Live News…..Breaking News!

.

  • सर्व महसुली मंडळांना एकसमान २४ हजार रुपये पीकविम्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

    धाराशिव / प्रतिनिधी सन  2025 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानानंतर ही धाराशिव जिल्ह्यातील विविध महसुली मंडळांमध्ये पीकविमा रकमेबाबत मोठी तफावत करण्यात आल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने आज सोमवार (दि.03) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व शेतकऱ्यांना समान…

  • खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाईची परंडा भाजपाची मागणी

    परंडा / प्रतिनिधी शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करुन परंडा भाजपाच्यावतीने खा. सजंय राऊत यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसिलदार, परंडा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य…

  • ८ ऑगस्टपूर्वी गणना प्रपत्र भरून जमा करा ; अन्यथा मतदार यादीतून नाव वगळले जाईल जिल्हा निवडणूक अधिकारी किर्ती किरण पुजार यांचे नागरिकांना आवाहन

    धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्यात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून ३० जून २०२६ ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घरभेटी (House to House) देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप करण्यात…

  • रस्त्याची दुर्दशा गटारींचा कमतरतेमुळे अणदूर ग्रामस्थ हवालदिल ; बुधवारी आंदोलनाचा इशारा

    अणदूर / प्रतिनिधी अणदूर गावाजवळील उमरगा – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 हा रस्ता गेल्या 14 वर्षापासून या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही ? याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. ये रे माझ्या मागल्याप्रमाणे असंख्य खड्डयांमुळे या रस्त्याची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी केविलवाणी अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांना नाक दाबून…

  • धाराशिव जिल्ह्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे लागेल – आमदार बसवराज पाटील

    रुपामाता परिवाराच्या वतीने आ.पाटील यांचा जंगी सत्कार, भाजपाचे निष्ठावंत कार्यकत्यांसह खा.ओमराजे यांची उपस्थिती आ.राणादादांच्या श्रेयवादाच्या राजकारणावर जोरदार टिका धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याचा सर्वागीण विकासासाठी व जिल्हयाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे लागेल नावलौकिक करण्यासाठी त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यांची गरज असे मत असे मत धाराशिव – बीड -लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे नूतन आमदार…

  • कोरेगाववाडी बससेवा सुरू करण्याची आ.प्रवीण स्वामी व आगारप्रमुख यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी

    उमरगा / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील कोरेगाव वाडी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने बस सेवा सुरू करण्यासाठीचे लेखी निवेदन आमदार प्रवीण स्वामी तसेच उमरगा एसटी आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांना उमरगा ते कोरेगाववाडी बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तालुक्यातील कोरेगाव वाडी येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची होत…

  • नळदुर्गच्या बाळासाहेब ठाकरे नगर उद्यानात वृक्षारोपण

    नळदुर्ग / प्रतिनिधी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगर, नळदुर्ग येथील उद्यानात सोमवार (दि. ३) सकाळी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. रामतीर्थ येथील पुरातन श्रीराम मंदिर परिसरात वृक्षारोपण, जतन व संवर्धनाचे कार्य करणाऱ्या रामभक्तांचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक सचिन डुकरे, राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून नळदुर्ग शहरात वृक्षलागवड व संवर्धन…

  • अण्णाभाऊ साठे जयंतीला पदाधिकारी गायब; संतप्त नागरिकांनी तेर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप

    तेर  /  प्रतिनिधी तेर ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतचे ग्राम पंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच उपस्थित नसल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकून  निषेध व्यक्त केला. यावेळी नागरीकानी महसूलचे तेरचे मंडळ अधिकारी शरद पवार यांना निवेदन दिले.यावेळी संभाजी कांबळे, कानिफनाथ देवकुळे, शशिकांत सोनवणे, विनोद कांबळे, दत्ता कांबळे, जोशीला लोमटे,लतिका पेठे व गावाती नागरीक उपस्थित होते.

  • व्ही.पी.शैक्षणिक संकुलात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

    धाराशिव  /  प्रतिनिधी येथील व्ही. पी. शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी आणि श्रमिकांच्या जीवनातील…

  • परंडा उपजिल्हा रुग्णालयात आण्णाभाऊ साठे जयंती साजरी

    परंडा   /  प्रतिनिधी  उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास सहअधीक्षक श्री. पवार , वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे मॅडम, डॉ. आकाश जाधवर, डॉ. आनंद मोरे, आरोग्य सहाय्यक अनिल भोसले, श्रीमती सुर्वेकर सिस्टर तसेच  कल्याण जोशी उपस्थित होते.