,…
लोमटे परिवाराच्या वतीने सत्कार धाराशिव / प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धाराशिव तालुक्यातील तेरणा नदीच्या तीरावर वसलेल्या तुगाव येथील जागृत देवस्थान श्री आयराई देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त धाराशिव शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे यांनी तालुका चिटणीस सचिन लोमटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी आई अंबाबाई देवीच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख-समृद्धी,…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेने डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना जाहीर व सक्रिय पाठिंबा दिला आहे. शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या संघटनेने डॉ. पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.शिक्षक भारतीचे अध्यक्ष…
क्षेत्रोपाध्ये प्रसन्नकुमार कोंडो यांचेमार्फत केली पूजा. तुळजापूर / प्रतिनिधी विश्वविख्यात राष्ट्रीय कीर्तनकार, प्रवचनकार, अभिनेते, गायक, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार विजेते डॉ.श्री. चारुदत्त गोविंद स्वामी आफळे यांनी श्री.तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन पूजा, आरती केली. आफळे घराण्याचे क्षेत्रोपाध्ये प्रसन्नकुमार कोंडो यांनी पूजाविधी संपन्न केले. त्यानंतर त्यांनी श्री. रामदासस्वामी संस्थान सज्जनगड च्या साळुंके गल्ली येथील प्रसन्नकुमार कोंडो यांचे…
तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज, सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त मंदिर परिसरातील होमकुंडावर वैदिक होम-हवन विधी पार पडला. या यज्ञ कुंडामध्ये कोहळा व नारळ यांची पूर्णाहुती देऊन होम संपन्न झाला. होमकुंडावरील वैदिक होम-हवन विधीचे यजमान जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार व…
तुळजापूर / प्रतिनिधी नवरात्र उत्सवानिमित्त तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे लोकमंगल परिवार व लोकमंगल मल्टीस्टेट शाखेच्या वतीने नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुळजापूर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा लोकमंगल परिवार व लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने नवदुर्गा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमंगल मल्टीस्टेट चे संचालक सचिन अडगळे, शाखाधिकारी राजकुमार पवार, फजल सिद्धकी, खंडेराव देवकर, रोशनी…
तुळजापूर / प्रतिनिधी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानीच्या चरणी महिला भगिनींनी भक्तिमय सेवा अर्पण केली. धाराशिवच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी मातेच्या पवित्र चरणी तुळजापूर येथे ५१ महिलांच्या सहभागातून श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन आणि कुंकुमार्चनाचा मंगलमय सोहळा अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. आदिशक्तीच्या…
बसवंतवाडीतील सोयाबीन पीक नुकसानीची डॉ.राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी ; शेतकऱ्यांशी थेट संवाद धाराशिव / प्रतिनिधी कष्टाने पेरलेले सोयाबीनचे पीक ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे हातचे गेले.शेतात सोयाबीनची झाडे उभी आहेत, मात्र त्यांची वाढ खुंटली असून, शेंगांमध्ये दाणेही बारीक राहिले आहेत.उत्पादनाचा खर्चही निघेल की नाही,अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.दुसरीकडे जनावरांसाठी चारा शिल्लक नसल्याने पशुधन…