Live News…..Breaking News!

.

  • धाराशिवच्या नगराध्यक्षा आणि पं. स. सभापती यांच्या हस्ते ढोकीत बक्षीस वितरण

    ढोकी / प्रतिनिधी. धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील आदिमाया, आदिशक्ती कामगार शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने होम मिनिस्टर व नवदुर्गा पूजन आदी कार्यक्रमास धाराशिव नगरपरिषदच्या नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे आणि , पंचायत समितीच्या सभापती गोकर्णताई गोपाळराव कदम ,नगरसेविका आदि मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम संपन्न झाला. महिलांनी उत्स्फूर्तपणे, मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या प्रसंगी या खेळाचे मानकरी…

  • तेरच्या अंजली इंगळे यांनी केली वनस्पती शास्त्रात पीएचडी पूर्ण

    तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील अंजली अतुल इंगळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून वनस्पतीशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.त्यांच्या संशोधनाचा विषय “निवडक बियाण्यांतील बुरशीजन्य मर रोगकारकांचा अभ्यास व त्यांच्या नियंत्रणाच्या उपाययोजना” (Studies on Fungal Wilt Pathogens of Selected Seeds and Their Controlling Strategies) हा होता.त्यांनी हे संशोधन महात्मा गांधी…

  • तेर येथे विजयादशमी उत्साहात साजरी

    तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथे विजयादशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तेर येथील कोष्टांबिकादेवी मंदिरात नवरात्र महोत्सवात दररोज दर्शनासाठी भाविक,भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत होते. अष्टमीच्या रात्री होमहवन करण्यात आले. तर विजयादशमी दिवशी उपसरपंच श्रीमंत फंड यांच्या हस्ते शमिपूजन करून सिमोल्लघंनास प्रारंभ झाला. विजयादशमी दिवशी श्री संत गोरोबा काका यांची पालखी श्री संत…

  • राष्ट्रपती यांच्या हस्ते सिद्धार्थ शिंगाडे यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय कला पुरस्कार प्रदान

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ चे माजी विद्यार्थी सिद्धार्थ शहाजीराव शिंगाडे यांना भारत सरकार ललित कला अकादमीच्या वतीने “राष्ट्रीय ललित कला पुरस्कार” राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.सदरील पुरस्कार वृक्ष या शीर्षकाच्या कलाकृतीच्या चित्रास प्राप्त झाला असून पुरस्काराचे वितरण राजधानी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र १५…

  • परंडा येथील श्री बनशंकरी मंदिरात दांडिया उत्सव साजरा

    परंडा / प्रतिनिधी श्री.बनशंकरी मंदिर परंडा येथे नवरात्र उत्सवानिमित्त दिनांक 12 ते 19 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी 7-00 ते 10 वा. दरम्यान दांडीया उत्सव उत्साहात साजरा झाला. यामध्ये परंड्यातील दररोज किमान 200 महिलांचा सहभाग होता. तसेच मंदिर परिसरातील सर्व हिंदू-मुस्लिम भगिनी, मुले-मुली हा कार्यक्रम पाहण्यासाठी बहुसंख्येने जमत होते. कार्यक्रमादरम्यान दिनांक 17 व 18 ऑक्टोबर रोजी मुलांसाठी…

  • योगीराज हॅास्पीटलच्या 4D सोनोग्राफी मशिनचे मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण!

    परंडा / प्रतिनिधी येथील योगीराज मल्टीस्पेशालिटी हॅास्पीटल येथे नवीन अत्याधुनिक 4D सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण भाजपा नेते मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी परंडा आणि परिसरातील रुग्णांना विशेषतः गरोदर मातांना येथे ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि त्यांच्याकडील यापूर्वीची वापरात असलेली सोनोग्राफी मशिन धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक…

  • श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

    तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री क्षेत्र तुळजापूर येथे उत्साहात संपन्न झाला. उगवत्या सूर्याच्या साक्षीने, कुंकवाची मुक्त उधळण करत, पारंपरिक संबळाचा निनादात आणि ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषात हा धार्मिक सोहळा पारंपरिक रीतिरिवाजांनुसार पार पडला. या सोहळ्यानंतर देवीच्या श्रमनिद्रेस प्रारंभ झाला असून, सोमवार,…

  • धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाचा राज्यस्तरीय मेळावा; ९०० मुले अन अवघ्या ३०० मुलींची नोंदणी; पालकांमध्ये चिंतेचे ढग;​

    ‘मुला-मुलींना समजून घेण्यासाठी वेळ द्या ‘; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन ​धाराशिव / प्रतिनिधी ​बदलत्या सामाजिक – आर्थिक समीकरणांमुळे मराठा समाजात मुलांच्या विवाहाचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे. वाढत्या अपेक्षा, शेती आणि ग्रामीण पार्श्वभूमीबद्दल निर्माण झालेली अनास्था, तसेच स्त्री-पुरुष प्रमाणातील तफावत यांमुळे शेकडो तरुण ‘विवाह उत्सुक’ असूनही स्थळ जुळत नसल्याचे विषण्ण करणारे…

  • होमहवन आणि पूर्णहुतीने येडेश्वरी देवीचे नवरात्रौत्सवाचे

    येरमाळा / प्रतिनिधी आश्विन शुद्ध नवमीला येडेश्वरी देवीचा नवरात्र उत्सवातील सोमवार दि. 19 रोजी उत्तररात्री देवीचे मानकरी तसेच पुजाऱ्यांच्या हस्ते होमहवन पूजेला सुरुवात झाली. उत्तररात्री ते  मंगळवार दि 20. रोजी पहाटे पर्यंत चाललेल्या होम हवन पूजेनंतर पहाटे कोहळ्याची पूर्णाहुती देऊन होमहवन करण्यात आले. नवरात्रीच्या उपवासानंतर देवीला पूर्णाहुती,होमहवन नंतर पुरणपोळीचा , कडकन्याचा नेवैद्य दाखवण्यात आला. नवरात्रीच्या…

  • अनंतदास महाराज पुण्यतिथी निमित्त स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी येथील परमपूज्य अनंतदास महाराज यांच्या ६३ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी मंडळाचे कार्यवाह गोविंदराव अयाचीत , कविता कुलकर्णी , रामचंद्र सोनटक्के, गुरुकुल चे आचार्य श्री शेखर कुलकर्णी , डॉ. मनीष देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात…