धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा धाराशिव / प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सक्रिय भूमिका बजावावी. प्रश्न केवळ निवेदन देण्यापुरते मर्यादित न ठेवता ते प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी संघटनेने आक्रमकपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुशील…
नगराध्यक्ष विनोद गंगणे यांची मागणी तुळजापूर / प्रतिनिधी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या खजूर व नारळ निविदा प्रक्रियेत खोटी बँक सॉल्व्हन्सीप्रमाणपत्र देणाऱ्या निविदा धारकावर कारवाई करण्याची मागणी नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे या निवेदनात म्हटले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे खजूर व…
परंडा / प्रतिनिधी परंडा येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने परंडा शहरात काढण्यात आलेल्या जुलूस मध्ये सहभागी बालकांना व नागरिकांना नगरसेवक अकिब पठाण आणि पठाण परिवाराच्या वतीने मंडई चौकात अल्पोपहार, मिठाई व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख…
आधुनिक यंत्र व साधनसामुग्रीच्या १३.३८ कोटींच्या खरेदीला शासनाची मान्यता — आ. राणादादांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्साशास्त्र विभागाला अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने तब्बल १३ कोटी ३८ लाख ४८ हजार ५०० रुपयांच्या यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…
परंडा / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी परंडा येथील ॲड. जहीर चौधरी यांची तर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या धाराशिव जिल्हा चिटणीस पदी यशपाल बनसोडे यांच्या निवडीबद्दल परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी जाहीर केलेल्या…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध कर्मचारी यांच्या जागा रिक्त असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर आहे. जागजी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक १ पद रिक्त, आरोग्य उपकेंद्र दाऊतपूर येथे समुदाय आरोग्य अधिकारी १ पद रिक्त, आरोग्य उपकेंद्र जागजी येथे १आरोग्य सेवक पद रिक्त, आरोग्य उपकेंद्र तेर येथे १ आरोग्य सेविका…
मुरूम / प्रतिनिधी आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री संत वीरशैव कक्कय्या गणेश मंडळ, उमरगा यांच्या वतीने गणेशोत्सव नियोजनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. उमरगा-लोहारा तालुक्याचे मा. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आदेशानुसार तसेच धाराशिव जिल्ह्याचे ढोर समाज मार्गदर्शक जितेंद्र दादा चौगुले, उमरगा ढोर समाज तालुकाध्यक्ष संदिप चौगुले आणि उमरगा ढोर समाज शहराध्यक्ष आंबादास सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही…
पहिल्या यादीतील उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर सुमारे ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम २४ ऑगस्ट २०२६ रोजी ऑनलाइन पोर्टलद्वारे थेट जमा करण्यात आली. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील…
तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहरातील सेवालाल चौक ते धाराशिव रोड उड्डाण पूल पर्यतचा रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी भाजपा गटनेते औदुंबर कदम यांनी महोदय,मा. उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, तुळजापूर. यांना निवेदन देऊन केली तुळजापूर शहरात धाराशिव मार्गे व लातूर बायपास मार्गे येणारे सर्व वाहने या मार्गाने शहरात प्रवेश करतात परंतु तुळजापूर शहरातील सेवालाल चौक…
तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथील प्रविण बंडे यांची आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या धाराशिव तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पाटील भिमलवाड यांनी प्रविण बंडे यांची निवड केली आहे.त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.