नळदुर्ग / प्रतिनिधी स्लॅब कामगारांसह स्लॅब टाकण्याचे साहित्य, सिमेंट मिक्सर घेवून जाणारे टेम्पो ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटून तुळजापूर -नळदुर्ग मार्गावर हगलूर पाटीजवळ पलटी झाला, हा अपघातात रविवारी (१९)रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. या अपघातात सहा जण जखमी झालेले आहेत. काही जण किरकोळ तर काहीना गंभीर दुखापत झाली आहे. स्लॅब टाकून नळदुर्गहून धाराशिवकडे निघालेला टेम्पो…
तुळजापुर / प्रतिनिधी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी सहपरिवार रविवारी तीर्थक्षेत्र तुळजापुरात कुलस्वामिनी श्री आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी आ. पटोले यांनी शेतकरी राजा सुखी राहू दे , बळीराजाचे राज्य येऊ दे असे साकडे यावेळी तुळजाभवानीला घातले. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अँड, धीरजभैय्या पाटील नगर परिषद गटनेते अमोल कुतवळ, नगरसेवक रणजित इंगळे,…
तुळजापुर / प्रतिनिधी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद (भाऊ )नाईक हे दिनांक 18 जुलै रोजी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता तुळजापूर शहरामध्ये त्यांचे भाजपा कार्यकत्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दर्शना नंतर मंत्री श्री नाईक यांच्या हस्ते गोरगरीब 100महिलांना प्रदेशकार्यकारणी सदस्य गुलचंद भाऊ व्यवहारे यांच्यावतीने साड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते मा,आमदार सुजितसिंह ठाकूर,…
मुरूम / प्रतिनिधी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याच्या उद्देशाने, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या सभागृहात रविवारी (ता. १९) रोजी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके वाटपाचा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक हुशार मुले केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहतात. हे ओळखून फाउंडेशनने पुढाकार घेतला. गरजू विद्यार्थिनींना इयत्ता…
चक्का जाम आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील आठवडी बाजारात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज चक्का जाम आंदोलन करून नगरपरिषदेच्या निष्क्रिय व गलथान कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला. स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय, ड्रेनेज, पार्किंग, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा, सीसीटीव्ही तसेच व्यापाऱ्यांसाठी आवश्यक बाजार कट्ट्यांची उभारणी या प्रमुख…
तुळजापुर / प्रतिनिधी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री मा. ना. श्रीपाद नाईक यांनी शनिवार दि.१७ रोजी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. ना. नाईक हे दर्शनासाठी तुळजापूर येथे आगमन आले असता, भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्ह्याच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,माजी जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य, अनिल काळे, रामदास…
मुरुम ( म. नेता ) उमरगा तालुक्यातील मुरुम येथे शेतीसाठी लागणारे फवारणी औषधं पंप अर्धा किंमत मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आले. उमरगा पंचायत समिती सभापती ऍड आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतुन त्यांंच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी लागणारे फवारणी करण्यासाठी औषधं पंप बाहेर बाजार भावापेक्षा निम्म्या किंमतीत वाटप करण्यात आले. मुरूम व परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे…
११ गावांतील मारुतीला घातले पाणी उमरगा / प्रतिनिधी पावसाने दिर्घकाळ दडी मारल्यामुळे चिंतेत पडलेल्या बळीराजाला दिलासा मिळावा आणि सुपतगाव व उमरगा परिसरात सुजलाम् सुफलाम् पाऊस व्हावा, यासाठी सुपतगाव येथील ग्रामस्थांनी भक्तीचा मार्ग निवडला आहे. गुरुवारी, १६ जुलैपासून गावातील ग्रामदैवत मंदिरात ” ‘रामकृष्ण हरी’ श्रीराम जय जय राम, जय हनुमान “नामाचा अखंड गजर सुरू करण्यात आला…
तुळजापूर / प्रतिनिधी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रामानंद तीर्थ व गोविंद श्रॉफ यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा जनता विकास परिषदेची तुळजापहूर शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष प्रा. धनंजय लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. तर तालुका उपाध्यक्ष विलास टोपे (बारुळ) सरचिटणीस डॉ. अरविंद हंगरगेकर (हंगरगा) सहसचिव संभाजी बागल (मसला) कोषाध्यक्ष डॉ. सतीष ताकभाते (मंगरुळ),…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते धाराशिव येथील भाजपा पक्ष कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे ओबीसी मोर्चाच्या नूतन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा धाराशिव जिल्ह्याची नुकतीच नूतन कार्यकारिणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या आदेशानुसार ओबीसी…