Live News…..Breaking News!

.

  • पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना वेग; पुणे DRM कार्यालयात सविस्तर चर्चा

    डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी दिले केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यासह खासदारांना निवेदन धाराशिव / प्रतिनिधी पंढरपूर–शेगाव या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या मागणीला बळकटी देण्यासाठी पुणे येथील शिवाजीनगर रेल्वे भवन येथे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) मा. राजेश कुमार वर्मा यांची भेट घेऊन रेल्वे प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गामुळे पंढरपूर, भूम, परंडा, वाशी…

  • उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संजय निंबाळकर, रामेश्वर शेटेंचा जाहीर पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नव्या घडामोडीला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी (श प ) पक्षाकडून धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविलेले संजय निंबाळकर आणि शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा वकील आघाडीचे सयंजोक खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष ऍड. रामेश्वर शेटे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव…

  • तुळजापूरला अत्याधुनिक नवीन जिल्हा विश्रामगृह — आमदार राणाजगजीतसिंह पाटील

    १६ कोटी ३४ लाखांचा खर्च प्रस्तावित; सोलर पॅनेल, सेंट्रलाइज्ड एसीसह आधुनिक सुविधा देण्याचे नियोजन धाराशिव / प्रतिनिधी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथील प्रस्तावित नवीन जिल्हा विश्रामगृहाच्या बांधकामाला गती मिळाली आहे. अत्याधुनिक, दर्जेदार आणि सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज असे नवीन विश्रामगृह लवकरच साकारण्याचा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिल्या आहेत. याबाबत मंत्रालयात…

  • सकळ राजपूत समाजाच्या वतीने धीरज परदेशीं यांच्या हत्येचा निषेध

    परंडा / प्रतिनिधी परांडा येथील सकल क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने अहिल्यानगर येथील महानगरपालिका कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्याप्रकरणी परंडा येथील सकल क्षत्रिय राजपूत समाजाने निषेध व्यक्त करून मारेकरांना कठोर शिक्षा करावी असे लेखी निवेदन परंडा तहसीलदार यांना देण्यात आले आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की, अहिल्यानगर येथील महानगरपालिका कर्मचारी श्री धीरज परदेशी यांचे झालेली हत्या…

  • सरस्वती व कल्याणसागर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

    परंडा / प्रतिनिधी 80 व्या स्वातंत्र्य दिन कल्याणसागर समूहाच्या परंडा येथील कल्याणसागर माध्यमिक विद्यालय व सरस्वती प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अजित पाटील संस्थेच्या सचिव प्रज्ञाताई कुलकर्णी, रामचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ निवृत्त क्रीडा शिक्षक शिवाजीराव कदम, सामाजिक कार्यकर्ते…

  • 2027 अखेर पर्यंत धाराशिव तुळजापुर सोलापूर रेल्वे मार्ग पुर्ण करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

    सोलापूर -धाराशिव- छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचा डीपीआर मंजूर करण्याची मागणी धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव मध्य रेल्वेच्या पुणे व सोलापूर विभाग समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीस धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे सुविधांच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न, प्रलंबित प्रकल्प आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबतच्या…

  • धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’च्या माध्यमातून पाच देवरायांची निर्मिती — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    -पाच कंपनांच्या सीएसआर निधीतून वृक्षारोपण व संवर्धन धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने प्रत्येकी पाच एकर जागेवर पाच नवीन देवराया विकसित करण्यात येणार असून, या उपक्रमासाठी पाच नामांकित कंपन्यांच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहभाग घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. बैठकीस ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे…

  • साहित्यिक हे देश व समाजाच्या जडणघडणीचे शिल्पकार – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

    धाराशिव येथे साहित्य गौरव पुरस्काराचे शानदार वितरण धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्र विकासासह समाजाच्या जडणघडणीत साहित्यिक आणि कलावंतांचे योगदान अनन्यसाधारण असून, त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा, विचारांना समृद्धी आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते. शांतीचे व क्रांतीचे वारसदार घडविण्याची ताकद साहित्य आणि कलेत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या युगात झपाट्याने कमी होत चाललेली वाचनसंस्कृती जपणे, तिचे संवर्धन करणे आणि…

  • जिल्हाधिकारी कार्यालयात कायदे विषयक मदत केंद्राचे उद्घाटन देशातील पहिलाच उपक्रम

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भारतातील पहिल्या ‘ कायदेविषयक मदत केंद्रा’चे (Legal Aid Clinic) आज सायंकाळी 5.30 वाजता उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये कीर्तीकिरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव, न्या. भाग्यश्री पाटील सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव, विद्याचरण कडवकर निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव, देवेंद्र कटके उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग…

  • नशामुक्त धाराशिवची दिली हाक : युवकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

    धाराशिव / प्रतिनिधी व्यसनाच्या विळख्यात अडकणाऱ्या तरुणाईला योग्य वेळी दिशा मिळाली,तर तिची ऊर्जा समाजघडणीसाठी उपयोगात येऊ शकते.याच भावनेतून जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘नशामुक्त धाराशिव’ अभियानाला युवक,विद्यार्थी आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, जीवन कौशल्यांचे प्रशिक्षण आणि नशामुक्तीची सामूहिक शपथ यामुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत…