Live News…..Breaking News!

.

  • आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची — जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

    पीआयबीच्या ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेत शाश्वत शेतीवर मंथन,अणुतंत्रज्ञानापासून मधुमक्षिकापालनापर्यंत विविध पर्यायांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी शेतीसोबत कुक्कुट,शेळीपालन, मधुमक्षिकापालनासारख्या पूरक व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.त्यासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धतींचा स्वीकार करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान आणि यशस्वी प्रयोगांची माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.सकारात्मक आणि विकास पत्रकारितेतून अशा यशकथा समाजासमोर आल्यास शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू…

  • शिक्षक दिनी आंदोलनाचा धाराशिव मध्ये शिक्षक संघटनाचा ईशारा

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषदेने राबवलेली शिक्षण विस्तार अधिकारी प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी धाराशिव जिल्हा शिक्षक समन्वय समिती धाराशिव च्या वतीने ऐन शिक्षक दिनीच म्हणजे 5 सप्टेंबर रोजी साखळी उपोषण करण्याचा ईशारा जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने लेखी निवेदनद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचे…

  • क्रांतीसूर्य अण्णासाहेब पाटील सोशल वर्क कॉलेजमध्ये प्रथम पदवीप्रदान समारंभ उत्साहात

    सहनशीलता, सभ्यता आणि कठीण परिश्रम करण्याची वृत्ती जोपासा‌, यश दुर नाही – डॉ रमेश चौगुले धाराशिव / प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला संयमाने सामोरे जात असताना सहनशीलतेसोबतच सभ्यपणे कठीण प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. प्रश्न विचारण्याची आणि त्यांची उत्तरे शोधण्याची जिद्द विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून…

  • लिं.प्रभुलिंगेश्वर पुण्यतिथीनिमित्त निलकंठेश्वर मठात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

    अणदूर / प्रतिनिधी येथील श्री निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती लिं.प्रभुलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमीत्त प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी शनिवार दि.५ रोजी मठाधिपती श्री.ष. ब्र.शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अधिपत्याखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमास जयशांतलिंगेश्वर महास्वामीजी,विरक्त मठ हिरेनागाव, बसवलिंग महास्वामीजी, विरक्त मठ अक्कलकोट, गंगाधर महास्वामीजी, विरक्त मठ जेवळी व सुतरेश्वर महास्वामीजी, अचलेर यांची…

  • प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन

    मुरूम / प्रतिनिधी उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कै. माधवरावजी काका पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवासाठी तारक की मारक ?’ हा विषय असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे, वाढता…

  • धाराशिव जिल्हयासह उमरगा व लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी

    मुरूम / प्रतिनिधी यंदाच्या चालु खरीप हंगामात उमरगा व लोहारा तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी व खंडीत wपाऊस झाला आहे. सुरूवातीला थोडा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु तालुक्यात मागील दीड महिन्यांपासुन पावसाने खंड दिला असल्याने सोयाबीन, तुर, मुग, उडीद आदी खरीप पिके करपुन जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असुन शेतकऱ्यांचे अतोनात…

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेटची वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सो. लि. आनंदनगर, धाराशिव यांची 15 वी वार्षीक सर्वसाधारण सभा दिनांक 31.08.2026 रोजी दुपारी 1.30 वा. शाखा अरविंदनगर, केशेगाव या ठिकाणी संस्थेचे चेअरमन मा. अॅड. चित्राव अरविंद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. अरविंद जनार्धनराव गोरे, व्हा. चेअरमन जनाब…

  • समर्थ तरुण गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर

    परंडा / प्रतिनिधी सोमवार गल्ली, परंडा येथील समर्थ तरुण गणेश मंडळाची यंदाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी शरद डोरले यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी कुणाल पवार व ओंकार वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाच्या कोषाध्यक्षपदी गौरव काळे, सचिवपदी किरण वैद्य, प्रसिद्धी प्रमुखपदी जयेश विद्वत, तर सोशल मीडिया प्रमुखपदी ओंकार एकाड यांची…

  • अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अणदूरमध्ये भव्य मिरवणूक

    अणदूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक सजावट, लेझीम, हलगी, पारंपरिक ढोल, बँजो आणि डीजेच्या तालावर युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.‘जय लहूजी, जय अण्णाभाऊ’ च्या घोषणांनी अणदूर परिसर दुमदुमून गेला. मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे यांच्या…

  • एकल महिलांच्या अर्ज नोंदणीसाठी माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांची मदत

    परंडा / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिला व बाल विकास विभागाकडून एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सर्वेक्षण नोंदणी अभियान सुरू केली आहे. परंडा शहरातील एकल महिलांची 30 ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याचे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्या अनुषंगाने परंडा नगरपालिकेच्या वतीने शहरातील एकल महिलांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत मागील 15 ऑगस्ट पासून नगरपालिकेत एकल महिलांची…