Live News…..Breaking News!

.

  • श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

    संस्थेचे १०० कोटी ठेवीचे उद्दीष्ट मुरूम / प्रतिनिधी येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची आयोजित १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रत्नमाला मंगल कार्यालयात शनिवारी (ता. १२) रोजी उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रास्ताविक पर बोलताना ३१ मार्च २०२६ च्या ताळेबंद, नफातोटा व विविध विषयावर सविस्तर चर्चा…

  • बावची विद्यालयात NDRF टीमकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.

    परंडा / प्रतिनिधी बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी NDRF पथकातील मेजर झेंडे महादेव, मेजर रॉबिन मिनज, मेजर पवार रवींद्र व पाटील सतीश यांनी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी, संकटसमयी स्वतःचा व…

  • प्राचीन नागनाथ देव मंदिरातील धार्मिक सेवांचे संरक्षण करा – जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

    तुळजापूर / प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथील दशमान गोस्वामी समाजातील पुरी कुटुंबीय हे प्राचीन श्री नागनाथ देव मंदिराचे पारंपरिक पुजारी असून, त्यांच्या धार्मिक सेवा व पारंपरिक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.पुरी कुटुंबीय हे प्राचीन काळापासून श्री नागनाथ देव मंदिरात पूजा-अर्चना, धार्मिक विधी तसेच देवसेवेशी संबंधित…

  • “ माझं गाव आरोग्य संपन्न गाव ” अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न ’’

    धाराशिव / प्रतिनिधी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे मा. जिल्हा परिषद धाराशिव अध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील, मा.जिल्हाधिकारी श्री. किर्तीकिरण पुजार , मा. मुख्य कार्यकरी अधिकारी श्रीमती प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्षा मा. सौ. उषाताई गायकवाड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.…

  • स्वाभिमानीचे तुळजापूरात रास्तारोको आंदोलन

    हेक्टरी १ लाख रुपयांच्या मदतीसाठी सरकारला आंदोलनाचा इशारा तुळजापूर / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात पावसाने पुरती पाठ फिरवल्यामुळे संपूर्ण क्षेत्र भीषण कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली आले असल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करीत रविंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला, राज्य सरकार व प्रशासन पूर्णपणे उदासीन असून शेतकऱ्यांपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष मदत पोहोचलेली नाही. शासनाच्या या शेतकरीविरोधी धोरणामुळे बळीराजा…

  • भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा कार्यकारणी संपन्न

    १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर सेवा संकल्प अभियान राबवणार धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हा कार्यकारणीची बैठक आज माजी आमदार सुजितसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली. आगामी काळातील पक्ष संघटनेची वाटचाल, संघटनात्मक बांधणी आणि विविध उपक्रमांच्या नियोजनाच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली, या कार्यकारणीस माजी…

  • एमपीएससी विद्यार्थी प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांची आ. रोहित पवार यांच्याकडून सांत्वनपर भेट

    मातोश्रींना आर्थिक मदत; घरकुल व निराधार योजनेची कार्यवाही तातडीने करण्याच्या तहसीलदारांना सूचना परीक्षा प्रक्रियेतील अनिश्चितता, पेपरफुटी आणि दुष्काळी परिस्थितीवर व्यक्त केली चिंता परंडा / प्रतिनिधी पुणे येथे दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या परंडा तालुक्यातील खासापुरी येथील प्रथमेश देशमुख या एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे…

  • छत्रपती शिवरायांचे जगातील सर्वात मोठे निसर्गशिल्प!

    तुळजापुरात ४५० एकरांवर नैसर्गिक प्रतिमा साकारण्याच्या संकल्पनेला गती; वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक आ. राणाजगजीतसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा अनोखा संगम घडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला आता गती मिळाली आहे. तुळजापूर-धाराशिव वनपरिक्षेत्रातील सुमारे ४५० एकर क्षेत्रावर देशी, औषधी आणि आयुर्वेदिक…

  • एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; एसआयटी चौकशीची मागणी

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी एमपीएससी अध्यक्ष व सचिवांनी राजीनामा द्यावा, तसेच पेपरफुटीप्रकरणी एसआयटी चौकशी करून दोषी अधिकारी, संबंधित कंपन्या व अन्य जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.…

  • गूळ पावडर नियंत्रण कायद्याच्या मसुद्यावर साखर आयुक्तांशी IJMAची सखोल चर्चा

    धाराशिव / प्रतिनिधी महाराष्ट्र शासनातर्फे प्रस्तावित गूळ (Jaggery) नियंत्रण कायद्याच्या मसुद्याच्या अनुषंगाने इनोव्हेटीव जॅगरी मॅन्युफॅक्चर असोसिएशन (IJMA)च्या शिष्टमंडळाने पुणे येथे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. संघटनेचे अध्यक्ष अॅड. व्यंकट गुंड पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. यावेळी आगामी गळीत हंगामाचे नियोजन, गूळ पावडर उद्योगाला डिस्टिलरी व…