धाराशिव / प्रतिनिधी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या पुण्यतिथीनिमित्त धाराशिव शहरातील माळी गल्ली येथे धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित समाजबांधवांनी संत सावता महाराज यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. संत शिरोमणी सावता महाराज…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने धाराशिव जिल्हा मित्र मंडळ समितीच्या वतीने मोफत वह्या वाटप कार्यक्रम रविवारी (दि.९) उत्साहात पार पडला. शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय, जिजाऊ चौक, बार्शी नाका येथे आयोजित कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना मोफत २५०० वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन…
तुळजापूर / प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पांगरे येथील अभिजीत विलास काकडे यांनी आज श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ९६७ ग्रॅम वजनाचा चांदीचा टोप अर्पण केला. अभिजीत काकडे हे सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवींची ओटी भरून कुलधर्म-कुलाचार करत देवींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी ९६७ ग्रॅम…
पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांच्या घोषणेची पूर्तता; वैज्ञानिक शैक्षणिक सहलीसाठी २ कोटी २० लाखांचा निधी मंजूर व वितरित धाराशिव / प्रतिनिधी ग्रामीण मातीतील बुद्धिमत्तेला आकाशाची सीमा नसते, फक्त त्या स्वप्नांना पंख देणाऱ्या संधीची गरज असते! धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या अशाच स्वप्नांना आता थेट अमेरिकेतील NASAची दिशा मिळाली आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक…
धाराशिव / प्रतिनिधी राज्यातील औद्योगिक विकासामुळे ग्रामीण तसेच नागरी भागातील परिवहन सेवेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.जलद परिवहनासाठी दुचाकी,चारचाकी वाहनांची संख्या सातत्याने वाढत असल्याने रस्त्यांवरील गर्दी,अपघात आणि वायुप्रदूषणाच्या समस्याही वाढत आहेत. वाहन नोंदणी,तपासणी,चालक अनुज्ञप्ती, दळणवळणाच्या अद्ययावत सेवा तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत नियम,कर कायदे व प्रवासी कर कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मोटार वाहन विभागावर…
नळदुर्ग / प्रतिनिधी येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील बारावी विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एम एच टी सी इ टी प्रवेश परीक्षा विशेष तयारी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत सीईटी सेल च्या वतीने आज महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये सीईटी सेलचे संचालक प्रा. एच व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील रोटरी क्लब तुळजापूर, युवास्पंदन सामाजिक संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राजा शिव छत्रपती क्रिकेट क्लब , आर्ट ऑफ लिविंग मराठवाडा सामाजिक संस्था,शिवपार्वती मंगल कार्यालय, विठाई हॉस्पिटल कुतवळ हॉस्पिटल,तसेच विविध सामाजिक संस्थेच्या वतीने ९आँगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २९६ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे…
मुरूम / प्रतिनिधी सामाजिक कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ कामगिरी केल्याबद्दल, उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाचे सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. शिवाजी शिंदे यांना राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘बेस्ट अचीवर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे नुकताच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथे दि.9 ऑगस्ट2026 रोजी धाराशिव जिल्ह्यातील मूळ आदिवासी कर्मचारी वर्गातर्फे जागतिक आदिवासी दिन रायगड फंक्शन हॉलमध्ये साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त जिल्ह्यातील नवनियुक्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जागतिक मूळ निवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस सर्वप्रथम डिसेंबर 1994 मध्ये…
श्री संत गोरोबा काकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी तेर / प्रतिनिधी आषाढी वारी नुकतीच पार पडली असतानाच कामिका एकादशीच्या निमित्ताने श्री संत गोरोबा काका यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो वारकरी भाविक भक्त तेर येथे दाखल झाले. त्यामुळे तेर नगरीला पुन्हा एकदा भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले. खांद्यावर पताका, हातात टाळ-मृदंग आणि मुखी विठ्ठल नामाचा गजर…