परंडा / प्रतिनिधी बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी संदिप अनभुले सर यांनी “ध्येय निर्धारण व नियोजन” तसेच “चांगल्या सवयी आणि नैतिक मूल्ये” या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.सुरज वळवी सर यांनी “अभ्यास कौशल्य” आणि “आरोग्याच्या चांगल्या सवयी” या विषयांवर मार्गदर्शन…
तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे दर्शनासाठी चालत जाण्यास अडचण असलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच अतिवृद्ध भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासकीय कार्यालया येथून मोफत डोली व खुर्ची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर्शनासाठी पायी चालणे शक्य नसलेल्या किंवा अडचण येणाऱ्या भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. ही सेवा मंदिर संस्थानामार्फत पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या अजेंड्यावर तब्बल ३९ विषय ठेवण्यात आले होते. जंगम मठासमोरील जागेवरील प्रस्तावित दुकाने व बांधकाम, भवानी कल्लोळतीर्थ येथील गाळ्यांचा ई-लिलाव, १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या १२ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन, शहरातील भूमिगत ड्रेनेज, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते-नाल्या, पाणीपुरवठा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सविस्तर…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे. शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख अमोल शिवाजीराव जाधव यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देऊन ही पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर…
विविध विकासकामांचा मंत्रालयात सविस्तर आढावा ; सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा,पर्यटन,आरोग्य, ऊर्जा आणि सार्वजनिक हिताच्या विविध योजनांना गती देण्यासाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ८ जुलै रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधत प्रत्येक प्रकल्पाची मुदतबद्ध अंमलबजावणी करावी…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथे स्वतंत्र विद्यापीठ उभारावे अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केली. त्यावर उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्की विचार करु असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. शिवाय मराठा समाजास ओबीसी प्रमाणे सवलती देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, मुलींना मोफत शिक्षण असूनही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने फी वसूल केली…
धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत ह. जैन यांना त्यांच्या अभिनव संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट प्रदान करण्यात आले आहे. ‘आयसोमेट्रिक रेखाचित्रांसाठी लंबवर्तुळ रेखांकन टेम्पलेट’ या शोधनिर्मितीसाठी हा पेटंट मिळाला आहे. अभियांत्रिकी शिक्षण व तांत्रिक रेखांकन क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या नावीन्यपूर्ण संशोधनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक…
राज्य शासनाकडून १.५२ कोटींच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश धाराशिव / प्रतिनिधी कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत अत्याधुनिक शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी १ कोटी ५२ लाख ४८ हजार ४१८ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून, यामुळे तालुक्यातील…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार व जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ “रघुपती राघव राजाराम” सत्याग्रह आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात श्रीराम मंदिरात “रघुपती राघव राजाराम” या भजनाच्या सामूहिक गायनाने करण्यात आली. त्यानंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात…
एमएसआयडीसीकडून सुधारित आराखड्यास मंजुरी; धाराशिव शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल — आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला आणखी वेग देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात एमएसआयडीसीने घेतला आहे. भातांब्रा–धाराशिव–सारोळा–शिवली–बोरफळ या रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे धाराशिव शहर व परिसरातील अनेक प्रलंबित विकासकामे प्रत्यक्षात…