धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त धाराशिव येथील काँग्रेस भवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उत्साहात झेंडावंदन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात निजामशाहीच्या जुलमी राजवटीविरोधात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. उपस्थितांनी मुक्तिसंग्रामातील वीरांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.…
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा धाराशिवकरांना दुष्काळाच्या संभाव्य संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द,त्याग आणि एकजुटीची प्रेरणा घेऊन आजच्या संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या संकटावरही मात करूया,असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.संकट कितीही मोठे असू दे,सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,अशी…
परंडा / प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त कल्याणसागर माध्यमिक विद्यालय व सरस्वती प्राथमिक शाळा परंडा येथे कल्याणसागर समुहाच्या सचिव सौ. प्रज्ञा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळेस कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक किरण गरड, मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
धाराशिव / प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी, वीजपुरवठा, पीक विमा, कर्जवसुली, शिक्षण, आरोग्य तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे प्रश्न मांडून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. मराठवाड्यात…
धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहरातील वरुडा रोड परिसरातील निर्भय तरुण गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती दैनिक मराठवाडा नेताचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत कावरे व दैनिक यशवंत चे जिल्हा प्रतिनिधी मल्लिकार्जुन सोनवणे यांच्या हस्ते दि.१६ सप्टेंबर रोजी करण्यात आली. धाराशिव शहरातील निर्भया कॉलनीमधील निर्भय तरुण गणेश मंडळाच्यावतीने गणेश उत्सवानिमित्त पारंपरिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…
— पालकमंत्री प्रताप सरनाईक मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण केल्या; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आंदोलना ऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया, असे आवाहन धाराशिव / प्रतिनिधी धाराशिवचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, समाजाच्या भावनांशी निगडित असलेल्या सुमारे १५० फुटी भगव्या ध्वजाची उभारणी तसेच मराठा समाज मंदिराच्या उभारणीचे काम…
भौतिक सुविधांची माहिती संकलन व प्रत्यक्ष पडताळणी; ‘सात ते नऊ – मोबाईल-टीव्ही बंद, अभ्यास सुरू’ उपक्रमाचाही होणार आढावा जि. प.अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांची संकल्पना धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमधील भौतिक सुविधांची सद्यस्थिती जाणून घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने दि. १५ सप्टेंबर रोजी ‘चला शाळेत जाऊया’ हा…
धाराशिव / प्रतिनिधी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ गुरुवार,दि.१७ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभास सकाळी ८.४५ वाजता पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी लढलेल्या…
धाराशिव / प्रतिनिधी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात इंग्रजी विभाग व महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने संवाद कौशल्यावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, नवीन शैक्षणिक धोरणानुसार संवाद कौशल्यावर अधिक भर दिला गेला असून याच अनुषंगाने इंग्रजी विभागांतर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.गोविंद कोकणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा…
ढोकी / प्रतिनिधी धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी खून प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी तसेच पीडितांना न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी दि.१५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दि.११ सप्टेंबर२०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली यामध्ये बुंकनवाडी येथील रहिवासी महेश चामे(वय २४) यासह इतर पाच जणांवर आरोपीने हल्ला चढवला या…