धाराशिव / प्रतिनिधी सध्याच्या डिजिटल युगात घरफोड्यांचे प्रमाण कमी झाले आहे, परंतु सायबर गुन्ह्यांतून आर्थिक गुन्हेगारी वाढली आहे. यासाठी नागरिकांनी आपले डिजिटल व्यवहार अत्यंत सजगतेने करायला हवेत, असे प्रतिपादन प्रसिध्द सायबर सुरक्षातज्ञ डॉ. धनंजय देशपांडे यांनी केले. जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऑनलाईन व्यवहार करताना काय काळजी घ्यावी…
धाराशिव / प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद क्रीडा मंडळाच्या वतीने टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सतरा वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत प्रथम स्वदिप नवले, व द्वितीय जयराज बारकूल हे आले आहेत तर मुलींमधून प्रथम कु.ज्ञानेश्वरी कांबळे,व द्वितीय श्रेया आडसूळ ह्या विजयी झाल्या आहेत. तसेच ओपन मधून सुमित चंदनशिवे हे प्रथम व विल्सन…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरात दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी “कॅन्सर अवेअरनेस” या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेली साडी वॉकेथॉन उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडली. याच जनजागृतीच्या शृंखलेतील पुढील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून कॅन्सर डिटेक्शन कॅम्प ( निदान शिबीर ) आयोजित करण्यात आले आहे. विवेकानंद रुग्णालय, लातूर यांच्या सहकार्याने विशेष कॅन्सर डिटेक्शन व्हॅन धाराशिवमध्ये येणार असून, या…
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास कळंब / प्रतिनिधी कळंब नगर पालिकेतील उबाठा गटाचे नऊ आणि काँग्रेसचा एका अशा एकूण दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सोलापूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धाराशिवचे संपर्कमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,…
धाराशिव / प्रतिनिधी अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करावा. पीडितांना वेळेत न्याय मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तपासात गती आणून आवश्यक कार्यवाही तत्परतेने करावी,अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक आज २० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण…
धाराशिव / प्रतिनिधी माती व जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे.या दिनाचे औचित्य साधून जनमानसात पाणी आणि मातीच्या संवर्धनाची चळवळ उभी करण्यासाठी राज्यव्यापी ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. माती व…
अंदाजे एक कोटी २७ लाखाचे नुकसान, मध्यरात्री आगीचे तांडव येरमाळा / प्रतिनिधी दुकान बंद करून घरी गेलेल्या येरमाळयातील व्यापाऱ्यांसाठी बुधवारची रात्र काळरात्र ठरली. दुकानातील वीजेच्या स्मार्ट मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीने येरमाळ्यातील येरमाळा कळंब रोडवरील तीन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत दुकानातील साहित्य, यंत्रसामग्री, फर्निचर व इतर वस्तू जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हा परिषद धाराशिव ही ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असून, आणखी एका अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ४ ते ५ महिलांना मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. या उपक्रमाची जबाबदारी उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या…
तेर / प्रतिनिधी जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त तेर येथील फोटोग्राफर गोरख माळी, सादिक तांबोळी,पवण गोरे,तेजस कोकरे,अभि गोरे, लक्ष्मण पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.गुरुप्रसाद चिवटे ,इंद्रजीत कोळपे,सुनिल गायकवाड ,राजाभाऊ आंधळे ,अतुल इंगळे ,अँड. श्रीकांत माळी ,प्रविण साळुंके ,प्रा.शरद माळी ,अजय चव्हाण ,नवनाथ पांचाळ ,गणेश नाईकवाडी ,विशाल पांचाळ ,कांचन इंगळे ,राहुल गायकवाड ,नरहरी बडवे आदी उपस्थित…
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाला बळ धाराशिव / प्रतिनिधी शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नंदनवन, मुंबई येथे वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह १५ नगरसेवक तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश करत पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर…