Live News…..Breaking News!

.

  • पावसाची पाठ; जिल्ह्यावर गंभीर पाणीटंचाईचे सावट!

    पुढील जूनपर्यंत पुरवावे लागणार पाणी; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे काटेकोर नियोजनाचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३५ टक्केच पाऊस झाल्यामुळे, उपलब्ध असलेला मोजका पाणीसाठा पुढील १० महिने अर्थात पुढील वर्षाच्या जूनपर्यंत अत्यंत काटेकोरपणे पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर…

  • धाराशिवमध्ये आज ‘युवा संमेलनचे आयोजन, करिअर मार्गदर्शनासह राष्ट्रनिर्माणाचा संकल्प

    धाराशिव / प्रतिनिधी युवा भारतच्या वतीने धाराशिव शहरात युवा संमेलन २०२६ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा विचार, नवीन दिशा आणि सक्षम भारत या संकल्पनेवर आधारित या संमेलनात युवकांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन तसेच राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी विचार देण्यात येणार आहेत. आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत शहरातील…

  • खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाला बळ; पंचायत समिती सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    धाराशिव / प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धाराशिव जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. संसदीय गटनेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते बेंबळी पंचायत समिती सदस्य मोहन अप्पा वाघुलकर, गोवर्धनवाडी पंचायत समिती…

  • तंत्रज्ञान हे साधन आहे साध्य नव्हे, त्याचा वापर विवेकाने करणे गरजेचे — भैरवनाथ कानडे

    मुरूम / प्रतिनिधी आजच्या गतिमान युगात बातमी केवळ पोहोचवणे एवढेच माध्यमांचे काम राहिलेले नाही, तर सत्य आणि निष्पक्ष माहिती समाजासमोर आणणे हाच लोकशाहीचा खरा आधार असून ही पत्रकाराची प्राथमिक जबाबदारी आहे. घटनेमागचे सत्य शोधून काढणे हे खऱ्या शोध पत्रकाराचे काम असल्याचे सांगत त्यांनी शोध पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. बातमी तयार करताना तिचा हेतू समाजहित डोळ्यांसमोर…

  • तुळजापुरातील अवैध धंद्यांवर कारवाईच्या मागणीसाठी

    नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचा आमरण उपोषणाचा इशारा; तीन दिवसांत कारवाईची मागणी तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहरातील विविध भागांत अवेध सुरू असल्याचा आरोप असलेल्या मटका, जुगार, हातभट्टी, ताडी, दारू विक्री तसेच अमली पदार्थांच्या कथित अवैध व्यवसायांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्ष विनोद विलासराव गंगणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब…

  • ‘माझे गाव,आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला बळ ;केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवेवर दोन दिवसीय कार्यशाळा

    धाराशिव / प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘कस काय मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र,केशेगाव येथे सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दि. १९ व २० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील प्रत्येक नागरिकाला गावातच गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक,सुलभ…

  • नवीन आव्हाने, यशाची सूत्रे; तेरणा कॉलेजमध्ये प्रेरणादायी व्याख्यान

    धाराशिव / प्रतिनिधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, धाराशिव येथील बेसिक सायन्स अँड ह्युमॅनिटीज (बीएसएच) विभागाच्या वतीने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘फ्रॉम स्कूल टू कॉलेज – अडॅप्टइंग, ग्रोइंग, सक्सीडिंग’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी मिस…

  • परंडा तालुक्यात टीबी मुक्त ग्राम पंचायतीचा गौरव सोहळा उत्साहात

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील क्षयरोग निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यासाठी “टीबी मुक्त ग्रामपंचायत गुणगौरव सोहळा – २०२५” पंचायत समिती सभागृह, परंडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात रौप्य पदक विजेत्या २७ ग्रामपंचायती व कांस्य पदक विजेत्या ६ ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला, तर सुवर्णपदक विजेत्या २ ग्रामपंचायतींचा सत्कार जिल्हास्तरावर करण्यात येणार असल्याची…

  • ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

    पाणी व माती संवर्धनासाठी धाराशिवकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी आणि माती संवर्धनाची चळवळ केवळ सरकारी उपक्रम न राहता ती जनमानसाची चळवळ व्हावी, या उद्देशाने धाराशिव येथे ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले.सकाळच्या…

  • शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल रेणुका व्यास हिचा सत्कार

    तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद पेठ प्रशालेची विद्यार्थीनी रेणुका प्रविण व्यास ही इयत्ता सातवी मध्ये शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक झाली. या यशाबद्दल रेणुका व्यास हिचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका सुलभा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर कोळपे, सदस्य सचिन देवकते आदिसह…