Live News…..Breaking News!

.

  • तीर्थ बुद्रुक येथे श्री सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

    नवनिर्वाचित आ.बसवराज पाटील यांचा होणार सत्कार तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम येथे केदारपिठाचे लिं जगदगुरु श्री सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार दिनांक 15 जुलै रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी केदारपिठाचे वर्तमान जगदगुरु श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी व पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज…

  • खंडेराव मुळे धाराशिव रत्न पुरस्काराने सन्मानित

    अणदूर ( म. नेता ) धाराशिव फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त दि.११ जुलै २०२६ रोजी,टिळक स्मारक मंदिर पुणे येथे अत्यंत मानाच्या “धाराशिव भूषण पुरस्कार २०२६” ने ज्येष्ठ संगीत उपासनकार खंडेराव मुळे यांना सन्मानित करण्यात आले.आजवर विविध संस्थांकडून अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. प्रत्येक सन्मानाने माझ्या कलाप्रवासाला नवी ऊर्जा दिली. मात्र धाराशिव फाऊंडेशन कडून मिळालेला हा पुरस्कार…

  • आ. राणादादांनी घेतला धाराशिव शहरातील विकासकामांचा आढावा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील ज्येष्ठ सहकारी, नगर पालिकेचे सदस्य तसेच शहरातील काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत आज सोमवारी मित्र चे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी बैठक घेतली. धाराशिव शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा त्यांच्याकडून सविस्तर आढावा घेतला.यावेळी शहरातील आठवडी बाजार, शहरातील रस्त्यांची कामे, रस्त्यांची गुणवत्ता, दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छता तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून…

  • गोळीबार व दगडफेक प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी परंडा येथे आमरण उपोषण

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील लोणी येथे 21/10/ 2024 मध्ये विठ्ठल सर्जेराव शिंदे यांच्या घरावर कुटुंबावर काही गाव गुंडांनी गोळीबार केला होता यातील आरोपीं विरोधात परंडा पोलीसात 2024 मध्ये गुन्हा दाखल आहे . परंतु या गुन्ह्यातील आरोपींना परंडा पोलीस सहकार्य करून पाठिशी घालत आहेत व गुन्ह्याचा तपास करण्यास हयगय व निष्काळजीपणा करीत आहेत असे शिंदे…

  • पालिका शिक्षण सभापती प्रवीण माळी यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर व सामाजिक कार्यक्रमांव्दारे साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव नगरपालिकेचे शिक्षण सभापती भाजपा युवा नेते प्रवीण भैय्या माळी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील राजमाता जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन युवा नेते मल्हार दादा पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा सौ. नेहाताई काकडे उपस्थित होत्या. त्याचबरोबर अभिजीत काकडे. विलास लोंढे, सिद्धार्थ बनसोडे,…

  • आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष बसेस सोडणार..

    परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार. धाराशिव   /  प्रतिनिधी  आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या  दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून  यात्राकाळात ५ हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती …

  • विधानपरिषद उपसभापती मा. सचिन अहिर यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले

    तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा. उपसभापती मा. श्री. सचिन अहिर यांनी आज (दि. 12 जुलै 2026) सहकुटुंब श्रीक्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी मातेचे विधिवत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची आरती करून देवीचे आशीर्वाद घेतले तसेच राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांतता व सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. यावेळी मा. उपविभागीय अधिकारी, धाराशिव तथा श्री…

  • श्री तुळजाभवानी मातेस २८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण

    तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी श्री क्षेत्र उमरखेड, जि. यवतमाळ येथील श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे मठाधिपती परमपूज्य माधवानंद गुरुवामनानंद स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते श्री तुळजाभवानी मातेस विधिवत अभिषेक, पूजा-अर्चा व ओटी भरण्यात आली. याप्रसंगी श्री चिन्मय मूर्ती संस्थानचे कुलमुखत्यार ॲड. श्री महेश कनकदंडे व सौ.…

  • रुपामाता नॅचरल शुगर पाडोळी येथे मिल रोलर पूजन उत्साहात; गाळप क्षमता २८०० टनांपर्यंत वाढ

    धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता नॅचरल शुगर यु. क्र. ०१, पाडोळी (आ.), ता. जि. धाराशिव येथे गाळप हंगाम २०२६–२७ निमित्त आयोजित मिल रोलर पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समारंभाची विधिवत पूजा रुपामाता परिवाराचे मार्गदर्शक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी) आणि ह.भ.प. बाबुरावजी पुजारी यांच्या शुभहस्ते पार पडली. विधिवत पूजा करून गाळप हंगाम…

  • मुलीच्या वाढदिवसानिमित्त दाळींब जि.प. शाळेत मिष्टान्नाचे वाटप व वृक्षारोपण

    इगवे कुंटुबिंयांचा स्तुत्य उपक्रम उमरगा / प्रतिनिधींनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दाळींब , येथे दररोज विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जाते त्यानुसार मुख्याध्यापक कोकळगावे ए. एन. यांच्या आवहानाला प्रतिसाद म्हणून इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी प्रगती सुधीर इगवे हिच्या अकराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुधीर इगवे व रुक्मिण इगवे या दांपत्याकडून शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांनाचे वाटप व १२१ झाडांचे…