Live News…..Breaking News!

.

  • जवाहर विद्यालयात सात दिवसीय सॉफ्ट स्किल कार्यशाळा उत्साहात संपन्न

    अणदूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात18 ऑगस्ट 2026 ते 25 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध विषयावर मुलांना प्रेरित करण्यात आले. संवाद कौशल्य, समन्वय कौशल्य, समीक्षण, भाषण संवाद कौशल्य, भावनिक व्यवस्थापन, मुलाखत कौशल्य इ. विषयानुरूप विविध साधन व्यक्ती बोलवण्यात आले होते. डॉ. प्रशांत भागवत, प्रोफेसर डॉ. शिवपुत्र कानडे. प्रोफेसर डॉ. विश्वास माने, डॉ.…

  • दुसऱ्या श्रावण सोमवारी श्री मुदगलेश्वराची वराह अवतार पूजा

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या पंचक्रोशीत सिंदफळ येथे स्थित असलेल्या श्री मुद्गलेश्वर शंभू महादेव मंदिरात द्वितीय श्रावण सोमवार भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री मुद्गलेश्वर महादेवांची वराह अवतार पूजा विशेष धार्मिक विधीपूर्वक मांडण्यात आली. पूजा मांडल्यानंतर मंदिरात महाआरती करण्यात आली. द्वितीय श्रावण सोमवार असल्याने श्री शंभू मुद्गलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी…

  • हंसराज गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी अमित जोशी तर उपाध्यक्षपदी भगवान शहाणे यांची निवड

    परांडा / प्रतिनिधी परंडा शहरातील हंसराज गणेश मंडळाची बैठक आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी हंसराज स्वामी मठ येथे संपन्न झाली. यावेळी गणेशोत्सव काळात घेण्यात येणाऱ्या सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली, तसेच नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली यामध्ये गणेश मंडळ अध्यक्षपदी अमीत जोशी, उपाध्यक्ष भगवान शहाणे, सचिव वैभव कुळधर्मे,खजीनदार संदीप महामुनी,मिरवणूक प्रमुख -डॉ. प्रशांत…

  • सामंजस्य करार ते प्रत्यक्ष गुंतवणूक,उद्योग आणि रोजगार’ हा विकासाचा मार्ग असावा — पालकमंत्री प्रताप सरनाईक

    धाराशिव उद्योग – गुंतवणुकीसाठी सज्ज ; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा गुंतवणूक परिषदेचे पालकमंत्र्यांनी केले ऑनलाइन उद्घाटन धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्हा उद्योग,गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी सज्ज आहे.स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत,स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित…

  • IJMA असोसिएशनच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट; गुळ नियंत्रण कायदा लागू करण्यापूर्वी संघटनेशी चर्चा करण्याची मागणी.

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या गुळ नियंत्रण कायद्याच्या मसुद्यामुळे गुळ पावडर उद्योगावर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर IJMA (Innovative Jaggery Manufacturers Association) गुळ पावडर कारखानदार शिष्टमंडळाने मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.आमदार अभिमन्यू पवार, आमदार धैर्यशील कदम, माजी आमदार दिनकरराव माने यांच्या सहकार्याने…

  • श्री तुळजाभवानी मंदिराला MSF चे सुरक्षा कवच; अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या भाविकाभिमुख सेवेसाठी सूचना

    तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (MSF) अधिकारी व जवानांचे पथक तैनात करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर MSFच्या अधिकारी व जवानांनी तुळजापूर शहर तसेच श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातून रूट मार्च काढला. रूट मार्चनंतर वरिष्ठ पोलीस व प्रशासनिक अधिकाऱ्यांनी MSFच्या अधिकारी व जवानांचे स्वागत करून त्यांना मंदिर परिसरातील…

  • तुळजापूर पालिका मुख्याधिकारी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या दालनात जाऊन पुष्पगुच्छ देत अभिष्टचिंतन करून सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी दसरा व शारदीय नवरात्र महोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुख्याधिकारी रणदिवे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आई…

  • युवकांनी आपली उर्जा सत्कार्यासाठी वापरावी – राजेश संन्यासी

    तेर / प्रतिनिधी युवकांनी आपली उर्जा सत्कार्यासाठी वापरावी असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लातूर विभाग कार्यवाह राजेश संन्याशी यांनी केले. धाराशिव तालुक्यातील तेर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित ‘युवा संमेलन’ कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना राजेश संन्याशी बोलत होते.अध्यक्षस्थानी कृषी भूषण महेश जमाले हे होते. यावेळी पुढे बोलताना राजेश संन्यासी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ…

  • ‘आपले सरकार सेवा केंद्र’मध्ये दिव्यांगांना प्राधान्य द्या; प्रहारचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील तालुका, नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी अपंग क्रांती संस्था (रजि.)च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर ज्ञानेश्वर काकडे यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे सादर केले. शासनाच्या विविध योजना व…

  • जि.प. सदस्य दयानंद शिंदेंना जीविताचा धोका; पोलीस संरक्षणाची मागणी

    तुळजापूर / प्रतिनिधी काक्रंबा जिल्हा परिषद गटाचे सदस्य तथा भाजपचे जिल्हा चिटणीस दयानंद मनोहर शिंदे यांनी आपल्या जीवाला व कुटुंबियांना धोका असल्याचे सांगत धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांकडे तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील लेखी अर्ज त्यांनी २१ ऑगस्ट २०२६ रोजी दिला असल्याचे अर्जातून स्पष्ट होते. शिंदे यांनी अर्जात गंभीर आरोप करताना म्हटले आहे की,…