Live News…..Breaking News!

.

  • खा. ओमराजे यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे विविध कार्यक्रम

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 17) रोजी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी धारासूर मर्दिनी देवीची महाआरती करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयात दि. 17 जुलै रोजी जन्माला आलेल्या बालकांच्या नावे एफडी करण्यात येईल. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे…

  • धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना निवेदन देत उमरगा व मुरूम येथील शासकीय रुग्णालयांतील गंभीर समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहातील शीतगृह (फ्रीझर) गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्यामुळे मृतदेहांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे…

  • शिवसेना उबाठाचे स्मार्ट मीटर व लोड शेडिंग च्या विरोधात धाराशिव येथे चक्काजाम आंदोलन

    धाराशिव / प्रतिनिधी वीज ग्राहकांना विचारात न घेता वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असल्याने व वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल येत असल्याने स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात व धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात अमर्याद इमर्जन्सी लोडशेंडीगच्या ( वीज भार नियमन) विरोधात धाराशिव येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोरील रस्त्यावर आज गुरुवारी शिवसेना उबाठा…

  • आत्मदहनाच्या इशाऱ्याने प्रशासनाला जाग; माजी सैनिक श्रीकांत गाटे यांच्या आंदोलनानंतर सुनावणीचे आदेश

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर पंचायत समिती कार्यालयात बुधवारी सकाळी घडलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे तालुक्यात खळबळ उडाली. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष तथा माजी सैनिक श्रीकांत सौदागर गाटे यांनी काटी ग्रामपंचायत हद्दीतील कथित अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी अनेक महिने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत पंचायत समिती कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,…

  • येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी

    त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील,राजाभाऊ राऊत यांची मागणी; येडशीत ‘वन टाइम वर्क’अंतर्गत विकासकामांनाही हिरवा कंदील धाराशिव / प्रतिनिधी येडशी-बार्शी-कुर्डुवाडी-टेंभुर्णी या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवालास (DPR) पुढील तीन महिन्यांत मंजुरी देण्यात येईल. त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय…

  • स्मार्ट मीटर च्या विरोधात शिवसेना उबाठाचे आज धाराशिवात चक्काजाम आंदोलन

    विधीमंडळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी आ. कैलास पाटील यांचा सत्कार धाराशिव / प्रतिनिधी आज शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या व सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महावितरणच्या स्मार्ट मीटर व लोड शेडिंग च्या विरोधात आंदोलन करण्यासंदर्भात…

  • पोलिस परिवहन विभागाच्यावतीने वारक-यांना केळी व पाणी बाँटलचे वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव पोलीस विभागातील मोटर परिवहन विभागा मार्फत श्री. संत गजानन महाराज दिंडींतील वारकरी यांचे सेवेत केळी व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले . प्रतिवर्षाप्रमाणे आषाढ महिन्यातील शुध्द पक्षामध्ये येणारी आषाढी एकादशी या एकादशी निमीत्त महाराष्ट्रात पंढरपुरची वारी ही परंपरा खुप प्रसिध्द असुन भक्त संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर व संत गजानन महाराज यांच्या…

  • सभापती म्हणून नव्हे तर विद्यार्थी म्हणूनच माझ्याकडे पहा — ॲड.आकांक्षा चौगुले

    उमरगा येथे मान्यवरांचा गौरव व सन्मान सोहळा उत्साहात मुरुम ( म. नेता ) उमरगा येथे दि. 15/07/2026 रोजी ज्ञानज्योती फाउंडेशन उमरगा व पंचायत समिती उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने उमरगा तालुक्यातील विभागीय परीक्षेद्वारे, पदोन्नतीने नियुक्त अधिकारी, सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक, सेवेत कायम झालेले साधन व्यक्ती केंद्रस्तरीय विशेष शिक्षक ,उत्कृष्ट सेवा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी,…

  • श्री संत गजानन महाराज पालखीचे धाराशिव शहरात जल्लोषात स्वागत टाळ मृदुंगाच्या गजराने धाराशिव नगरी दुमदुमली !

    जिल्हाधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष व अधिका-यांनी घेतले पालखीचे दर्शन धाराशिव / प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी दरवर्षी येणारी श्रीक्षेत्र शेगाव येथील संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे धाराशिव शहरात आज बुधवार दि.१५ जुलै रोजी टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात उत्साहात आगमन झाले. या पालखीचे शहराच्या प्रवेशद्वारावर शहराच्या प्रथम नागरीक नगराध्यक्षा नेहाताई काकडे…

  • पद्मसिंह पाटील विद्या मंदीरात शैक्षणिक साहित्य वाटप

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात आज दिनांक 15 जुलै 2026 रोजी डॉ. पद्मसिंह पाटील विद्यामंदीर , भागीरथीबाई लाटे हायस्कूल व संस्कार प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल धाराशिव येथे उस्मानाबाद जिल्हा समाजसेवा मंडळाचे सचिव पांडुरंग लाटे सर व लक्ष्मण मुंडे यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .  यावेळी  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच देणगीचे…