Live News…..Breaking News!

.

  • सीना – माढा बोगद्यातून तात्काळ पाणी सोडण्याची माजी आमदार राहुल मोटे यांची मागणी

    परंडा / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील सीना नदी ही जिल्ह्याची जीवनदायिनी आहे. उजनी धरणातील पाणी सीना – माढा बोगद्याद्वारे परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळते. सध्या उजनी धरणात 50% प्लस पाणीसाठा उपलब्ध असतानाही सीना – माढा बोगद्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे खालील गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत परंडा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील रब्बी…

  • अतिक्रमण स्वच्छता व दारूबंदीसाठी अणदूरच्या युवकांचे ठिय्या आंदोलन

    अणदूर ( म.नेता ) तुळजापुर तालुक्यातील 25 हजार लोकवस्ती असलेल्या अणदूर येथील ग्रामपंचायत सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी आज बुधवार दि. 15 रोजी युवा ग्रामस्थांच्यावतीने येथील ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शेतकरी नेते अरविंद घोडके, अण्णा महाराज, रवी मुळे व राजकुमार गाढवे यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन…

  • बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ; नुकसानभरपाईची डाँ प्रतापसिंह पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्री केंद्रातून बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र संबंधित बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडे बियाण्यांच्या पिशव्या तसेच खरेदीच्या पावत्या उपलब्ध असल्याचेही राष्ट्रवादी कॉंग्रेस (श प) पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

  • तेर येथील नाभिक समाजबांधकडून वारक-यांची सेवा

    तेर ( म. नेता ) श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना तेर येथे पालखीचे भाविकांकडून भव्य व उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी तेर येथील श्री संत सेना महाराज नाभिक मंडळाच्यावतीने वारकऱ्यांसाठी सामाजिक सेवेचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत मोफत दाढी, केस कापणे, नखे काढणे तसेच तेल मालिश अशा सेवा वारकऱ्यांना विनामूल्य…

  • खा.ओमराजे निंबाळकर यांची ३६ महसूल मंडळातील शेतक-यांना पीकविमा देण्याची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी; 

    धाराशिव / प्रतिनिधी खरीप २०२५ हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तांत्रिक त्रुटीमुळे वगळण्यात आलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील ३६ महसूल मंडळांचा तातडीने समावेश करून पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मंजूर करण्यात यावा, अशी ठाम मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात राज्य तांत्रिक सल्लागार समिती (STAC) च्या अहवालात…

  • धाराशिव पंचायत समिती उपसभापती प्रमोद पाटील यांची कसबे तडवळे जि प शाळेस भेट

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद पाटील यांनी आज मंगळवारी जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा ,कसबे तडवळे या शाळेला भेट दिली. कसबे तडवळे ही शाळा तालुक्यातील एक उत्कृष्ट शाळा असल्यामुळे आपण स्वतःहून या शाळेला भेट देऊन तालुक्यांमध्ये अशा गुणवत्तापूर्ण शाळा निर्माण करणार असल्याचे उपसभापती श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेतील…

  • शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका;

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर बैठक घेण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील खरीप २०२५ हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणात शेतकरी बांधवांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्राच्या तांत्रीक सल्लागार समितीने विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावत महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा निर्णय कायम ठेवला आहे.निर्णय म्हणजे धाराशिवच्या हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाचा…

  • एस. टी. च्या वर्धापन दिनानिमीत्त उमरगा आगारात आ. प्रविण स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण

    उमरगा / प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षारोपण उपक्रम’ अंतर्गत उमरगा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील बसस्थानके, आगार आणि विभागीय कार्यालय परिसरात सुमारे हजार ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा एक नवा अध्याय सुरू करण्यात आला…

  • “अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. दराडे यांना दि. 12.07.2026 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, स्कॉर्पिओ वाहन क्र एमएच 25 बी. एफ. 3696 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राउत पोलीस ठाणे धाराशिव शहर चे पथकाने…

  • तेर येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत

    तेर ( म. नेता ) धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासक राजेंद्र कानडे यांच्या हस्ते तसेच तेरवासीयांच्या वतीने भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. तब्बल ३३ दिवसांचा पदयात्रेचा प्रवास करत तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेली पालखी तेर येथे दाखल होताच भाविकांनी हरि नामाचा…