Live News…..Breaking News!

.

  • पेन्शनवाढीसाठी EPS-95 पेन्शनधारकांचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निवेदन.

    धाराशिव   /  प्रतिनिधी  देशातील सार्वजनिक उपक्रम सहकार, एस.टी. महामंडळ औद्योगिक क्षेत्रातील 186 उद्योगातील कर्मचाऱ्यांना सरासरी 1170/- रुपये पेन्शन मिळते. अल्प पेन्शनवर कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या कर्मचाऱ्यांचे मासिक पगारातून 417, 541, 1250 अशा रक्कम नौकरी संपेपर्यंत शासनाकडे जमा होतात. कर्मचाऱ्यांचे पेन्शन फंडात असे लाखो कोटी रुपये शासनाकडे जमा आहेत. महागाई वाढते पण कर्मचाऱ्यांची…

  • धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा

    जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव  /  प्रतिनिधी धाराशिव येथील प्रस्तावित केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेतील सर्वात मोठा अडसर ठरलेला जागेचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यालय सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेचे केव्हीएस पथक सोमवारी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी धाराशिव येथे येणार आहे.…

  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रमजीवी बीएड कॉलेजमध्ये अभिवादन

    उमरगा   /  प्रतिनिधी उमरगा शहरातील श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय उमरगा येथे ज्यांनी शाहीर व डफ च्या माध्यमातून समाजामध्ये समाजातील दाहक वास्तव्याचे प्रतिबिंब  प्रतिबिंबीत केले असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय सरपे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी  प्रा. पवार भाऊ, प्रा. तेजस्विनी करंडे, प्रा. देविदास चव्हाण, प्रा. अमोल…

  • तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधव यांना ग्वाही

    तुळजापूर  /  प्रतिनिधी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील विविध रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेचे माजी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी बुधवारी मुंबई येथील मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. यापूर्वी सुमारे आठ दिवसांपूर्वी अमोल जाधव यांनी मंत्री श्री आबिटकर यांना…

  • संत एकनाथ महाराजांची पालखी परंडा नगरीत दाखलनगराध्यक्ष सौदागर यांच्या हस्ते पालखीचे स्वागत

    वारकऱ्यांसाठी फळांचे व पाणी बॉटलचे वाटप परंडा   /    प्रतिनिधी  वारी म्हणजे अपार ऊर्जा ,  ही वारी.. म्हणजे सर्व जाती, धर्म, पंथ यांचा एकोपा दर्शविते तर पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार आहे.  माणसाचे माणसाशी रक्तापलीकडचे नाते म्हणजे वारी होय, . आषाढी वारी निमित्त पैठणहून निघालेली संत श्री एकनाथ महाराजांची पालखी आज दिनांक 18 जुलै…

  • जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    धाराशिव   /  प्रतिनिधी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने आयोजित यावर्षी इयत्ता दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी  व विविध शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ पुष्पक मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित केला होता. यावेळी  विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील व उपाध्यक्षा उषाताई गायकवाड , जि.प. मुख्यकार्यकारी  अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांच्या हस्ते करण्यात…

  • कोर्टाच्या ” त्या ” निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा — राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण सचिवांकडे मागणी 

    धाराशिव  / प्रतिनिधी     एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा , अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने प्रधान शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रधान…

  • निकृष्ट मुरूमामुळे बांगरवाडी रस्ता चिखलमय;अडीच किमी प्रवास जीवघेणा,रुग्णवाहिका, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल

    येरमाळा / प्रतिनिधी कळंब तालुक्यातील बांगरवाडी गावच्या एकमेव संपर्क रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामात निकृष्ट दर्जाचा मुरूम वापरण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, पावसामुळे सुमारे २६०० मीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने वारंवार घसरत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी बांगरवाडीतील ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी व दैनंदिन कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या…

  • अणदूरच्या सामान्य कुटुंबातील, समर्थ लंगडे याची NEET परीक्षेत घवघवीत यश ; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

    अणदूर ( म. नेता ) तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील सामान्य कुटुंबातील सुपुत्र समर्थ मल्लिनाथ लंगडे याने पहिल्यांदाच NEET नीट परीक्षेत 594 गुण घेऊन जिल्ह्यात यशाचा डंका पसरविल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे. कठोर परिश्रम- जिद्द – मेहनत -चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, अथक सराव , निरंतर प्रयत्नाच्या…

  • श्री संत जळोजी मळोजी यांच्या पालखीचे तेर येथे स्वागत

    तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील पळसप येथील श्री संत जळोजी मळोजी यांच्या पालखीचे तेर येथे आगमन होताच पालखीचे विश्वकर्मा सेवा मंडळ तेर यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. ही पालखी पळसप ते पंढरपूर येथे आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी जात आहे.यावेळी प्रमोद पांचाळ , नवनाथ पांचाळ ,राजाभाऊ पांचाळ ,विष्णू पांचाळ, गोरोबा पांचाळ, दत्ता पांचाळ ,तानाजी पांचाळ, अमर…