केंद्रीय समितीचे विमा कंपनीला आदेश; धाराशिवच्या बळीराजाने जिंकली कायदेशीर लढाई! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप २०२५ च्या पिकविमा संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीने कायम ठेवले आहे. पिकविमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावत पुढील सात दिवसात…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील अनाळा येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद चिंतामणी तर उपाध्यक्षपदी जालिंदर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . या निवडीचा कार्यक्रम दि. १३ रोजी जि . प . शाळेत संपन्न झाला . पूर्वीच्या शालेय समिती )चा कार्यकाल संपल्याने नुतन समिती स्थापन करण्यात आली. नुतन सदस्यपदी अनुराधा…
धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या “झाडे लावा, झाडे जगवा” या आवाहनास प्रतिसाद देत धाराशिव शहरातील नूतन बांधण्यात आलेल्या मुख्य बसस्थानक परिसरात नगराध्यक्ष सौ नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते तर विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. एसटी…
धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय काँग्रेस आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी प्रभावी कनेक्ट सेंटर उभारण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या कामाची…
नळदुर्ग / प्रतिनिधी एसटी च्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या एस टी स्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत आज नळदुर्ग येथील एस टी स्टँड परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महामंडळाचे विभाग नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मधुरा जाधवर, आगार प्रमुख महेश रामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील कात्री गावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि शेजाऱ्याची मोटारसायकल असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद साहेबराव सोनवणे (वय ४०, रा. कात्री,…
नळदुर्ग / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी पाटी जवळ पुणे -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटक राज्यातील एका कारचालकाला चार जणांनी मारहाण करून धारदार शस्त्र व लोखंडी रॉडचा धाक दाखवीत लुटल्याची घटना शनिवार (११)रोजी पहाटेच्या सुमारास घडली. फिर्यादी अभिजीत संजीव रेड्डी ( रा. हाउसिंग बोर्ड कॉलनी, हुमनाबाद कर्नाटक) हे आपल्या मित्रासह कारने हुमनाबादहून पुणेच्या दिशेने निघाले होते,लांबचा प्रवास…
परंडा / प्रतिनिधी मौजे बावची ता. परंडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरपणे यांचा वाढदिवस जि.प.के.प्र. शाळा, गवारे वस्ती शाळा, अंगणवाडी 1,2 बावची येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ , वही, पेन , बिस्कीट, चॉकलेट वाटप करून विद्यार्थ्यासोबत साजरा केला. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण, तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अंतर्गत एनएसडीएल NSDL…
उमरगा रोटीराचा ” पर्यावरणावर बोलू काही ” उपक्रम उमरगा / प्रतिनिधी उमरगा शहरातील आदर्श विद्यालय येथे प्राचार्य सैपन शेख यांच्या हस्ते उमरगा शहर रोटरी क्लब यांच्यावतीने “पर्यावरणावर बोलू कांही” या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उमरगा रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मदन सुरे यांनी रोटरी क्लब उमरगा यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या “पर्यावरणावर बोलू कांही ” या…
‘सेव्ह अर्थ’चा जागर करत २८० किमी सायकल प्रवास यशस्वी धाराशिव / प्रतिनिधी पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देत ” सेव्ह अर्थ ” “Save Earth” या संकल्पनेवर आधारित धाराशिव–पंढरपूर– धाराशिव सायकल वारी उत्साहात पार पडली. या सायकल वारीमध्ये धाराशिव शहरातील तब्बल ५० सायकलप्रेमींनी सहभाग घेतला, त्यापैकी रोटरी क्लब ऑफ धाराशिवचे १० रोटरीयनांनी सक्रिय सहभाग नोंदवत संपूर्ण २८०…