Live News…..Breaking News!

.

  • तांत्रिक निकष रद्द करून फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना एक हजार 68 कोटी रुपयांचा विमा वितरीत करा –

    धाराशिव   /  प्रतिनिधी  प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारे हेक्टरी ४० ते ४५ हजार असे एकूण     एक हजार ६८ कोटी रुपये  मंजूर करावा. यासाठी बैठक घेऊन कंपनीला ही रक्कम देण्याचे आदेश आपण द्यावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

  • उमरगा तालुक्यातील अचलबेट देवस्थान येथे आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली

    उमरगा   /  प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून उमरगा, लोहारा, तुळजापूर, सह लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, उदगीर, तसेच कर्नाटक राज्यातील बसवकल्याण, आळंद, भालकी, हुमनाबाद तसेच विविध ठिकाणाहून हजारो भाविकांनी गर्दी करीत येथील पांडुरंगाचे व विविध देवतांचे यथोचित दर्शन शनिवार दि. २५ रोजी घेतले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील श्रीक्षेत्र अचलबेट…

  • संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे बाल-दिंडी सोहळा उत्साहात साजरा

    परंडा  /  प्रतिनिधी संत मीरा पब्लिक स्कूल, परंडा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल-दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेचे संस्कार, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिकात्मक पालखी…

  • नळदुर्ग जि.प.प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

    नळदुर्ग   /  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्रशालेचे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण १० विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. यामध्ये अरबिया माजिद शेख हिने २४६ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अमीना फैयाज शेख (२३० गुण), अबीरा वसीम मोज्जन (२२६ गुण), फरहान मुन्ना फकीर…

  • एस.टी. भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची काँग्रेसची मागणी; परिवहन मंत्र्यांना निवेदन

    धाराशिव  /  प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अलीकडेच केलेली एस.टी. बस प्रवासातील अतिरिक्त 13.5% भाडेवाढ तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांना विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या मार्फत (दि. २४) धाराशिव यांच्या यांच्या वतीने  देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, एस.टी. बस ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक,…

  • मुख्यमंत्र्यांसमवेत आषाढी वारीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या माने दांपत्याचा येरमाळ्यात सत्कार.

    येरमाळा   /  प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेचा मान लाभलेल्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी दांपत्य बाबासाहेब माने व  प्रभावती माने यांचा येरमाळा  बसस्थानकात पत्रकार संघ व ग्रामस्थ,विठ्ठल भक्तांच्या वतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला. यंदाच्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या समवेत माने दांपत्याने…

  • कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

    तुळजापूर   /   प्रतिनिधी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी निमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी काल शनिवारी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे येऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील बळीराजा व जनतेला सुखी ठेवण्याची प्रार्थना आई तुळजाभवानी कडे केली,  मंत्री श्री फुंडकर यांचा तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे…

  • पत्रकार लोंढे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी 

    धाराशिव   /  प्रतिनिधी साप्ताहिक खडतर प्रवासचे संपादक प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन यांच्यावर परंडा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई म्हणजे पत्रकारिता व चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करणारा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. त्यामुळे लोंढे यांच्यावर केलेली कारवाई तात्काळ रद्द करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्हॉईस ऑफ…

  • सर्व शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – डॉ जितेंद्र कानडे

    अणदूर    ( म. नेता ) तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा विकास आराखडा ठरवण्यासाठी व सद्य परिस्थितीनुसार कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी गटातील सर्वच गावांच्या लोकप्रतिनिधी, सरपंच ,शासकिय अधिकारी, प्रशासकिय अधिकारी, ग्रामिण विकासासाठी निगडित सर्व विभागांचे कर्मचारी यांची बैठक मंगळवारी (दि.२१) हुतात्मा स्मारक येथे घेण्यात आली. यावेळी अणदूर , धनगरवाडी , चिवरी , आरळी,खुर्द ,…

  • तुळजापुरात २६ जुलैपासून मोफत भगवद्गीता वर्ग

    तुळजापूर  /  प्रतिनिधी तुळजापूर येथे गीता परिवाराच्या वतीने मोफत श्रीमत भगवद्गीतेचे वर्ग भगवद्गीतेचा अभ्यासक सौ. अश्विनीताई अनंतराव  कोंडो यांच्याकडून सुरू करण्यात येत आहेत इच्छुकांनी २६ जुलै २०२६ पासून वर्गाला उपस्थित राहावे असे आवाहन गीता परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी तुळजापूर येथील गीता परिवाराच्या वतीने मोफत श्रीमत भगवद्गीतेचे वर्ग २६ जुलैपासून सुरू…