Live News…..Breaking News!

.

  • पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली १७ सप्टेंबरला जिल्हा नियोजन समितीची बैठक

    धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासह विविध योजनांच्या अंमलबजावणी आणि निधी खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवार,दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह,नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,धाराशिव येथे होणार आहे. बैठकीत प्रामुख्याने १ मे…

  • पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीने तेर परिसरातील पिके करपलीदुष्काळाचे सावट, पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

    गोरख माळी तेर तेर परिसरात पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने खरीप पिके करपू लागली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांचा जीव मेथाकुटीला आला आहे. पावसाअभावी शेतातील पिकांना मोठा फटका बसत असून अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि त्यात पावसाने…

  • अभियंता दिनानिमित्त वीज अभियंत्यांचा सत्कार

    तुळजापूर / प्रतिनिधी अभियंता दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने तुळजापूर व धाराशिव विभागातील विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या अभियंता अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. वीज वितरण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अभियंते हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वाढता…

  • प स सभापती गोकर्णा कदम यांच्या अध्यक्षतेखाली येवती येथे जनता दरबार संपन्न

    धाराशिव / प्रतिनिधी आमदार राणाजगजितसिंह पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पंचायत समिती धाराशिवच्या सभापती सौ. गोकर्णा गोपाळ कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी येवती, ता. धाराशिव येथे भव्य पंचायत समिती जनता दरबार संपन्न झाला. येवती मधील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी तसेच त्या सोडविण्यासाठी या उद्देशाने ग्रामपंचायत कार्यालय,…

  • जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘गणेश गौरव महोत्सव–२०२६’चे आयोजन

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धेसह महिलांसाठी गौरी-गणपती सजावट स्पर्धा; धाराशिव तालुका व शहरातील मंडळे व महिलांनी सहभागी व्हावे – जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर धाराशिव / प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक परंपरांचे जतन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा आणि समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळावी, या उद्देशाने धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘गणेश गौरव महोत्सव–२०२६’ अंतर्गत उत्कृष्ट सार्वजनिक गणेश…

  • “भरपूर पाऊस पडू दे, दुष्काळाचे सावट दूर कर” अशी गंगणे परिवाराची गणरायाच्या चरणी प्रार्थना..

    तुळजापूर / प्रतिनिधी तीर्थक्षेत्र तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थीनिमित्त विघ्नहर्ता श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नगराध्यक्ष विनोद गंगणे, त्यांचे बंधू तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे आणि त्यांच्या सौभाग्यवती तथा नगरसेविका प्रियंकाताई विजय गंगणे यांच्या शुभहस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी गंगणे परिवाराच्या वतीने श्री गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा…

  • गणेश आगमनाच्या शुभमुहूर्तावर ‘स्त्री जन्माचे स्वागत’ उपक्रमाचा जोरदार शुभारंभ

    उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे चार कन्यारत्नांचे स्वागत; मातांचा साडी-चोळी, भेटवस्तू व प्रोटीन देऊन सन्मान तुळजापर / प्रतिनिधी “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, बेटी खिलाओ” या सामाजिक संदेशाचे पालन करत मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे, समाजामध्ये मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने रोटरी क्लब तुळजापूरच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्त्री जन्माचे स्वागत’ या स्तुत्य उपक्रमाचा आज गणेश…

  • भाजप धाराशिव जिल्हा सरचिटणीसपदी शिवाजीराव गिड्डे यांची नियुक्ती;

    मा.आ.सुजितसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार धाराशिव / प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने शिवाजीराव गिड्डे यांची भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल पक्षातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार मा. सुजितसिंह…

  • धाराशिव मध्ये वाजत गाजत लाडक्या श्री गणरायाचे आगमन

    धाराशिव / प्रतिनिधी चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती, मंगलमूर्ती श्री गणरायाचे आगमन आज सोमवारी श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी धाराशिव शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात व आनंदात ढोल ताशांच्या गजरात डॉल्बी च्या निनादात ” गणपती बाप्पा मोरया ” च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपात झाले. धाराशिव शहरात सकाळपासूनच बाजारपेठेत समस्त धाराशिवकरांनी श्री…

  • धाराशिवचा हरिकेश गाडेकर भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट’ गावसुदच्या तरुणाचे उल्लेखनीय यश

    धाराशिव / प्रतिनिधी तालुक्यातील गावसुद येथील हरिकेश नागनाथ गाडेकर यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. केंद्रीय आरोग्य शासकीय योजना (सीजीएचएस), पुणे येथे कार्यरत नागनाथ मारुती गाडेकर व देवकन्या नागनाथ गाडेकर यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. हरिकेश गाडेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण…