धाराशिव / प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी,लाभार्थी आणि व्यक्तींचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज, महिला सक्षमीकरण,सामाजिक न्याय, शेतकरी कर्जमाफी तसेच पोलिस दलातील प्रदीर्घ व निष्कलंक सेवेसाठी हा सन्मान देण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ अंतर्गत राज्यस्तरावर…
शेतकरी,महिला,युवक आणि उद्योग विकासाच्या केंद्रस्थानी –पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव / प्रतिनिधी धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याच्या हातात पैसा आला, शेती सक्षम झाली तर गावाची आणि जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होते. शेतकरी,महिला,युवक,उद्योग,शिक्षण,आरोग्य आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास साधत ‘विकसित भारतासाठी विकसित धाराशिव’ घडविण्याचा संकल्प करूया,असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. जिल्हाधिकारी…
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुळजापूर / pratin पवित्र श्रावण महिनातील नागपंचमीच्या पावन सणाचे औचित्य साधून तुळजापूर नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. प्रियंका विजय (सर) गंगणे यांच्या पुढाकारातून शहरातील माता-भगिनींसाठी पारंपरिक झोक्याच्या खेळाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील महिला, युवती आणि लहान मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागपंचमीच्या पारंपरिक उत्सवाला आधुनिक काळात ही जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात…
४५ मीटर उंच स्वराज्य ध्वजचे उद्घाटन धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेला ४५ मीटर उंच भगवा ध्वज हा केवळ ध्वज नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला, स्वाभिमानाला आणि स्वराज्याच्या विचारांना नमन करणारे ऐतिहासिक प्रतीक आहे.या भगव्याकडे पाहताना प्रत्येक तरुणाने ‘महाराजांनी आपल्या काळात स्वराज्यासाठी काय केले आणि आपण आपल्या काळात समाजासाठी काय करणार हा…
‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद धाराशिव / प्रतिनिधी ‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षारोपण करून धाराशिवने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे.मात्र,हा विक्रम केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता लावलेली प्रत्येक रोपे जगविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.‘आपण विक्रम तर केलाच; पण त्यापेक्षा मोठा विक्रम…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा सहकारी बोर्ड मर्या.धाराशिव या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अभिलाष लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली सहकार बोर्डाच्या कार्यालयात दि.11 ऑगस्ट 2026 रोजी उत्साही वातावरणात संपन्न झाली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सहकार तज्ञ सुरेशभाऊ देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक अँड.रवींद्र कदम,कळंब बाजार समितीचे संचालक विकास बारकुल,राज्य सहकारी संघाचे सदाशिव बोडके, जिल्हा…
तुळजापूर / प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाचे तुळजापूर मा. तालुकाप्रमुख अमोल जाधव यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थांना व रुग्णांना खाऊ व फळे वाटप करण्यात आले. अमोल जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात दिवसभर पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, हितचिंतक तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी केली होती. अमोल…
तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरपरिषद हद्दीतील विविध विकासकामे नगरपरिषदेमार्फतच करण्यात यावीत. नगरपरिषदेला मंजूर झालेला विकास निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्या विभागामार्फत कामे करण्यास आमचा तीव्र विरोध राहील, अशी संतप्त भूमिका नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष रामचंद्र रो चकरी, गटनेते औदुंबर कदम यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत मांडली. नगरविकास खात्याकडून तुळजापूर नगरपरिषदेसाठी मंजूर झालेल्या पाच कोटी…
धाराशिव / प्रतिनिधी योगासनाला आता खेळ म्हणून अधिकृत मान्यता मिळाल्याने या क्षेत्रातील खेळाडूंसाठी क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत फिटनेसकडे दुर्लक्ष होत असताना योगासन हा शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी प्रभावी पर्याय ठरत आहे. ‘फिटनेससाठी योगासन आणि यशासाठी सातत्यपूर्ण सराव’ हा मंत्र प्रत्येक खेळाडूने अंगीकारल्यास भविष्यात धाराशिव जिल्ह्यातून राज्य व…
धाराशिव / प्रतिनिधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत १ फेब्रुवारी २०१९ नंतर कुटुंब विभाजन, वारसा किंवा जमिनीच्या विभाजनामुळे स्वतंत्र भूधारक बनलेल्या पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या प्रश्नावर धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज लोकसभेत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकारला विचारले की, १ जानेवारी २०१९ नंतर कुटुंब…