Live News…..Breaking News!

.

  • नागरी समस्या, भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नळदुर्ग काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

    नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग शहरातील विविध नागरी समस्या, रखडलेली विकासकामे तसेच प्रशासकाच्या कार्यकाळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने येथील नगरपरिषदसमोर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवार(२९) २०२६ रोजी नगरपालिकेसमोर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. नगरपालिकेतील विरोधी पक्ष काँग्रेसच्या नगरसेवकांनी यापूर्वी सर्वसाधारण सभेत आणि विविध निवेदनांद्वारे नागरिकांच्या प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधले.मात्र अद्याप ठोस…

  • श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामांच्या अनुषंगाने विशेष मंत्रपठण विधी संपन्न

    तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार व विकासकामांना धार्मिक अधिष्ठान लाभावे तसेच ही सर्व कामे निर्विघ्न, सुरळीत व यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत, या उद्देशाने आज श्री तुळजाभवानी मंदिरात विशेष मंत्रपठण विधी संपन्न झाला. यामध्ये गणपती अथर्वशीर्ष पारायण, श्रीरुद्र जप तसेच दुर्गा सप्तशती पारायण हे धार्मिक विधी संपन्न झाले. आज बुधवारी…

  • शिक्षक परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा धाराशिव च्या नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक परिषद धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून राजाभाऊ हुकीरे सर, जिल्हा कार्यवाह सतीश जाधवर सर, कोषाध्यक्ष मारुती कोरे सर तसेच शिक्षक परिषद तुळजापूर तालुकाध्यक्ष म्हणून विजय देशमुख सर यांचा परिषदेकडून उत्साहात सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हुकीरे…

  • बावची विद्यालयपरंडा शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश ; 17 विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र

    परंडा / प्रतिनिधी बावची विद्यालय, परंडा येथे इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने तालुक्यात अभिमानास्पद यश प्राप्त केले आहे. विद्यालयाने पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. या परीक्षेमध्ये इयत्ता 7 वीचे 39 पैकी 17 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. सदर विद्यार्थ्यांनी प्राप्त…

  • राज्यपाल श्री.जिष्णू देव वर्मा यांचा आज गुरुवारी तुळजापूर दौरा ; कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीजींचे घेणार दर्शन

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा हे गुरुवार,दि.३० जुलै रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून राज्यपाल श्री.वर्मा हे दुपारी १२.०५ वाजता शासकीय मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण करतील. दुपारी १२.४५ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन.आगमन होताच त्यांना स्वागत व…

  • अरण्य गोवर्धन मठात गुरुपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने साजरी

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर येथील प्राचीन अरण्य गोवर्धन मठ संस्थान यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी लक्ष्मीकांत प्रतापराव सरवदे यांच्याहस्ते सर्व प्राचीन मंहतांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे दयानंद हिबारे , नंदकुमार लांडे, राजाभाऊ हिबारे , भावसार समाजाचे पंच कमिटी ज्येष्ठ नागरिक व समस्त भावसार समाज अध्यक्ष व पदाधिकारी…

  • श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामांच्या अनुषंगाने गुरुपौर्णिमेपासून विशेष मंत्रपठण विधीचा शुभारंभ

    तुळजापुर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार व विकासकामांना धार्मिक अधिष्ठान लाभावे तसेच ही सर्व कामे निर्विघ्न, सुरळीत व यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत, या उद्देशाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे गुरुपौर्णिमेपासून विशेष मंत्रपठण विधीचा शुभारंभ करण्यात येत आहे. यामध्ये गणपती अथर्वशीर्ष पारायण, श्रीरुद्र जप तसेच दुर्गा सप्तशती पारायण हे धार्मिक विधी संपन्न…

  • महेंद्र कावरे यांचा उत्कृष्ट बीएलओ म्हणून सत्कार

    तुळजापूर / प्रतिनिधी येथील नगरपालिका प प्राथमिक शाळा क्र.२चे सहशिक्षक तथा यादी भाग क्रमांक १७७ चे बी.एल.ओ महेंद्र कावरे यांच्या धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय च्यावतीने मतदार यादी विशेष सखोल पुनररिक्षण (एस आय आर) कार्यक्रमांतर्गत तुळजापूर तालुक्यात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी २४१ तुळजापूर विधानसभा मतदारसंघ ओंकार देशमुख,…

  • विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत ग्रामीण प्रशाला, माडजचे घवघवीत यश; विजेत्या विद्यार्थ्यांचा जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते गौरव.

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा–२०२६’ मध्ये उमरगा तालुक्यातील ग्रामीण प्रशाला, माडज येथील विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव व पारितोषिक वितरण समारंभ आज जिल्हा परिषद, धाराशिव येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. शालेय…

  • काँग्रेसकडून MHT-CET कथित घोटाळा व विस्तार अधिकारी (शिक्षण)पदोन्नतीतील अनियमिततेविरोधात निवेदन

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित MHT-CET परीक्षा प्रक्रियेत गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित घोटाळा व अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती प्रक्रियेत झालेल्या गंभीर अनियमिततेची राज्यस्तरीय चौकशी करून सदर पदोन्नती प्रक्रिया रद्द करण्यात यावी, या मागण्यांसाठी (दि.…