भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न धाराशिव / प्रतिनिधी परंडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि शासनाच्या योजना थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात,या उद्देशाने भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज शनिवारी १ ऑगस्ट रोजी रामहारी मंगल कार्यालय,नगर रोड,भूम येथे उत्साहात पार पडले.या शिबिराच्या माध्यमातून विविध…
धाराशिव / प्रतिनिधी तुलसी महिला मंडळ बीड संचलित नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन व माता रमाबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जुलै 2026 रोजी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन केले होते. हा प्रोग्राम शैक्षणिक वर्ष 2026 -27 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सोमनाथ लांडगे…
धाराशिव / प्रतिनिधी लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अण्णाभाऊ साठे चौक (दि.01) येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेसाठी दिलेल्या…
परंडा / प्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, थोर विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि प्रखर राष्ट्रभक्त, थोर क्रांतिकारक, असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भाजपा नेते तथा मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद धाराशिव येथे लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण आणि आदरभावाने साजरी करण्यात आली. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुकाराम भालके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून…
बार्शी-बोरफळ रस्त्यासह १४० कोटींच्या १४ विकासकामांचा आढावा दर १५ दिवसांनी कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी विकासकामे मोठ्या प्रमाणात मंजूर झाली आहेत, निधीही उपलब्ध झाला आहे आणि कामांना सुरुवातही झालेली आहे. आता कोणतीही कारणे सांगून ती रखडणार नाहीत याची काळजी घ्या. निर्धारित वेळेत सगळी कामे पूर्ण करा. अडचणी येत असतील तर त्यावर उपाय…
धाराशिव / प्रतिनिधी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (दि.1 ऑगस्ट )रोजी धाराशिव जिल्हाभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला सकाळी 7:00 वाजता महाअभिषेक व महाआरती, शासकीय महाविद्यालय जवळील अन्नपूर्णा येथे मोफत अन्नदान, व रुग्णालयात फळे वाटप, छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे 1000 वृक्षवाटप व…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील नगरपरिषद कार्यालयाच्या बाजूस मुख्य रस्त्यावर जिल्हा न्यायालय समोर असलेल्या पालिकेच्या व्यापारी संकुलातील तळ मजल्याची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली आहे. यामुळे या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून थोड्याशा पावसाने देखील येथील तळमजल्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे सदरची भिंत कोसळल्याचे दिसून येत आहे. परंतु याकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरपरिषद कार्यालयातील प्रशासकीय…
जि.प.सीईओंच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांसह गावक-यांचा ठिय्या परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न अखेर गावक-यांच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे मार्गी लागला आहे. चार वर्षांपासून गणित व विज्ञानचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाला मोठे यश आले आहे. गुरुवारी शाळेला कुलूप ठोकल्यानंतर, आज शुक्रवारी सकाळी धाराशिव जिल्हा…
तुळजापूर / प्रतिनिधी मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. ३० जुलै रोजी रात्री १०:३० वाजता पार पडलेल्या देवीच्या मुख्य शेजारती (प्रक्षाळपूजा) प्रसंगी प्राजक्ता माळीने मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले.दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी श्री तुळजाभवानी देवीची पारंपरिक पद्धतीने ओटी भरून आपला कुलधर्म व कुलाचार पार पाडला.…