परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील नागरीकांच्या सोयीसाठी परंडा -लातूर- उदगीर ही एसटी बससेवा बार्शी- कळंब मार्गे सुरू करून तालुक्यातील नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करावी अशी मागणी नागरिकांनी परंडा एसटी आगार प्रमुखांकडे गुरुवार दि ६ रोजी निवेदनाद्वारे केली आहे . याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, परंडा आगाराच्या दोन एसटी बसेस परांड्याहून सोलापूरला जातात आणि…
आळणी येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत रंगीत तालीम धाराशिव / प्रतिनिधी पर्यावरण संरक्षण,हवामान संतुलन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित धाराशिव २.०’ अभियानाअंतर्गत १४ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील ३३ हेक्टर क्षेत्रात अवघ्या १२ तासांत १० लाख वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला…
धाराशिव / प्रतिनिधी बारामती येथे 22 ते 23 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय 19 वर्षाखालील थ्रो बॉल स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा थ्रोबॉल असोसिएशनच्या वतीने मुला- मुलींचा जिल्हा संघ निवड चाचणी शनिवारी (ता.8) सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ येथील मैदानावर होणार आहे. निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्म तारीख 1 जानेवारी 2008 रोजी झालेला असावा…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षा सौ अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मोबाईल स्टेटस वरून समाजमाध्यमामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत जि.प. अध्यक्षा सौ. पाटील यांनी आज याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे की, मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या…
तेर / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या ‘आपला जीव धाराशिव’ या उपक्रमांतर्गत तेर ग्रामपंचायतीने गावातील विद्यार्थी व नागरिकांसाठी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यानुसार दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत मोबाईल, टीव्ही तसेच इतर सर्व डिजिटल स्क्रीनचा वापर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या…
तुळजापूर / प्रतिनिधी विलासराव देशमुख सेंटर यांच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुळजापूर तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे, उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले, राज्य मागासवर्ग आयोग सदस्य डॉ. गोविंद काळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अशोक मरडे, विलासराव देशमुख सेंटरचे अग्निवेश शिंदे, अनिकेत देशमुख, सुनील बडुळकर, डॉ. शिवाजी जेटिथोर, डॉ. सतीश महामुनी,…
परंडा / प्रतिनिधी परंडा शहरातील मंडई पेठ येथील मुख्य रस्ता ते छत्रपती संभाजी महाराज चौक सोनारी रोड हा रस्ता शहरास जोडण्यात यावा या मागणीची निवेदन व्यापारी संघटना व समस्त शहरवासीस शेतकरी वर्ग यांच्यावतीने दि. ५ ऑगस्ट बुधवार रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना देण्यात आले. या दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, परंडा शहराला…
तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील भूमीपुत्र काटी येथील ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते सयाजीराव विजयसिंह देशमुख यांची काँग्रेसच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. यापूर्वी 29 जुलै 2024 रोजी त्यांच्याकडे जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या खा.सोनिया गांधी , खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र काँग्रेस…
जिल्हाधिकाऱ्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश शिवसेना मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या तक्रारीची दखल तुळजापुर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील गट क्रमांक १२४ मधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव (सामान्य प्रशासन विभाग)…
धाराशिव / प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय रुजविणे, वाढता स्क्रीन टाईम कमी करणे आणि कुटुंबातील संवाद अधिक सशक्त करण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘संध्याकाळी ७ ते ९ टीव्ही-मोबाईल बंद’ या अभिनव उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील ७१२ ग्रामपंचायतींमध्ये दररोज संध्याकाळी सात वाजता ग्रामपंचायतीचा भोंगा वाजताच अभ्यासासाठी दोन तासांचे वातावरण निर्माण…