Live News…..Breaking News!

.

  • धाराशिवच्या आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळ

    तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा — आमदार राणाजगजितसिंह पाटील चारा डेपो, टँकर व रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य; खरीप नुकसानीच्या अनुदानानंतर लवकर पीकविम्यासाठीही प्रयत्न धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा शासनस्तरावर आपला पाठपुरावा सुरू…

  • आमदार रोहित पवार यांचा आज धाराशिव जिल्हा दुष्काळी पिक पाहणी दौरा

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पवार पक्षाचे आक्रमक, तरुण तडफदार आमदार रोहितदादा पवार हे आज रविवार दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्हया तील दुष्काळी पिक पाहणी करणार आहेत या दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे सकाळी ८:३० वाजतायेरमाळा, ता. कळंब, सकाळी ९:०० वाजता तेरखेडा, ता. वाशी, सकाळी १०:०० वाजता मस्सा खंडेश्वरी, ता. कळंब, सकाळी १०:३० वाजता…

  • धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या —

    भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. परंडा / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात पावासाळी हंगामात सरासरी पेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने आणि पावसात मोठे खंड पडल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, तुर, उडीद, मुग इत्यादी सर्वच पिके वाया गेल्याने आणि निसर्गाचा लहरीपणा, बदलते हवामान आणि गतवर्षी झालेली अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकरी संकटात सापडला असून संपूर्ण…

  • अनाळा जिल्हा परिषद शाळेस सीसीटीव्ही यंत्रणा भेट

    परंडा / प्रतिनिधी विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेतील शिस्त आणि परिसरातील सुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने परंडा तालुक्यातील अनाळा येथील जिल्हा परिषद शाळेला शालेय समितीचे अध्यक्ष विनोद चिंतामणी यांच्यावतीने संपूर्ण शाळेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा दि. १८ रोजी भेट देण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन आंबी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर ,पोलिस उपनिरीक्षक सुनिल खचकड,ग्रेड पोलिस…

  • मुरूम च्या अशोक चौक मंडळाच्या आरोग्य शिबीरात 150 रुग्णांची तपासणी व औषधोपचार

    मुरूम / प्रतिनिधी ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावे या उद्देशाने मुरूम येथील अशोक चौक गणेश मंडळाकडून उमरगा येथील श्री संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून शनिवारी (दि 19) मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात 150 रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. तसेच आयोजित रक्तदान…

  • रूपामाता विद्यालयातील गुणवंत क्रीडा व बुद्धिबळपटूंचा सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी रुपामाता परिवारातील रूपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाडोळी (आ.) येथे गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून धाराशिव तालुकास्तरीय शालेय क्रीडा व बुद्धिबळ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा संस्थेचे…

  • राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. किरण झरकर यांचा रुपामाता परिवारात सत्कार

    धाराशिव / प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल डॉ. किरण झरकर यांचा रुपामाता परिवाराच्या प्रधान कार्यालयात सत्कार करण्यात आला. रुपामाता परिवाराचे संस्थापक तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील, लातूर येथील उद्योजक व्ही. पी. पाटील, कार्यकारी संचालक अ‍ॅड.अजित गुंड पाटील, रुपामाता अर्बन व मल्टीस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण…

  • पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी तुळजाभवानी मातेच्या चरणी ‘आशीर्वाद का एक दिया’

    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून अनोखा उपक्रम तुळजापूर / प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी आशीर्वाद का एक दिया तेवत ठेवून अनोख्या पद्धतीने दीपप्रज्वलन केले. मोदी यांना निरामय दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून देशसेवा अविरतपणे घडत राहावी, यासाठी त्यांनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली.…

  • मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त काँग्रेस भवनात झेंडावंदन

    धाराशिव / प्रतिनिधी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त धाराशिव येथील काँग्रेस भवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उत्साहात झेंडावंदन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात निजामशाहीच्या जुलमी राजवटीविरोधात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. उपस्थितांनी मुक्तिसंग्रामातील वीरांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.…

  • गटई कामगारांना हक्काचा आधार ; स्टॉल प्रमाणपत्राचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वितरण

    धाराशिव / प्रतिनिधी रस्त्याच्या कडेला बसून ऊन,वारा आणि पावसाचा सामना करत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गटई कामगारांना सुरक्षित कामाची जागा मिळावी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागावा,या उद्देशाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तीन लाभार्थ्यांना पत्र्याच्या स्टॉलचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते…