Live News…..Breaking News!

.

  • तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात  शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनातील उत्कृष्टतेचा गौरव.

    धाराशिव / प्रतिनिधी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला आणखी एक मानाचा तुरा लाभला असून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांना प्रतिष्ठेचा “प्रिन्सिपल ऑफ द इयर” पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.  तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. डॉ. प्रशांत जैन यांना “आयसोमेट्रिक रेखाचित्रासाठी लंबवर्तुळ रेखांकन टेम्प्लेट” या अभिनव संशोधनासाठी डिझाईन पेटंट प्राप्त…

  • चुकीच्या पद्धतीने झालेल्या पदोन्नती रद्द करण्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती प्रक्रिया शासनाच्या नियमावली व मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करून राबविण्यात आल्याचा आरोप करत धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.यावेळी तुळजापुरचे आमदार तथा मित्राचे उपाध्यक्ष राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते या निवेदनात, 03 जुलै 2026 रोजी…

  • संत मीरा पब्लिक स्कूलच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गौरव

    परंडा / प्रतिनिधी संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक संतोष भांडवलकर , पालक प्रशांत सुरवसे व सर्व शिक्षकांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले. यामध्ये…

  • परंडा येथे कारगिल विजय दिन साजरा

    परंडा / प्रतिनिधी परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कारगिल विजय दिवस आजी माजी सैनिक व अर्धबल संघटना परंडा तालुका यांच्यावतीने शहिद जवानांना पुष्पचक्र वाहून अभिवादन करून साजरा करण्यात आला. यावेळी सोनारी मठाचे महंतपीर योगी शामनाथ महाराज, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, ॲड.दादासाहेब खरसडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील, आण्णासाहेब जाधव, राहुल डोके, बिभिषण शिंदे,…

  • तुळजापूरात आज समाधान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन मंगळवार,दि.२८ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता नळदुर्ग रोडवरील ” वंश मंगल कार्यालय,” तुळजापूर येथे करण्यात आले आहे.या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या…

  • स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात घरगुती, शेतकरी तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या घरांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सुरू असलेली प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. स्मार्ट मीटर बसविल्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असून, वीज वापर आणि…

  • ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषदेची ” आपला जीव धाराशिव व्हिजन २०३० ” कार्यशाळा

    जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा पुढाकार धाराशिव   /   प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या  संकल्पनेतून “आपला जीव धाराशिव व्हिजन २०३० अंतर्गत कार्यशाळा मा.ना. जयकुमार गोरे मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज, महाराष्ट्र राज्य यांचे प्रमुख उपस्थितीत आज सोमवार  दिनांक २७ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळेत…

  • कर्जमाफी, वीजबिल माफी आणि पिकविम्याचा दिलासा

    धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारची मोठी मदत; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती  धाराशिव   /  प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 56 लाख शेतकरी बांधवांना सुमारे 37 हजार कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील 46 हजार शेतकऱ्यांचा या पहिल्या यादीत समावेश आहे. या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात…

  • तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीच्या सदस्यांनी केली रेल्वे कामाची पाहणी

    धाराशिव    /  प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या शुभदिनी तुळजाभवानी  रेल्वे संघर्ष तुळजापूर समितीने धाराशिव – तुळजापूर – सोलापूर या नवनिर्माणाधिन रेल्वे मार्गाची पाहणी केली. धाराशिव शहरातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील तालुक्यातील वरूडा गावाजवळील पटरी अस्तरीकरण कामाची प्रत्यक्ष कामाची पहाणी करून चालू असलेल्या अस्तरीकरण  पटरीचे अध्यक्ष बबनराव गावडे व सदस्यांनी पूजन  केली. या वेळी समीतीचे अध्यक्ष बबनराव गावडे, उपाध्यक्ष…

  • कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरण अनिवार्य ; शेतकऱ्यांनी दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करावी

    धाराशिव   /  प्रतिनिधी  राज्य शासनाने २४ जुलै २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत  जिल्ह्यातील ४६ हजार ४६ शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असून,आधार प्रमाणिकरण केल्याशिवाय कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे यादीतील सर्व शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवसांत आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया…