पात्र शेतकऱ्यांनी दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी कर्जाच्या थकबाकीमुळे नव्याने कर्ज घेण्याचा मार्ग बंद झालेल्या शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढून पुन्हा आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६’अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे.या यादीत जिल्ह्यातील १७ हजार ६२५ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यादीतील शेतकऱ्यांनी…
धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण, महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती तसेच विविध शैक्षणिक प्रक्रियांसाठी जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलिडीटी) आवश्यक असते. मात्र, जात वैधता प्रमाणपत्राच्या कामकाजासाठी सध्या एकाच अधिकाऱ्यावर एकापेक्षा अधिक जिल्ह्यांचा कार्यभार असल्याने धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेला विलंब होत असल्याचे निदर्शनास येत आहे.या विलंबामुळे विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेसह शिष्यवृत्ती…
जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती आढावा बैठक धाराशिव / प्रतिनिधी जून-जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.वेळेवर पेरण्या झाल्या आणि शिवारात पिकेही जोमाने उभी राहिली. मात्र,ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड दिल्याने हे आशादायी चित्र आता बदलू लागले आहे.अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष पाऊस खूपच कमी झाल्याने मोठी तूट निर्माण झाली असून त्याचा गंभीर परिणाम खरीप…
धाराशिव / प्रतिनिधी नीट NEET-2026 परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून ऑल इंडिया रँक 247 मिळवून उत्तीर्ण झालेल्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र कु. पारस महावीर कंदले यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे सत्कार करण्यात आला. पारस कंदले यांचा AIIMS Rishikesh येथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला आहे. देशातील नामांकित वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेत प्रवेश मिळवून…
परंडा / प्रतिनिधी एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या परांडा तालुक्यातील खासापुरी नं १ या गावाच्या प्रथमेश दिलीप देशमुख या तरुणांनी आर्थिक अडचणी व तणावातून टोकाचे पाऊल उचलत पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार रोजी पुण्यातील नारायण पेठ परिसरात घडली होती. आर्थिक अडचण व अन्य कारणामुळे प्रथमेश देशमुख याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पुणे…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील ग्रामीण भागात व परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुष्काळाचे सावट असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा -राजा प्रति कर्तज्ञता दाखवत बैलपोळा सण पारंपारिक पद्धतीने रामभाऊ पवार या कुटुंबाने उत्साहात साजरा केला. गुरुवारी पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी बैलांच्या सजावटीला सुरुवात केली होती. बैलांना अंघोळ घालून त्यांच्या अंगावर रंगीत झूली , शिंगाणा चंदेरी, हिरवे,…
कर्मचारी प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष मा. बाबूराव पुजरवाड यांनी जिल्हा परिषद धाराशिव येथे भेट देऊन कर्मचाऱ्यांशी विविध प्रश्नांवर सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखा धाराशिवच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण आगाशे यांचा सत्कार केला. सदर बैठकीस…
बैठकीतून घेतला तयारीचा आढावा २९ सप्टेंबरला जिल्ह्यात दहा ठिकाणी रोजगार मेळावे धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यात येत्या २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’चे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील विविध आस्थापना,कारखाने व उद्योगांनी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी,तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी रोजगार मिळविण्यासाठी या रोजगार महाकुंभात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती…
परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यात शेतकऱ्यांसह शेतात राबणाऱ्या सर्जा – राजाच्या जोडीचा बैल पोळाचा सण दुष्काळाच्या सावटाखाली आज ता. १० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. भोंजा हवेली तालुका परंडा येथील नेटके परिवारातील शेतकरी कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने भोंजा हवेली येथे बैल पोळा उत्साहात साजरा केला. या शुभप्रसंगी गावातील आणि परिसरातील मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.…
तुळजापूर / प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण अमावस्येनिमित्त बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त दोन मठांचे तसेच कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मानाचे बैल कमानवेस येथील डुल्या मारुती मंदिरापासून वाजत-गाजत श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. कमानवेस येथील डुल्या मारुती मंदिरात महंत तुकोजीबुवा, चिलोजीबुवा व भोपे पाटील…