Live News…..Breaking News!

.

  • शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

    परंडा / प्रतिनिधी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ तसेच श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन…

  • धाराशिवच्या पर्यटनाला मिळणार नवी झळाळी इतिहास,श्रद्धा अन् निसर्गाची सांगड

    २९ राज्य संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासह पर्यटनस्थळांच्या विकासाला चालनापुरातत्व विभागाची माहिती धाराशिव / प्रतिनिधी प्राचीन लेणींमधून उलगडणारा हजारो वर्षांचा इतिहास, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा,नळदुर्ग- परंड्यासारख्या भुईकोट किल्ल्यांचा दिमाख आणि तेरसारख्या प्राचीन नगरीचा सांस्कृतिक वारसा अशा इतिहास,अध्यात्म,संस्कृती आणि पर्यटनाच्या समृद्ध पदरांनी धाराशिव जिल्ह्याची ओळख घडली आहे.या वैभवशाली वारशाचे जतन करतानाच पर्यटक आणि भाविकांना अधिक चांगल्या…

  • अनाथपणावर मात; आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट

    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना केंद्रांचे वाटप धाराशिव / प्रतिनिधी परिस्थितीने लहान वयातच ज्यांच्या डोक्यावरील मायेचे छत्र हिरावून घेतले,अशा तीन अनाथ बालकांच्या आयुष्यात आज स्वावलंबनाची नवी पहाट उगवली.केवळ त्यांचे संगोपन करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाने या तीन बालकांचे…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा साहित्याचे वाटप

    परंडा / प्रतिनिधी हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान, कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणसागर माध्यमिक विद्यालय व सरस्वती प्राथमिक शाळा परंडा येथे कल्याणसागर समुहाच्या सचिवा सौ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी दोन्ही शाळेना क्रीडा साहित्य भेट दिले. यावेळेस कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक किरण गरड, मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, क्रीडा शिक्षक चंद्रकांत तनपुरे व हरिश्चंद्र पवार यांचेकडे…

  • धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ३ पोलीस लाईन मधील विकासकामांना प्रारंभ

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये एमटी पोलीस गेट ते कालिकामाता देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे हॉटमिक्स करणे तसेच हद्दवाढ भागातील गॅस पंपा समोरील श्री. साठे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास भाजपचे युवा नेते मल्हार राणाजगजीतसिंह पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, धाराशिव…

  • शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ; शासन भक्कमपणे पाठीशी

    शेतातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद धाराशिव / प्रतिनिधी पावसाच्या दीर्घ खंडामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून,शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.पीक नुकसानीबाबत शासन सकारात्मक असून येत्या काही दिवसांत मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल,अशी ग्वाही पालकमंत्री…

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी, जीर्ण शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणार पालकमंत्री प्रताप सरनाईक

    जिल्हा नियोजन समितीची बैठक धाराशिव / प्रतिनिधी पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली असून,पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पावसाअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिलासा देण्यात येईल.या संकटाच्या काळात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करून शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही द्यावी. त्याचबरोबर ज्या शाळांच्या वर्गखोल्यांची…

  • धाराशिव- तुळजापूर -सोलापूर रेल्वेमार्गाला २४० कोटींचे बळ

    राज्याच्या हिश्श्याचा निधी मंजूर; डिसेंबर २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला गती – आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव / प्रतिनिधी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशाशी जोडणाऱ्या सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाला आता आणखी वेग येणार आहे. या प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने राज्याच्या हिश्श्याचे आणखी २४० कोटी रुपये वितरित करण्यास गुरुवारी…

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व मिठाई वाटप

    परंडा / प्रतिनिधी राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने दि. १७ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे रूग्णांना फळे व मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, धाराशिव…

  • धानोरा येथे सोयाबीन पिकाची पाहणी, सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी – डॉ. प्रतापसिंह पाटील

    धाराशिव / प्रतिनिधी धानोरा, ता. धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी पिकाच्या नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली. पाहणीदरम्यान अनेक शेतांमध्ये सोयाबीनचे पीक उभे असले तरी शेंगा अत्यल्प असून काही ठिकाणी जवळपास पूर्ण नुकसान झाल्याचे चित्र दिसत…