माजी आमदार सुजितसिंह ठाकूर कुंटुबियांच्या हस्ते पालखीचे पूजन कल्याणसागर समूहाच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था परंडा / प्रतिनिधी आषाढी वारीनिमित्त भगवानगड येथून पंढरपूर कडे प्रस्थान करणाऱ्या पं. नामदेव शास्त्री महाराजांच्या श्री संत भगवान बाबा यांच्या पालखीचे आज दि . २० जुलै सोमवार रोजी परंडा शहरातील कल्याणसागर विद्यालयाच्या प्रांगणात टाळ मृदंगाच्या गजरात राम कृष्ण हारी जयघोषात आगमन झाले.…
अध्यक्षपदी इंद्रजीत आखाडे व सचिवपदी निशांत होनमुटे यांची निवड धाराशिव / प्रतिनिधी रोटरी क्लब आँफ धाराशिव चा वर्ष 2026 – 27 चा पदग्रहण समारंभ आज मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी होणार असून रोटरीचे नूतन अध्यक्ष इंद्रजीत आखाडे व नूतन सचिव निशांत होनमुटे हे पदग्रहण करणार आहेत. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे…
उमरगा / प्रतिनिधी राज्यात स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पोलीस भरतीतील अन्याय तसेच विद्यार्थी-युवकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाने केलेले दुर्लक्ष याच्या निषेधार्थ व विद्यार्थी – युवकांना न्याय मिळावा यासाठी प्रमुख मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी सोमवार दि. २० रोजी उमरगा तहसिलदारांना…
वाशी / प्रतिनिधी वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे महिला सक्षमीकरणासाठी जॉब रेडीनेस ट्रेनिंग प्रोग्रॅम या कार्यशाळेचे उद्घाटन नांदी फाउंडेशनच्या मनिषा अडागळे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक कदम, समन्वयक प्रा.डॉ विश्वास चौधरी,अंर्तगत गुणवत्ता हमी कक्षाचे चेअरमन प्रा.डॉ बालाजी देवकते उपस्थित होते.या कार्यशाळेचे आयोजन महिंद्रा प्राईड क्लासरूम,नांदी फॉउंडेशन पुणे आणि…
नळदुर्ग / प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन, जैव विविधतेचे संरक्षण आणि हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘हरित धाराशिव’ अभियानाला तुळजापूर तालुक्यातील लोहगाव शिवारातून उत्साहात प्रारंभ झाला. वन विभागाच्या पुढाकारातून एक हेक्टर क्षेत्रावर विविध प्रजातींच्या ३० हजार रोपांच्या लागवडीचा शुभारंभ सोमवारी (दि. २०) लोकनियुक्त सरपंच प्रवीण बसवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.,या अभियानाअंतर्गत परिसरात फुले,…
जवाहर महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात अणदूर / प्रतिनिधी महात्मा गांधींचा आदर्श ठेवून आलुरे गुरुजींनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विद्यार्थी घडविण्याचे केंद्र विद्यापीठ आहे. कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी जीवन यशस्वी करावे असे आवाहन कुलगुरू डॉ अनिलकुमार बिडवे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जवाहर महाविद्यालय, अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने गत दोन शैक्षणिक वर्षात पदवी प्राप्त…
धाराशिव जिल्ह्याच्या सुपुत्राला मिळाला राज्यस्तरीय सन्मान धाराशिव / प्रतिनिधी पुण्यातील ऐतिहासिक टिळक स्मारक मंदिर येथे न्यू इरा पब्लिकेशन आणि सरहद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘तुकाराम’ या पुस्तकाच्या भव्य प्रकाशन सोहळ्यात मुंबई येथील प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर ख्वाजाभाई सय्यद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या शुभहस्ते त्यांना संत तुकाराम महाराज…
रोटरी क्लब मुरूम सिटी चा पदग्रहण व चार्टर प्रदान सोहळा उत्साहात संपन्न मुरूम / प्रतिनिधी ज्या संस्थेच्या माध्यमातून व्यक्ती केवळ आर्थिक मदत करत नाही, तर स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम करून सेवाभावी वृत्तीने जगते आणि इतरांनाही जगण्याची नवी उमेद देते, ती म्हणजे रोटरी. खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर निस्वार्थपणे काम करणारी रोटरी ही एकमेव सामाजिक संस्था आहे, असे…
तुळजापूर / प्रतिनिधी डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्यावतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट रक्तदान शिबीर आयोजनाचा पुरस्कार तुळजापूर शहरास प्रथम क्रमांकाचा प्राप्त झाला. तुळजापूर शहर व तालुक्यातून २०२५-२६ मध्ये एकूण ७२ शिबीराच्या माध्यमातून १५५९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये प्रामुख्याने तुळजाभवानी मंदिर संस्थान, श्री मुदगुलेश्वर मंदिर समिती, युवास्पंदन सामाजिक संस्था, तुळजाई नागरी सह.पतसंस्था, विठाई हॉस्पिटल, अजिंक्य कोचिंग क्लासेस,…
धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांना प्लस ९१ मीडिया व इंनोवेदा आयोजित ” एजुकेशन कोन्क्लेव्ह-२०२६” या उपक्रमांतर्गत प्राचार्य या पदावर कार्य करत असताना महाविद्यालयात राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण विद्यार्थी कौशल्य विकास व सामाजिक क्षेत्रामध्ये महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट व अपडेटेड टेक्नॉलॉजी वर विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेतलेले…