परंडा / प्रतिनिधी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रावर नुकताच रक्षाबंधनाचा पवित्र सण अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि संविधानिक मूल्यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. “राखी केवळ मनगटावर बांधली जाणारी परंपरा नसून ती मन, माणुसकी आणि कर्तव्याची गाठ आहे,” असा व्यापक संदेश या वेळी वक्त्यांनी दिला. यावेळी…
तुळजापूर / प्रतिनिधी येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे “दप्तरविना शनिवार आनंददायी शनिवार” उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पर्यावरण पूरक मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये लाल माती, काळी माती, शाडू यापासून श्री गणेश मूर्ती , खेळणी व बैल बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास ऋतुजा शहाजी कावरे हिने माती पासून गणेश मूर्ती,…
पाणी – चारा – रोजगारीचा प्रश्न गंभीर चंद्रकांत हगलगुंडे अणदूर तुळजापूर तालुक्यात ऑगस्ट महिना संपत आला तरी वरुण राजाने पाठ फिरवल्याने आगामी काळात पाणी, चारा, आणि रोजगारीचा प्रश्न गंभीर बनणार या भीतीने बळीराजा आस्मानी संकटात सापडला आहे. प्रशासनाने योग्य नियोजन तात्काळ न केल्यास गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल या भीतीने बळीराजा चिंतातूर झाल्याचे चित्र पाहावयास…
अत्यल्प पाणी साठ्यामुळे पाणी टंचाईचे संकट तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणारे कुरनूर प्रकल्प ( बोरी धरण ) येथे केवळ अंदाजे 9% पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिसून येत आहे त्यांमुळे तुळजापूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा सभापती सागर कदम तसेच नगरसेवक मधुकर शेळके, पाणी पुरवठा प्रमुख प्रहर्ष बरुरकर तसेच कर्मचारी सुरज…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव लोकसभा मतदारसंघात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीन व खरीपाची अन्य़ पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. ऐन पीक वाढीच्या महत्त्वाच्या काळात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत धाराशिव लोकसभा…
वाशी / प्रतिनिधी कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून निसर्गाच्या संवर्धनासाठी वृक्ष रक्षाबंधन या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामेश्वर कोठावळे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रशिक्षक विक्रांत चव्हाण सर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य,प्रमुख पाहुणे विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महाविद्यालय परिसरातील वृक्षाला राख्या बांधल्या. या प्रसंगी प्राचार्य…
नळदुर्ग / प्रतिनिधी नळदुर्ग नगरपालिकेतील विरोधी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकानी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कारभारावर पत्रकार परिषदेद्वारे जोरदार राजकीय हल्ला चढविला आहे.नळदुर्ग शहरातील घनकचरा निर्मूलनाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून अपेक्षित कामगार वर्ग उपलब्ध न करून दिल्यामुळे शहराची नियमित स्वच्छता होत नसल्याबाबत संबंधित ठेकेदारावर कारवाई करणे तसेच घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे. घनकचरा व शहरातील स्वच्छतेची पाहणी करून कारवाई…
मुरूम / प्रतिनिधी उमरगा येथील बहुजन हिताय वसतीगृह आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, किल्लारी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या आठ वर्षांपासून सर्पसंवर्धन व जनजागृतीचे कार्य करणारे सर्पमित्र संजूबाबा कवठेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बहुजन हिताय वसतीगृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी १०१ वेळा रक्तदान करणारे शेखरभाऊ आंबेकर होते. यावेळी पंचायत समिती सदस्या श्रीमती रुक्मिणीताई देविदास कांबळे, निवृत्त…
बारूळच्या मुलींनी घडवला इतिहास धाराशिव / प्रतिनिधी बारामती येथे महाराष्ट्र राज्य महा थ्रोबॉल असोसिएशन यांनी 22 ऑगस्ट ते23 ऑगस्ट या दरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने सुवर्णपदक पदक पटकवले आहे.. स्पर्धेतील साखळी सामन्यात धाराशिव जिल्ह्याने नांदेड ,मुंबई उपनगर, पुणे पिंपरी चिंचवड, सांगली, पालघर या संघांना पराभूत करून अंतिम सामन्यात पुणे या संघाला चुरशीच्या झालेल्या सामन्यात…
पालकमंत्र्याच्या आश्वासनंतर नगरपालिका प्रशासनास प्रस्ताव पाठविण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील बोंबले हनुमान चौक ते जिजाऊ चौक (बार्शी नाका) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या कामासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने येथोल सामाजिक कार्यकर्ते दिनकर वसंतराव मुंडे यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी त्यांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार अर्ज, तक्रारी व स्मरणपत्रे दिली होती.…