धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी तुळजापूर / प्रतिनिधी वयोवृद्ध दाम्पत्याला लक्ष्य करून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या कारवाईत 02 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ₹36,000 किमतीचे मनी मंगळसूत्र व OPPO ओप्पो कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला…
धाराशिव / प्रतिनिधी अनुसूचित जातीमध्ये फूट पाडून आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा मनुवादी सरकारचा डाव आंबेडकरी जनता हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. त्याची चुणूक आजच्या तुफान पावसात देखील आंबेडकर समाज तुफानातले दिवे बनून या निर्णयाला तीव्रपणे विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करत मुख्यमंत्री विधानसभेत जनतेची दिशाभूल करीत आहेत. ही अत्यंत शरमेची आणि दुर्दैवी…
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील वेणुबाई नानासाहेब खोटे यांचे सोमवार दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मंगळवार दिनांक २८ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे खोटे कुंटुबियांच्या या दुःखात दैनिक मराठवाडा नेता परिवार सहभागी आहे.
तेर ( म. नेता ) धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक अमोल आग्रे यांची बदली झाल्याबद्दल त्यांचा ग्रामीण रुग्णालयात सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.गुरूबस शेटे, डॉ. विजय विश्वकर्मा ,डॉ.ओंकार आतकारे, दत्तात्रय वाघे ,संगिता चव्हाण, संतोष सरवदे, नियाज शेख आदीसह इतर आरोग्य कर्मचारी व रुग्ण नागरीक उपस्थित होते.
परंडा / प्रतिनिधी येथील सरस्वती प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत मोठे यश मिळविले आहे. इयत्ता सातवीतील चौदापैकी तेरा शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी देणारी व चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणारी एकमेव सरस्वती प्राथमिक शाळा आहे. सातवी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून परंडा येथील कल्याणसागर समूहातील सरस्वती प्राथमिक शाळेतून खालील विद्यार्थ्यांनी उज्वल यश प्राप्त केले आहे…
तुळजापूर येथे समाधान व महाआरोग्य शिबिर १,०५० लाभांचे वितरण,७४९ अर्ज स्वीकारले तुळजापुर / प्रतिनिधी प्रशासन योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असेल,तर शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतो.‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान व महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा थेट लाभ नागरिकांना दिला जात असून,शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील…
तुळजापुर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात दि. 26.07.2026 रोजी SISPL सुरक्षा निरीक्षक श्री. योगेश फडके यांना एक पॉकेट सापडले. त्यांनी तत्परता व प्रामाणिकपणा दाखवत ते पॉकेट मंदिर संस्थानच्या कंट्रोल रूममध्ये जमा केले. पॉकेटची पडताळणी केली असता त्यामध्ये ₹8,812/- रोख रक्कम तसेच एक पेन ड्राइव्ह व काही महत्वाची कागदपत्रे असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित भाविक…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हयातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र- गोवा बार कौन्सिल चे मा.अध्यक्ष अँड मिलींद पाटील यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी दि.29जूलै 2026 वार बुधवार रोजी,अँड.मिलिंद शंकरराव पाटील यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी, प.पू.अनंददास महाराज स्मारक मंडळात सलग तेरा तास अखंड नामसंकल्प यज्ञाचे सकाळी ठिक 6.00 ते सायंकाळी 7.00 वाजे पर्यंत आयोजन…
धाराशिव / प्रतिनिधी सामाजिक, साहित्यिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कु. स्नेहा रुक्मिणी विकास वाघमोडे (रा. वडगाव (सि.), ता. जि. धाराशिव) यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या धाराशिव शहर युवा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा मा. शुभांगीताई काळभोर यांच्या…
नवीन जिल्हा परिषद इमारतीसाठीही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही धाराशिव / प्रतिनिधी प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब, वाचनालय, अभ्यासिका, विद्युत शवदाहिनी, प्रत्येक घरावर सौरऊर्जा प्रकल्प, आशा व पर्यवेक्षिकांना स्कूटर, हजारो महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्यासारखे अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प करणारी धाराशिव जिल्हा परिषद…