उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी कर्जाच्या ओझ्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना -२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार २२४ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर तब्बल १०५ कोटी ८६ लाख ५४ हजार ७०४ रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा मिळाला असून,आगामी…
परंडा / प्रतिनिधी शिक्षक मिळावा यासाठी काही दिवसांपूर्वी आक्रमक आंदोलन छेडत शाळा प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सोनारी येथील ग्रामस्थांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. शुक्रवार दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी सोनारी येथील प्रशालेत आयोजित शानदार सोहळ्यात शाळेत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने…
कै. इंदुमती उकरंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्तदंगलकार नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथे कै. इंदुमती अशोकराव उकरंडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त रविवार, १६ ऑगस्ट रोजी दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य व यश संपादन केलेल्या ग्रामकन्यांचा ‘ग्रामकन्या कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार…
उमरगा / प्रतिनिधी नासा NASA अंतराळ संशोधन केंद्र, वॉशिंग्टन डी.सी. (USA) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अंतराळ संशोधन शैक्षणिक सहलीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्रिकोळीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. उमरगा तालुक्यातील इयत्ता 5 वी ते 7 वीच्या तब्बल 697 विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला होता.यामध्ये त्रिकोळी शाळेचे तीन विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहरात ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रविवार रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या कालावधीत शिवपार्वती मंगल कार्यालय तुळजापूर येथे रोटरी क्लब, राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, युवास्पंदन सामाजिक संस्था, आर्ट ऑफ लिविंग, मराठवाडा सामाजिक संस्था, विठाई हॉस्पिटल, कुतवळ हॉस्पिटल, शिवपार्वती मंगल कार्यालय यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून…
तुळजापूर / प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समिती, तुळजापूर येथे गुरुवार, दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या शेतमाल लिलावात ज्वारी व गहू या पिकांना उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. ज्वारीला प्रति क्विंटल ₹5,000, तर गव्हाला प्रति क्विंटल ₹3,000 असा उच्चांकी भाव मिळाला. मुख्य बाजार आवारात पार पडलेल्या या लिलाव प्रक्रियेला बाजार समितीचे सभापती…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२६ मधील इयत्ता आठवी व एप्रिल २०२६ मधील इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिष्यवृत्तीधारक…
MADC संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर तालुक्यात प्रस्तावित विमानतळाच्या उभारणीला महत्त्वाची गती मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)च्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी देत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश एमएडीसीचे मुख्य…
धाराशिव / प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या नावावर आलेल्या कृषी निविष्ठा मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांचे केवळ निलंबन नाही तर त्यांना तुरुंगात पाठवून लुटलेला प्रत्येक रुपया वसूल केला पाहिजे. अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली आहे. यावेळी कैलास पाटील म्हणाले की,जिल्ह्यातील कृषी निविष्ठा वाटपात झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर…
उमरगा / प्रतिनिधी उमरगा शहरातील गुंजोटी रोड लगत असलेल्या चालुक्य कॉलनीतील पाळीव व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी कॉलनीतील चिमुकल्याने मोहीम उघडली आहे. चालुक्य कॉलनी गुंजोटी रोड उमरगा येथील वसाहती मध्ये साठ घरे आहेत. त्यात अनेकांच्याकडे भाडेकरू आहेत. त्यामुळे लोकवस्ती वाढली आहे. या ठिकाणी काही जणांनी कुत्री पाळली आहेत. त्या कुत्र्यांनी अनेक लहान बालकांना…