व्यावसायिकांना हटविण्याच्या कारवाईला तीव्र विरोध तुळजापूर / प्रतिनिधी तालुक्यातील तामलवाडी टोलनाका परिसरातील गाळाधारक शेतकरी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, पान स्टॉल, दूध विक्रेते, स्नॅक्स सेंटर चालक तसेच इतर स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगार व उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या व्यावसायिकांना हटविण्याच्या प्रस्तावित कारवाईच्या निषेधार्थ धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तामलवाडी टोलनाका परिसरात…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथे साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी प्रतिष्ठान यांच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनीही साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला. यावेळी विनोद कांबळे, संभाजी कांबळे, अमोल कसबे, नारायण साळुंके,विलास रसाळ , विलास तौर,दत्ता कांबळे,अभिमान रसाळ, सुखदेव पेठे,पांडुरंग बगाडे,प्रजोत रसाळ,पृथ्वीराज साळुंके ,आदेश…
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात यावर्षी पावसाने मोठ्या प्रमाणात ओढ दिल्याने प्रमुख खरीप पीक असलेले सोयाबीन संकटात सापडले आहे. पाण्याअभावी अनेक भागांतील सोयाबीन पीक करपण्याच्या स्थितीत असून, त्यातच विविध रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पीक पाहणी,…
धाराशिव / प्रतिनिधी अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती, जिल्हा धाराशिवच्या वतीने आयोजित ‘स्वर स्वातंत्र्याचे’ हे देशभक्तीपर कविसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हे राज्यस्तरीय कविसंमेलन झाले. सुप्रसिद्ध गझलकार प्रा. शेखर गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनाचे उद्घाटन डॉ अभय शहापूरकर यांच्या हस्ते…
प्रा. डॉ. विलास खडके यांचे व्याख्यान मुरूम / प्रतिनिधी येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जल संवर्धन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २१) विशेष मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मानवी जीवनातील पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विलास…
येरमाळा / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून राज्यासह परराज्यातही लौकिक असलेल्या येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून देवीच्या मंदिराची, धार्मिक परंपरांची आणि नयनरम्य बालाघाट परिसराची माहिती देशभर पोहोचत असल्याने भाविकांचा ओघ वाढला आहे. सध्या दररोज दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून भाविकांना…
धाराशिव / प्रतिनिधी येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १९९९ मध्ये याच महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले तीन माजी विद्यार्थी पास झाल्यानंतर २७ वर्षांनी कॉलेजमध्ये आले होते. यावेळी सेमीकंडक्टर इंडिया येथे प्रकल्प व्यवस्थापक (प्रोजेक्ट मॅनेजर) म्हणून कार्यरत असलेले श्री. आशिष कुमार शर्मा, कॅपजेमिनी मुंबई येथे प्रकल्प…
धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे तसेच महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे स्वीय सहाय्यक आणि गुंजोटी गावचे सुपुत्र दीपक येवते यांना दिल्ली येथे डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. नरचर अँड पीस फाउंडेशन, दिल्ली यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मंगेश चिवटे आणि दीपक…
धाराशिव / प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाराष्ट्रात अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ-ब-क-ड पद्धतीने उपवर्गीकरण लागू करण्यास विलंब होत असल्याबद्दल भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली. अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 पोटजातींना आरक्षणाचा समन्यायी लाभ मिळण्यासाठी उपवर्गीकरण तातडीने लागू करावे. सरकारने याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार गोरखे यांनी…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील क्षयरोग निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यासाठी “टीबी मुक्त ग्रामपंचायत गुणगौरव सोहळा – २०२५” पंचायत समिती सभागृह, परंडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात रौप्य पदक विजेत्या २७ ग्रामपंचायती व कांस्य पदक विजेत्या ६ ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला, तर सुवर्णपदक विजेत्या २ ग्रामपंचायतींचा सत्कार जिल्हास्तरावर करण्यात येणार असल्याची…