Live News…..Breaking News!

.

  • तेरणाचा अनोखा उपक्रम प्रशिक्षणातून ८६ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख संधी”

    धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फार्मसी विभागात सहा महिन्यांचा इंटर्नशिप कार्यक्रम झाला यशस्वी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फार्मसी विभागातील तृतीय व अंतिम वर्षाच्या बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कोडिंग आणि फार्माकोव्हिजिलन्स या विषयांवर सहा महिन्यांचा इंटर्नशिप व प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. एन्क्टी टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या सहकार्याने राबविण्यात…

  • जिल्हा परिषद धाराशिव येथे नशामुक्त प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अंमली पदार्थांच्या गैरवापराविरोधातील राष्ट्रीय प्रतिज्ञा’ या अभियानांतर्गत जिल्हा परिषद धाराशिव येथे नशामुक्तीचा संकल्प करण्यात आला. जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत समाजकल्याण विभाग आणि यश मेडिकल फाउंडेशन येरमाळा, ता. कळंब, जि. धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार…

  • पीक विमा न दिल्यास बैलगाडी व ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

    ऍड. गुंड यांच्यासह शेतकऱ्यांचा इशारा धाराशिव / प्रतिनिधी खरीप २०२५ हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून तांत्रिक कारणांमुळे वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा तथा रुपामाता परिवाराचे संस्थापक अॅड. व्यंकट गुंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी मा. किर्ती किरण पुजार यांची…

  • जि. प. अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत तेर येथे ‘मंगळागौर माहेरवाशीण’ कार्यक्रमाचे आयोजन

    तेर / प्रतिनिधी मंगळागौरीच्या आगमनानिमित्त तेर येथील जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या निवासस्थानी मंगळागौर माहेरवाशीण या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळागौर हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील महिलांचा उत्साह, आनंद आणि आपुलकीचा सण मानला जातो. या निमित्ताने महिलांसाठी मंगळागौरीचे पारंपरिक खेळ, फुगड्या, विविध सांस्कृतिक उपक्रम आणि आनंदाचे क्षण अनुभवता आले. आई-मुलगी, सासू-सून तसेच…

  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सभापती ऍड आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते सत्कार

    मुरूम / प्रतिनिधी नासा जिल्हास्तरीय परिक्षेत अंतिम निवड झालेल्या उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील ३ व लोहारा तालुक्यातील २ गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा उमरगा पंचायत समितीच्या सभापती तथा ज्ञानज्योती फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड.आकांक्षा चौगुले यांच्यावतीने मंगळवार दि.१८ रोजी शहरातील ज्ञानज्योती अभ्यासिकेत सत्कार केला. या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा अंतराळ संस्थेस भेट देण्याची संधी मिळणार…

  • SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्यावी; पात्र मतदारांचे नाव वगळले जाऊ नये – डॉ.प्रतापसिंहपाटील

    धाराशिव / प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या प्रक्रियेत नागरिकांना आपले नाव तपासण्यास तसेच आवश्यक दावे व हरकती दाखल करण्यासाठी पुरेशी मुदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

  • अणदूर मध्ये श्री संत बाळूमामाच्या पालखी महोत्सवाचे अभूतपूर्व स्वागत – भाविक मंत्रमुग्ध..! भंडाऱ्याची मुक्त उधळण —

    अणदूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील अणदूर मल्हार नगरीत प्रथमच श्री संत बाळूमामाच्या पालखीचे अभूतपूर्व जल्लोषात स्वागत झाले. ” येळकोट येळकोट जय मल्हार च्या ” जय घोषात भंडाऱ्याची उधळण करत भाविक मंत्रमुग्ध झाले. या महोत्सवात परिसरासह शेकडो भाविक उपस्थित होते. बिरूदेवाच्या मंदिरापासून गावातील मुख्य रस्त्यावरून शेकडो भाविकांच्या साक्षीने ” बाळूमामाच्या नावानं चांगभलं ” च्या जयघोषाने संपूर्ण…

  • नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या जि. प. शाळामधील विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील इयत्ता ५ वी ते ९ वीच्या २० गुणवंत विद्यार्थ्यांची परीक्षेच्या माध्यमातून नासा अंतराळ संशोधन केंद्राच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जि. प. अधक्ष्या अर्चनाताई…

  • सायबर फसवणुकीपासून कसे सावध रहावे

    जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकारातुन बुधवारी विशेष मार्गदर्शन धाराशिव / प्रतिनिधी डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर फसवणुकीचे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत. व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सजग राहणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दि.१९…

  • तुळजाभवानी मंदिरात नागपंचमीचा सण पारंपरिक उत्साहात साजरा

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिरात नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सोमवारी पहाटे श्री तुळजाभवानी मातेच्या समोर नागदेवतेची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी नागदेवतेच्या दर्शनासाठी गर्दी केली. नागपंचमीच्या निमित्ताने महिलांनी नागदेवतेची मनोभावे पूजाअर्चा करून सुख-समृद्धी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय…