उमरगा / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील दाळींब येथे शिवाजीनगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या समस्या जाणून घेतल्या व शाळेस आवश्यक असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन तात्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर दाळींब येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस भेट देऊन जिर्ण झालेल्या पाणी टाकीचे पाहणी केली व तसेच विद्यार्थी संख्या जास्त व वर्ग खोल्या कमी…
धाराशिव / प्रतिनिधी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद धाराशिव व पंचायत समिती कळंब यांच्या संयुक्त विद्यमानाने कळंब पंचायत समितीच्या सभागृहात 05 दिवसांच्या शेळीपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला कळंब तालुक्यातील ५०० पेक्षा जास्त पशुपालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठा प्रतिसाद दिला. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी भाऊसाहेब…
तुळजापूर / प्रतिनिधी : रोटरी क्लब तुळजापूरच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास रोटरीयन क्षितिज झावरे (DGE), रोटरीयन विष्णू मोंढे (PDG), रोटरीयन अतुल सोनी (AG), रोट. प्रशांत अपराध (AG),रोट. संतोष लोखंडे (IPP) आणि रोट. राहुल तागड (IPS) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब तुळजापूरचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोट. अमरदाजी हंगरगेकर…
धाराशिव / प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची खासदार ओमराजे निंबाळकर भेट घेतली. मतदारसंघाच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्याबाबत अमितजी शहाकडूनही सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेनेचे मा.शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिली. यावेळी गुरव म्हणाले की, धाराशिव-तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्पातील उर्वरित तुळजापूर…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील क्रांतिवीर फकीरा नगर येथे साहित्यरत्न क्रांतीसुर्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे व खाऊचे वाटप आदी प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. तसेच सायंकाळच्या मिरवणुकीत रोबोट हत्ती हे विशेष आकर्षण ठरले. लहूरत्न कंपनी सामाजिक संघटना यांच्यावतीने ही मिरवणूक काढण्यात आली. फकीरा…
धाराशिव / प्रतिनिधी डायल 112 या आपत्कालीन सेवेला खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणार्या एका व्यक्तीविरुद्ध धाराशिव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवार, 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.24 वाजता शितल रघुनाथ कांबळे (रा. काकडे प्लॉट, धाराशिव) यांनी डायल 112 वर फोन करून 15 ऑगस्ट रोजी एका महिलेच्या माध्यमातून बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याची माहिती…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्याच्या कायमस्वरूपी जलसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कृष्णा–मराठवाडा (सिंचन) प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन केंद्र सरकारमार्फत आवश्यक आर्थिक सहाय्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाडा हा वारंवार दुष्काळाचा सामना करणारा प्रदेश असून राज्यातील…
परांडा / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यामध्ये परंडा तालुक्यातून जिल्हा सहकार बोर्डावर निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने नितीन(बापू)गाढवे यांचा परंडा पंचायत समिती येथे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जिल्हा प्रमुख दत्ता (अण्णा) साळुंके, पै. नवनाथ (अप्पा) जगताप, सभापती प्रतिनिधी अण्णासाहेब जाधव , सचिन सोनारीकर, कल्याण…
आमदार कैलास पाटील यांची प्रधान सचिव यांच्याकडे मागणी धाराशिव / प्रतिनिधी जिल्हयातील तांत्रिक उत्पादनावर आधारीत वगळलेल्या १४ महसुल मंडळांना व इतर ४३ मंडळांना पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनाच्या आधारे विमा भरपाई मिळण्याकरीता राज्य तक्रार निवारण समितीची तात्काळ सुनावणी आयोजित करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी प्रधान सचिव तथा राज्य तक्रार निवारण समिती यांच्याकडे केली…
येरमाळा / प्रतिनिधी वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे शिवसेना या दोन राजकीय गटांमध्ये जुन्या वादाच्या कारणावरून रविवारी (ता. २) सायंकाळी तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली.येरमाळा पोलीस ठाण्याचे पोहेकॉ रणजित गाडे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटांतील सुमारे ५० जणांविरुद्ध दंगल घडवून दहशत निर्माण करणे, कायदा व सुव्यवस्था बिघडविणे, शासकीय कामात अडथळा…