Live News…..Breaking News!

.

  • पेंग्विन प्रि प्रायमरी स्कूल येथे बालगोपाळांची आषाढी दिंडी संपन्न

    धाराशिव   /  प्रतिनिधी  पेंग्विन प्रि प्रायमरी स्कूल, धाराशिव  येथे गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती कमलताई नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी वारकरी संप्रदायातील विविध संत तसेच विठ्ठल – रुक्मिणी यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले.…

  • शिबिरासारखीच नागरिकांची कामे कार्यालयातूनही वेळेत व्हावीत – आमदार कैलास पाटील

    शिराढोण येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान संपन्न * *३,५४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ** *शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल नागरिकांसाठी आकर्षण* धाराशिव  /  प्रतिनिधी  सर्वसामान्य नागरिकांना विविध कामांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये,त्यांच्या वेळेची व श्रमांची बचत व्हावी,यासाठी महसूल प्रशासनाने समाधान शिबिराचे आयोजन केले आहे.शिबिरात ज्या तत्परतेने कामे होत आहेत,त्याचप्रमाणे पुढील काळातही नागरिकांची…

  • ऑनलाईन आर्थिक फसवणुक झालेली एकुण रक्कम 19,00,000/- फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश

    धाराशिव  /  प्रतिनिधी सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे धाराशिव जिल्हयातील फिर्यादी नामे मोहित सिध्देश्वर भुजबळ व रोहित सिध्देशवर भुजबळ दोघे रा. वत्सलानगर, अणदुर, धाराशिव यांनी त्यांचे अनुक्रमे 14,00,000/- व 5,00,000/- अशी एकुण 19,00,000/- रु. ची ऑनलाईन आर्थिक फसवणुक झालेबाबत एनसीसीआर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सायबर पोलीसांनी तात्काळ संबंधित बँक यांचेशी पत्रव्यवहार करुन आरोपींच्या…

  • स्कॉडा कार मधील रोख रक्कम चोरणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

    धाराशिव   /  प्रतिनिधी येथील स्थानिक गुन्हे शाखेने फिर्यादी नामे-नागराज सदानंद मडीवाळ, वय 29 वर्षे, रा. चिंचवाडा गाव पाली ता. बिचोली नॉर्थ जि. नॉर्थ गोवा यांचे स्कॉडा स्लाविया कार क्र जीए 04 ई 9156 मध्ये पर्स मधील रोख रक्कम 1,50,000₹ व कागदपत्रे हे दि.19.07.2026 रोजी 11.30 ते 18.00 वा. सु. घाटशिळ पार्कींग येथे स्मशानभुमी रोडवर इदगाह…

  • कल्याणसागरचा माजी विद्यार्थी उत्कर्षचे नीट व जेईई परीक्षेत उत्तुंग यश!

    नीटचे 656 गुण तर जेईई मध्ये 99.40 पर्सेंटाईल. परंडा  /  प्रतिनिधी कल्याणसागर समुहातील परंडा येथील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी उत्कर्ष गजानन कोठावळे याने नीट (NEET) आणि जेईई (JEE) या राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही अत्यंत कठीण असलेल्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल उत्कर्षचा आणि त्याच्या आईचा कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ.…

  • परंडा काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी सोमनाथ मिश्किन तर दत्तात्रय गाडेकर यांची प्रदेश सरचिटणीसपदी निवड, 

    धाराशिव   /  प्रतिनिधी परंडा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ मच्छिंद्र मिश्कीन यांची (दि. २४) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीसपदी दत्तात्रय गाडेकर यांची निवड झाल्याने जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने  सोमनाथ मच्छिंद्र मिश्कीन यांची परंडा तालुका…

  • धारासूर मर्दिनी महिला स्वयंसेवी संस्थेचा 22 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी धारासूर मर्दिनी महिला स्वयंसेवी संस्थेचा म्हणजेच फेडरेशनचा 22 वा वर्धापन दिन माता रमाबाई आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज, नालंदा कॉलेज ऑफ ड्रेस डिझाईनिंग, समता नगर येथे मोठ्या उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीस तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दिप…

  • ‘देशद्रोही’ म्हणणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी; आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शासकीय जागेवरील रस्त्याच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत…

  • केंद्रीय विद्यालयासाठी निर्णायक टप्पा यावर्षीच विद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न; जिल्हा परिषदेने जागा दिल्याने मंजुरीची प्रक्रिया सुरू

    सर्व प्रक्रिया जलद पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला आता निर्णायक गती मिळाली आहे. यंदापासूनच केंद्रीय विद्यालय सुरू व्हावे यासाठी आपले युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय विद्यालयासाठी आवश्यक असलेल्या जिल्हा परिषदेच्या तात्पुरत्या इमारतीसह कायमस्वरूपी जागेचीही अडचण दूर करण्यात महत्त्वाची प्रगती झाली आहे. केंद्रीय…

  • जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस (शप)कडून निषेध

    धाराशिव  / प्रतिनिधी  दिल्ली येथील जंतरमंतर परिसरात आपल्या विविध मागण्यांसाठी शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), धाराशिव जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे ही लोकशाही मूल्यांना आणि संविधानिक अधिकारांना बाधा आणणारी बाब असल्याची भूमिका पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. विद्यार्थी…