Live News…..Breaking News!

.

  • मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानात धाराशिव जिल्ह्यात विविध उपक्रम राबवणार – जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील

    ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा धाराशिव / प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियानात धाराशिव जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची एकदिवसीय कार्यशाळा ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत 27 जुलै रोजी होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी…

  • परंडा येथे स्व. अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन

    धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परंडा येथे प्रतीमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर, भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, सुखदेव टोंपे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, ॲड. संतोष…

  • रिक्त पदवीधर शिक्षकांसाठी नळदुर्ग जि.प. शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा

    नळदुर्ग / प्रतिनिधी वर्षभरापासून जिल्हा परिषद प्रशालेत रिक्त असलेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पदे व एक परिचर पदही रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,याची दखल घेवून शालेय व्यवस्थापन व विकास समितीने या रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जिल्हा परिषद धाराशिव मुख्यकार्यकारी अधिकाऱ्याकडे केली आहे.31 जुलै रोजीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास शाळेला कुलूप ठोकून तीव्र…

  • रोटरी क्लब तुळजापूरला मेंबरशिप डेव्हलपमेंट पुरस्कार

    तुळजापुर / प्रतिनिधी सोलापूर येथे पद्मावती कन्व्हेंशन हॉलमध्ये आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये रोटरी क्लब तुळजापूरला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो .जयेश पटेल आणि डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो .नितीन कुदळे यांच्या हस्ते ‘मेंबरशिप डेव्हलपमेंट पुरस्कार’प्रदान करून गौरविण्यात आले. रोटरी क्लब तुळजापूरने उल्लेखनीय सदस्यवाढ करत १३ नवीन सदस्यांची नोंद केल्याबद्दल रोटरी इंटरनॅशनल तर्फे प्लॅटिनम हा प्रतिष्ठेचा पहिल्या…

  • मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे २०१ जणांचे रक्तदान

    परंडा / प्रतिनिधी नव महाराष्ट्राचे शिल्पकार, अथक परिश्रम, कुशल नेतृत्व दूरदृष्टीपू्र्ण विचार आणि जनसेवेच्या प्रती असलेल्या निष्ठेमुळे सतत विकास आणि समृद्धीचे नवे परिमाण स्थापित करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.…

  • समाधान शिबिर अभियानातून समाजातील प्रत्येक घटकाला लाभ देण्याचे काम – आमदार बसवराज पाटील

    उमरगा येथे महाराजस्व समाधान शिबिर अभियान धाराशिव / प्रतिनिधी शासनाच्या अनेक योजना आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून प्रशासन गतिमान आली लोकाभिमुख करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.या अभियानाच्या माध्यमातून प्रशासन समाजातील प्रत्येक घटकाला लाभ देण्याचे काम करत आहे.असे प्रतिपादन आमदार बसवराज पाटील यांनी केले. आज २२ जुलै रोजी उमरगा…

  • शिबिरातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ द्या – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    धाराशिव / प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरांद्वारे विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे…

  • तेर–वाणेवाडी–चिखली रस्त्याची दुरवस्था; संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक हैराण

    तेर ( म. नेता. ) तेर–वाणेवाडी–चिखली या प्रमुख मार्गावरील रस्त्याचे काम सध्या संथगतीने सुरु असल्याने परिसरातील नागरीक व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत असून खड्डे, उखडलेला रस्ता आणि खडीमुळे वाहन चालविताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील रखडलेल्या कामामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून…

  • पेपरफुटी व बेरोजगारीच्या विरोधात राष्ट्रवादी (शप) पक्षाच्यावतीने आंदोलन

    धाराशिव / प्रतिनिधी स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी, शासकीय भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ आणि वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि युवकांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या व्यवस्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात यावी, पेपरफुटी व भरतीतील गैरव्यवहारासाठी…

  • भाजपाच्यावतीने महाआरोग्य शिबीर; दोनशेहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग रुग्णांची मोफत तपासणी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व अजितदादांच्या जयंतीनिमित्त उपक्रम धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उद्या (दि.२२) धाराशिव शहरातील मल्टिपर्पज शाळेच्या मैदानावर भव्य सर्वरोग निदान महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग, तेरणा सोशल फाउंडेशन आणि विविध शासकीय…