Live News…..Breaking News!

.

  • सारोळा परिसरातील पिकांची आ. राणादादांनी केली पाहणी

    एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी दिले प्रशासनास निर्देश धाराशिव / प्रतिनिधी सारोळा (बु.), ता. धाराशिव येथील पीक नुकसानीची पाहणी आमदार राणाजगजीतसिंह यांनी केली यावेळी त्यांनी एक ही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनास निर्देश दिले. पावसानं मोठी ओढ दिल्यानं यंदाच्या खरीप हंगामावर पुन्हा एकदा संकट ओढवलं आहे. सारोळा बुद्रुक परिसरात पावसाअभावी…

  • मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उमरगा येथे तहसीलदारांची खुर्ची जाळली;

    महसूल प्रशासनात खळबळ उमरगा / प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यातील असंतोष अधिकच तीव्र झाला आहे. बुधवारी (दि. ९) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उमरगा तहसील कार्यालयात मराठा आंदोलकांनी थेट तहसिलदारांच्या दालनात घुसून त्यांची खुर्ची बाहेर मैदानात आणून प्रशासकीय आवारात जाळून टाकल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली.…

  • जि. प. अध्याक्षा अर्चनाताई पाटील यांच्या आश्वासनंतर शिक्षकांचे आंदोलन स्थगित

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी दि. ५ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज जि. प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी भेट दिली. यावेळी उपोषणकर्त्या शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या मागण्या, अडचणी आणि भूमिका जाणून घेतल्या. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांबाबत येत्या २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी…

  • बावची विद्यालयास शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांची सदिच्छा भेट

    परंडा / प्रतिनिधी शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘चला शाळेला जाऊया’ अभियानांतर्गत शाळा भेट दौऱ्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे विभागाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी परंडा तालुक्यातील विविध शाळांना दौऱ्यादरम्यान अचानक भेटी देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी व आढावा घेतला. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी बावची विद्यालय, परंडा येथेही सदिच्छा भेट देऊन विद्यालयाची…

  • सोनारी जि.प. शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी जगताप व उपाध्यक्षपदी कुंभार

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या नूतन शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना मंगळवारी उत्साहात पार पडली. शासनाच्या नव्या नियमानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांचे एकत्रिकरण झाल्यामुळे, २० सदस्यांची एकच संयुक्त शालेय समिती निवडण्यात आली आहे. या प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाल्याने लोकशाही मार्गाने चिठ्ठी टाकून अंतिम निवड करण्यात आली, तर…

  • परंडा बस स्थानकातील शौचालयाच्या दुर्गंधीने व्यापारी त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी.

    परंडा / प्रतिनिधी परंडा बस स्थानकातील जीर्ण झालेल्या शौचालयाच्या गटाराची पाईपलाईन लिकेज व उघड्या गटारीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, याचा त्रास बस स्थानकातील प्रवासी तसेच परिसरातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी परंडा बस आगार प्रमुखांना निवेदन देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बस स्थानकातील…

  • तेर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

    जि. प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांची सभागृहासाठी 10 लक्ष रुपयांची घोषणा तेर / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी नाभिक समाजातील सर्व समाजबांधव एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून पुण्यतिथी उत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी ह. भ. प.…

  • आंबेडकर मल्टिस्टेट पाडोळी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    धाराशिव / प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टी स्टेट  को – ऑप. क्रेडिट सोसायटी  लि. आनंद नगर धाराशिव शाखा पाडोळी (आ) वर्धापन दिन आनंदात व खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. निलेश आण्णा बारखडे पाटील यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. कार्यक्रमात सर्वप्रथम शाखा कर्मचारी विशाल ठवरे यांनी…

  • पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

    पिण्याच्या पाण्यासह गुरांसाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन करण्यावर भर पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीचा घेतला आढावा धाराशिव / प्रतिनिधी यंदाचा पावसाळा हा जिल्ह्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने व पावसात दीर्घ खंड पडल्याने शेतीसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठाही अपेक्षा पेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे शेतीबरोबरच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची…

  • ‘उमेद’ विक्री महोत्सवाला जि. प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांची भेट.

    धाराशिव / प्रतिनिधी आगामी गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर ‘उमेद’ – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, धाराशिव समोरील जागेत दि. ०७ ते २४ सप्टेंबर २०२६ दरम्यान विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या विक्री महोत्सवातील विविध स्टॉलला जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील…