Live News…..Breaking News!

.

  • खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत दाखल केला पीक विम्याचा प्रश्न

    मतदारसंघातील ३६ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना २०२५ खरीप हंगामाची पीक विमा नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी  धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नियम ३७७ अंतर्गत लोकसभेत शेतकऱ्यांच्या पीक विमा नुकसानभरपाईचा गंभीर प्रश्न दाखल केला आहे.            धाराशिव लोकसभा मतदारसंघातील धाराशिव, सोलापूर आणि लातूर जिल्ह्यांतील विविध महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांनी वर्ष २०२५ च्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक…

  • डी.एल.एड.वार्षिक परीक्षेत प्रथम वर्षात साक्षी फाटक, तर द्वितीय वर्षात प्रिती महाद्वार प्रथम

    भैरवनाथ अध्यापक विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी कळंब / प्रतिनिधी येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जून २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल.एड. वार्षिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रथम वर्षातून साक्षी दत्तात्रय फाटक हिने ८३.८० टक्के, तर द्वितीय वर्षातून प्रिती रमेश महाद्वार हिने ८५.३० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. डी.एल.एड. प्रथम वर्षाच्या वार्षिक परीक्षेसाठी विद्यालयातील…

  • नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

    धाराशिव / प्रतिनिधी छात्र नेत्या नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्यासाठी विविध सनदशीर मार्ग उपलब्ध असताना अशा प्रकारे व्यक्तीवर शाईफेक करणे ही निषेधार्ह बाब असून, अशा घटनांना थारा मिळता कामा नये, अशी भूमिका पक्षाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील…

  • ऑगस्ट क्रांती दिन व भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन उत्साहात साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त तसेच भारतीय युवक काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त (दि.09) धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून दोन्ही दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताचे गायन करण्यात येऊन स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे, स्वातंत्र्यसैनिक आणि…

  • नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या सौजन्याने दर्गाह परिसरात बोअरची व्यवस्था

    परंडा / प्रतिनिधी तालुक्यातील ढगपिंपरी येथील हजरत दाउल मलिक साहब रहेमतुल्लाह अलैह दर्गाह व मस्जिद परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. उर्सच्या दिवशी छावाचे मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख यांनी ही समस्या परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या निदर्शनास आणून दिली. गावकऱ्यांनी व उर्स कमिटी यांनी मांडलेल्या समस्येची तत्काळ दखल घेत “दिलेला…

  • सात महिन्याचे ऊसबिल थकले ; भाऊसाहेब बिराजदार कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे भीक मागो आंदोलन

    धाराशिव / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांनी दिलेल्या उसाचे सात महिन्याचे थकीत बिल मिळण्यासाठी व शासन नियमानुसार व्याजासह परतावा मिळण्यासाठी कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी आज शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या व कारखान्याकडून सात महिन्यापासून ऊस बिलाचे पैसे मिळत…

  • तुळजाभवानी मंदिराच्या महाव्दारासमोरील किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापुर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या महाद्वारासमोर वाढलेल्या अतिक्रमणामुळे भाविकांना मंदिरात ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता  अखेर  मंदिर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महाद्वार परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने भाविकांच्या ये-जा करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.विशिष्ट जागा असतानाही किरकोळ विक्रेते मंदीरासमोर गर्दी करत होते. मंदिराच्या महाद्वारासमोर बांगडी विक्रेत्या…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांची धाराशिव लोकसभेच्या विकासावर सविस्तर चर्चा

    शिवसेना खासदारांच्या अल्पोपहार बैठकीत धाराशिव लोकसभेच्या विकासकामांना गती देण्यासाठी केंद्राच्या सहकार्याबाबत सकारात्मक संवाद   धाराशिव / प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे शिवसेना पक्षाच्या खासदारांना अल्पोपहारासाठी निमंत्रित केले होते. या बैठकीस धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते. बैठकीदरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न…

  • नोकरी इच्छुकांसाठी ११ ऑगस्टला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

    ३९३ पदांसाठी विविध कंपन्यांची भरती ; दहावीपासून पदवीधरांपर्यंतच्या उमेदवारांना संधी धाराशिव / प्रतिनिधी रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून सुशिक्षित बेरोजगार आणि नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमाअंतर्गत मंगळवार,११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०…

  • ढोकी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; हरवलेले 12 मोबाईल शोधून मालकांना परत

    तेर / प्रतिनिधी पोलीस ठाणे ढोकी हद्दीतील नागरिकांचे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेला यश मिळाले असून, दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी हरवलेल्या 12 मोबाईलचा शोध घेऊन ते संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आले. ढोकी पोलीस ठाण्याकडे मोबाईल चोरी व हरवल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने विशेष शोधमोहीम राबविण्यात आली होती. या…