नाट्य परिषदेचे पालकमंत्र्याना निवेदन धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी शासनाने मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा निधी अद्याप विनावापर असल्याने, नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, धाराशिव शाखेने केली आहे. यासंदर्भात परिवहनमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांना निवेदन देण्यात आले. नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी परिषदेने यापूर्वी…
येरमाळा / प्रतिनिधी श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग साधत येरमाळा येथील स्वराज्य फिटनेस क्लबमध्ये युवकांनी अनोख्या पद्धतीने महादेवाची पिंड साकारून भक्तिभावाने पूजा केली. व्यायामशाळेतील साहित्याचा कल्पक वापर करून साकारलेल्या या पिंडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. जिममधील विविध व्यायाम साहित्याचा वापर करून महादेवाची पिंड तयार करण्यात आली. फुलांची आकर्षक सजावट करून पिंडीसमोर दीप प्रज्वलित करण्यात…
कळंब / प्रतिनिधी कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोरील चौकाचे ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक’ असे नामकरण यापूर्वीच करण्यात आले होते. या चौकाचे सुशोभीकरण करून येथे उभारण्यात आलेल्या महात्मा फुले यांच्या शिल्पाचे अनावरण १५ ऑगस्ट रोजी धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महात्मा फुले चौक कृती समितीच्या वतीने मागील वर्षी तहसील…
परंडा / प्रतिनिधी परंडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक रमेश क्षिरसागर, साधु शेवाळे, अतुल खताळ , सौ.स्नेहल लोमटे यांनी अनेक वेळा आपल्या कारकीर्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्तव्यदक्ष राहुन अनेक वेळा उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यामुळे अनेक वेळा वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी कौतुक करत त्यांचा गौरव केला . या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी नेहमी…
परंडा / प्रतिनिधी तालुक्यातील सिद्धेश्वर विद्यालय देवगाव (खुर्द) येथे 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक आणि उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अनुभवला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक श्री धनंजय गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.यावेळी विविध परीक्षा, क्रीडा स्पर्धा यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत…
“हरित धाराशिव २.०’ मध्ये अहिल्या सखी मंचच्या लेकींचा स्वयंस्फूर्त सहभाग धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील ‘अहिल्या सखी मंच’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, धाराशिव’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी धाराशिव येथे अत्यंत आदराने साजरी करण्यात आली. या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर चौकात जमलेल्या महिलांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या…
नागपंचमीच्या आदल्या दिवशी हिंदू संस्कृतीमध्ये साजरा केला जाणारा ‘भावाचा उपवास’ हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि नात्यांच्या अखंडतेचा सुंदर संस्कार आहे. आपली संस्कृती आपल्याला सण साजरे करायला शिकवतेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नाती जपायला शिकवते. मात्र अलीकडच्या काळात समाजामध्ये एक विचित्र बदल जाणवतोय. कणभर संपत्तीसाठी मनभर प्रेमाची नाती तोडली जात…
तेर / प्रतिनिधी तेर येथे क्रिकेट व क्रीडाप्रेमींसाठी ‘ईगल स्पोर्ट्स अँड बॅट मॅन्युफॅक्चरर’ या नवीन क्रीडा साहित्य केंद्राचा भव्य शुभारंभ तेर येथील क्रिकेटपटू गोरख माळी यांच्या हस्ते करण्यात आला. नरेश चंदले यांनी सुरू केलेल्या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यास क्रीडाप्रेमी, क्रिकेटपटू, युवक तसेच नागरिकांची उपस्थिती होती. ‘ईगल स्पोर्ट्स’मध्ये क्रिकेटसह विविध खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.…
‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; कमी वनक्षेत्र असलेल्या जिल्ह्यात जैवविविधतेच्या संवर्धनाला नवी दिशा धाराशिव / प्रतिनिधी पावसाचे कमी प्रमाण, दुष्काळाची सातत्याने झळ आणि एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत अत्यल्प वनक्षेत्र अशी पर्यावरणीय आव्हाने असलेल्या धाराशिव जिल्ह्याने शुक्रवारी हिरवाईच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले. जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकाच वेळी १२ तासांत १० लाख ७…
मुरूम / प्रतिनिधी माझ गाव माझी जबाबदारी उपक्रमातर्गत बेळंब येथील सामाजिक कार्यकर्ता करण सुधाकर रामपुरे यांच्या संकल्पनेतून गावातील बसवेश्वर चौक, आंबेडकर चौक, आझाद चौक, गावातील मंदिर परिसर व मदारसाहेब दर्गा परिसरात गावातील सामाजिक कार्यकर्ते मिळून स्वच्छता अभियान राबविले जात आहे. गावातील तरुण वर्ग जेष्ठ नागरिक यांनी ही यात सहभाग नोंदवला आहे. बेळंब येथील सामाजिक कार्यकर्ते…